Amazon

Ads Area

header ads
header ads

Diwali 2021:भाऊबीज साजरा करण्यामागचे हे आश्चर्यकारक कारण माहित आहे का तुम्हाला? यमद्वितीया का साजरी करावी? जाणून घ्या महत्व.

 सर्व सणांचा राजा दीपावली हा संपूर्ण भारतात साजरा केला जातो. दीपावली मध्ये वेगवेगळ्या दिवसांचे वेगवेगळे महत्व आहेत. ते दिवस खूप मनापासून साजरे केले जातात. महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात दीपावली ची गोडी लोकांना आहे. दीपावली तुला भाऊबीज हा सण बहिण- भावाच्या खट्टा मीठ्या नात्याला पुन्हा एकदा आठवण करून देणारा असतो. पण भाऊबीज का साजरी करतात हे माहित आहे का तुम्हाला? चला तर पाहूया भाऊबीज का साजरी करावी?



कार्तिक शुद्ध द्वितीयेस भाऊबीज हा नात्यांना एकत्र आणणारा सण मोठ्या आनंदात साजरा केला जातो. हे दिवस साजरा करण्यामागचे  एक अनन्यसाधारण कारण आहे. या दिवशी यम आपली बहीण यमी तिच्या घरी जेवायला गेला होता म्हणून या दिवसाला यमद्वितीया असे ही म्हटले जाते. द्वितीयेचा चंद्र हा आकर्षक व वर्धमानता सिद्ध करणारा असतो. तेव्हा बीजेच्या कोरीप्रमाणे बंधू प्रेमाचे वर्धन होत राहो अशी या मागची भावना सांगितली जाते. एकमेकातील द्वेष राग विसरून पुन्हा एकदा बंधु भावनेने सर्वजण एकत्र यावे .याकरिता भाऊबीज साजरा करतात. गोडाचे जेवण करून बहिण आपल्या भावाला जेवण्यास घरी बोलावते .सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीस व नंतर भावाला ओवाळून त्यास आशीर्वाद देते. भाऊ ओवाळणीच्या ताटात ओवाळणी देऊन बहिणीचा सत्कार करतो. विशिष्ट समाजामध्ये काही परंपरा असल्याने भाऊ बहिणीला ओवाळणी देत नाही तर भेटवस्तू देतो.


एखाद्या स्त्रीला भाऊ नसेल तर तिने कोणत्याही पुरुषाला भाऊ म्हणून ओवाळले जाते. ते शक्य नसल्यास चंद्राला भाऊ मानून ओवाळतात ची पद्धत आहे.

Diwali Padawa का साजरी केली जाते? अशी साजरी करा Diwali 2021

भाऊबीजेचे हे महत्त्व जाणून घ्या.

🔹यम देवाची बहिण यमी हिचे पृथ्वीवरचे रूप म्हणजे यमुना नदी. भाऊबीजेच्या दिवशी यमुना नदीत स्नान करणाऱ्याला अपमृत्यु येत नाही तसेच मोक्षप्राप्ती होते असे मानले जाते.

🔹यमद्वितीया ला आपली बहीण यमी हिच्या घरी जेवायला जातो त्यामुळे या दिवशी नरकात खितपत पडलेल्या जीवांना त्या दिवसापुरते मोकळे केले जाते.

🔹अपमृत्यु येऊ नये म्हणून धनत्रयोदशी , नरक चतुर्दशी आणि यमद्वितीया मृत्यूची देवता यमधर्म याचे  पूजन केले जाते. तसेच त्याच्या चौदा नावांनी तर्पण करून अपमृत्यु निवारणार्थ 'श्री यमधर्म प्रित्यर्थ यमतर्पण करिष्ये |' असा संकल्प करून तर्पण करायचे असते.

वाचा: Diwali 2021 : यंदाची वसुबारस तुमच्यासाठी ठरेल खास ! अशी करावी गोवत्स द्वादशी पूजा. | वसुबारस महत्व..


हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या