Amazon

Ads Area

header ads
header ads

शब्दयोगी अव्यय (Verbal prepositions) शब्दांच्या जाती- मराठी व्याकरण Information in Marathi

मराठी व्याकरणातील शब्दाच्या जातीचे सव्यय आणि अव्यय हे 2 भाग पडतात तर आपण सव्यय मधील नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद हे आणि अव्यय मधील क्रियाविशेषण अव्यय अभ्यासलो आहोत. आता आपण शब्दयोगी अव्यय अभ्यासू.
शब्दयोगी अव्यय म्हणजे काय?

वाक्यामधील एखाद्या शब्दाला जोडून येणारा शब्द म्हणजे शब्दयोगी अव्यय होय. 
उदा. खाली- टेबलाखाली, 
वर - कपटावर, कडे, मागे, पुढे, साठी, करिता....
शब्दयोगी अव्यये हे मुख्यत: नामाला अथवा नामाचें कार्य करणाऱ्या शब्दास जोडली जातात. मात्र कधी कधी तीं क्रियापदें व क्रियाविशेषणें यांनासुद्धां येतात.
शब्दाला  शब्दयोगी अव्यय लागल्यावर बनलेला जोडशब्द हा त्याच वाक्यामधील दुसऱ्या शब्दाशी संबंध दाखवतो. 

शब्दयोगी अव्यय हे अ-व्यय आहे त्यामुळे त्यात लिंग, वचन, विभक्तीनुसार कोणताही बदल होत नाही.

शब्दयोगी अव्यय शब्दाला लागत असताना त्या शब्दाचे सामान्य रूप होते. 


शब्दयोगी अव्ययवाचे प्रकार
कालवाचक, गतिवाचक, स्थलवाचक, करणवाचक, हेतुवाचक, व्यक्तिरेखा वाचक, तुलनावाचक, योग्यतावाचक, कैवल्यवाचक, संग्रहवाचक, संबंधवाचक, साहचर्यवाचक, विनिमयवाचक, परिणाम वाचक, विरोधावाचक

पुढील मुद्दा- 7. केवलप्रयोगी अव्यय

शब्दांच्या जाती या मुख्य पानावर जाण्यासाठी येथे क्लिक करा.


अशीच माहिती मिळवण्यासाठी 'जीवन मराठी' ला सोशल मीडियावर फॉलो करा.
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads