Amazon

Ads Area

header ads
header ads

Facebook चे नाव बदलल्यामुळे What's app मध्ये होणार मोठा बदल| पहा What's app look बद्दल आश्चर्यकारक बातमी.

जीवन मराठी: सोशल मीडिया आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक बनला आहे. जगातील सर्वच बातम्या घडामोडी मनोरंजन पुरवणारा सोशल मीडिया अनेक प्लॅटफॉर्म द्वारे लोकांशी कनेक्ट होत आहे. काही दिवसांपूर्वीच फेसबूक नाव बदलण्यात आलं.कंपनीचे नाव बदलले तरी कंपनीच्या कामात कोणताही बदल होणार नाही हे मार्क झुकरबर्ग यांनी सांगितलं होतं. फेसबूक (Facebook) आता 'मेटा' ( Meta)या नावाने  भेटीस आले आहे. पण सध्या एक  बातमी सोशल मीडियावर खूपच चर्चेत आहे. तर ती काय आहे? हे पाहूया..

व्हॉट्सऍप(What's app) हा जगातील नंबर वन मेसेजिंग  प्लॅटफॉर्म ठरला आहे.  व्हाट्सॲप मध्ये अनेक सुविधा आणि फीचर्स असल्यामुळे लोकांना अगदी सोप्या पद्धतीने कनेक्ट होता येते. पण सध्या एक बातमी वायरल होत आहे. एक मोठा बदल आता व्हाट्सअप मध्ये करण्यात येणार आहे.


फेसबुक हे व्हाट्सॲप ची पॅरेण्ट कंपनी असल्यामुळे व्हाट्सॲप ओपन केल्यानंतर (WhatsApp from Facebook) हे टॅग लाईन आपणास पाहायला मिळत होते .पण व्हाट्सअप च्या डेव्हलपर्स ने हे ओळ आता काढून टाकली आहे. ती ओळ आपल्यांना पाहण्यास मिळणार नाही. त्या ऐवजी आता व्हाट्सअप फ्रॉम मेटा (WhatsApp from Meta) हे वाक्य दिसेल. या बदला सोबतच व्हाट्सअप च्या सेटिंग मध्ये असलेल्या फेसबुकचा उल्लेखही काढून टाकण्यात येणार आहे.

व्हाट्सॲपच्या या बीटा वर्जन मध्ये  Business account च्या मेसेजेस मूल्यमापन आता करता येऊ शकते. हा नवीन बदल टेस्टिंग फेजमध्ये आहे. लवकरच तो युजर्स साठी उपलब्ध करण्यात येईल.

फेसबूक (Facebook) चे नाव मेटा( Meta) असे ठेवण्यात आले असले ,तरी कॉर्पोरेटर स्ट्रक्चर ,सॉफ्टवेअर किंवा हार्डवेयर प्रोडक्टस मध्ये कोणताही बदल होणार नाही ,असे फेसबुकच्या कंपनीचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी स्पष्ट केले आहे.
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads