Amazon

Ads Area

header ads
header ads

क्रियाविशेषण अव्यय (Adverb) शब्दांच्या जाती- मराठी व्याकरण Information in Marathi

आतापर्यंत आपण मराठी व्याकरणमधील शब्दांच्या जाती भागातील नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद हे सव्यय म्हणजेच विकारी शब्द हा प्रकार बघितला. आता आपण अविकारी शब्द म्हणजे अव्यय शब्दांचे मुद्दे पाहुयात.
क्रियाविशेषण (Adverb) अव्यय म्हणजे काय?

क्रियाविशेषण म्हणजे क्रियेचे स्थळ, काळ, प्रमाण, रीत दर्शवणारा शब्द किंवा क्रियेची अधिक माहिती सांगणारा शब्द होय.
उदा. येथे, तेथे, इकडे, तिकडे, अगोदर, नंतर, पुष्कळ, विपूल,...


क्रियाविशेषण अव्ययाचे 4 प्रकार पडतात.
1. स्थलवाचक  क्रियाविशेषण अव्यय, 2. कालवाचक क्रियाविशेषण अव्यय 3. रितीवाचक क्रियाविशेषण अव्यय 4. परिणामवाचक क्रियाविशेषण अव्यय असे प्रकार आहेत.

1. स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय
या क्रियाविशेषण अव्ययद्वारे 'स्थळ वा ठिकाण' दर्शवले जाते.
उदा. तेथे,  येथे, इकडे, तिकडे, सर्वत्र, चोहीकडे, खाली, अलीकडे, पलीकडे, मागे, पुढे

2. कालवाचक क्रियाविशेषण अव्यय 
या क्रियाविशेषण अव्ययाद्वारे 'काळ' दर्शवला जातो.
उदा. आज, उद्या, काल, परवा, आज, काल, आत्ता, लगेच, जेव्हा, तेव्हा, तूर्त, दररोज, वेळोवेळी...

3. रितिवाचक क्रियाविशेषण अव्यय
या क्रियाविशेषण अव्ययाद्वारे 'रीत' दर्शवली जाते.

उदा. हळू, जलद, सावकाश, चटकन, मुद्दाम, आपोआप, व्यर्थ, खरोखर, फुकट, पटापट...

4. परिणामवाचक क्रियाविशेषण अव्यय
या क्रियाविशेषण अव्ययद्वारे परिणाम दर्शवला जातो.

उदाहरणार्थ- किंचित, थोडा, थोडे, जास्त, भरपूर, मुळीच, फार, जरा, मोजके,....

पुढील मुद्दा-  6. शब्दयोगी अव्यय

शब्दांच्या जाती या मुख्य पानावर जाण्यासाठी येथे क्लिक करा.


अशीच माहिती मिळवण्यासाठी 'जीवन मराठी' ला सोशल मीडियावर फॉलो करा.
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

amazon ads