Amazon

Ads Area

header ads
header ads

Diwali 2021: यमदीपदान म्हणजे काय? अशी करा यंदाची यमदीपदान | Yamdipdan information in Marathi

 

दीपावली सणांचा राजा  अजून त्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे विधी पूजा करतो. हे सण साजरा करण्यामागे अनेक विशिष्ट हेतू कारणे आहेत. वसुबारस दीपावलीचा पहिला दिवस पासून तो गोमातेच्या पूजनासाठी विशेष मानला जातो. त्यानंतर धनत्रयोदशी साजरा करतात. त्याच दिवशी यमदीपदान ही एक विशेष पूजा केली जाते.

यमदीपदान म्हणजे काय?

आपल्या घरातील व्यक्तीवर अपमृत्यू किंवा अचानक पणे येणारे मृत्यू असे होऊ नये, यासाठी करण्याचे दीपदान म्हणजेच यमदीपदान.

अपमृत्यू किंवा अचानक पणे मृत्यू म्हणजे एक्सीडेंट  होऊन मरण येणे, किंवा साप चावून मरणे किंवा शॉक लागून मरण येणे म्हणजेच नैसर्गिक रित्या येणाऱ्या मरणापेक्षा कुठल्याही घटना किंवा कारणाने अचानक पणे येणारा मृत्यू असा याचा अर्थ होतो.


यमदीपदान केल्याने आपल्या घरातील व्यक्तीवर असे अचानक किंवा अपमृत्यू येऊ नये किंवा यापासून कसे वाचावे यासाठी हे दीपदान महत्वाचे असते . 

दिवाळी म्हणजे काय? का साजरी केली जाते दिवाळी? अन दिवाळीला इतकं महत्व का आहे? What is Diwali and why is it celebrated?

असे करा यमदीपदान :

यमदीपदान करतांना सर्व प्रथम दाराबाहेर दक्षिण बाजूस ज्या ठिकाणी हे दीपदान करावे.  हि पूजा सायंकाळी  करायची असते . त्या ठिकाणी कुंकुवाने स्वस्तिक काढावी त्यानंतर त्या स्वस्तिक पाठ ठेवावा. त्या पाटावर नेहमीची मातीची पणती ठेवायची त्या पणती मध्ये मोहरीचे तेल किंवा तिळाचे तेल किंवा आपण घरात नेहमी वापरतो ते तेल घालावे .


आणि ती पणती लावून त्यानंतर ती पणती दक्षिण दिशेला तोंड करून ठेवायची , त्यानंतर त्या पणती मध्ये चिमूटभर साखर टाकावी आणि १ रुपयाचे नाणे टाकावे . त्या नंतर ह्या पंतीची पूजा करावी , कुंकू, अक्षदा, आणि फुले वाहावे . त्यानंतर हात जोडून यमराजाला प्रार्थना करावी आणि प्रार्थनेत म्हणावे .

दिवाळी शुभेच्छा संदेशपत्रे मराठीमध्ये: व्हाट्सऍप, फेसबुक, इंस्टाग्राम व इतर सोशलमिडियावर शेअर करता येणार मराठी स्टेटस 

हे यमदेव आम्हाला तू दीपदानाने प्रसन्न व्हावे आणि मृत्यू पाशातून आम्हाला माफ करावे, आणि तू अपमृत्यू आमच्या घरात होऊ देऊ नकोस . अशी मनापासून यमदेवाला प्रार्थना करावी . हा मंत्र सुद्धा म्हणावा.

” मृत्युना पाशदंडाभ्यां कालेन श्यामसह ।”, “त्रयोदश्यांदिपदानात् सूर्यजः प्रीयतां मम ।।”


हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads