Amazon

Ads Area

header ads
header ads

Auxiliary Verbs म्हणजेच सहाय्यकारी क्रियापद बद्दल Information in Marathi

सहाय्यकारी क्रियापदाचा अभ्यास करत असताना आपल्याला सहाय्यकारी क्रियापदाचे 2 प्रकार बघावे लागतील. पहिला आहे तो Primary Auxiliaries म्हणजे प्राथमिक सहाय्यकारी क्रियापदे आणि दुसरं म्हणजे मॉडेल सहाय्यकारी क्रियापदे म्हणजेच Modal Auxiliaries. 

Auxiliary Verb Meaning in Marathi
सर्वप्रथम सहाय्यकारी क्रियापदे पाहूया.
am, is, are, was, were ही to be ची रूपे,
have, has, had ही to have ची रूपे
do, does, did, ही to do ची रुपे
shall, should
will, would
can, could
may, might
must, ought, dare, need
तर not हे कायम सहाय्यकारी क्रियापदानंतर लिहतात.
HELPING VERB असेही सहाय्यकारी क्रियापदांना म्हणतात.

चला आता पाहूया सहाय्यकारी क्रियापदाचे 2 प्रकार: (types of auxiliary verbs with examples)

Arimary Auxiliary Verbs म्हणजे प्राथमिक सहाय्यकारी क्रियापदे
ही सहाय्यकारी क्रियापदे महत्वपूर्ण मानली जातात. यामध्ये am, is, are, was, were, have, has, had, do, does, did हे प्राथमिक सहाय्यकारी क्रियापदे असून मुख्य क्रियापदे म्हणूनही वापरली जातात. काळ बनवताना अथवा प्रश्नार्थक, आज्ञार्थी, नकारार्थी वाक्ये तयार करताना वापरतात.

Modal Auxiliary Verbs म्हणजे मोडल सहाय्यकारी क्रियापदे
ही सहाय्यकारी क्रियापदे परवानगी, शक्यता, बंधन इत्यादी भावना प्रकट करतात. तसेच या क्रियापदांना ing किंवा s/ es प्रत्येय लागत नाही. मॉडल नंतर येणारे मुख्य क्रियापद हे नेहमी मूळ रूपात असते.
Shall, should, will, would, can, could, may, might, must, ought, Dare, need ही मॉडल सहाय्यकारी क्रियापदे आहेत.

वाचा: 

Shall
आज्ञा(command), वचन(promise), धमकी(threat), निश्चय(determin-ation) इत्यादी अर्थाने याचा वापर द्वितीय पुरुष किंवा तृतीय पुरुषात करतात.
उदाहरण: You shall not sit down.

Should
याचा उपयोग उपदेश(advice), नैतिक बंधन(obligation), कर्तव्य (duty) या अर्थाने करतात. Should हे Shall चे भूतकाळी रूप आहे.
उदा. You should study hard.

Will
याचा वापर नम्र विनंती(pollite request), संभव (probability), अंदाज(assumption), विचारणा हे दर्शवण्यासाठी द्वितीय पुरुष किंवा तृतीय पुरुषात करतात.

Would
याचा वापर नम्र विनंती(pollite request), सूचना (suggestion), संभव(probability) हे दर्शवण्यासाठी केला जातो. हे will चे भूतकाळी रूप आहे. 
उदाहरण: You would study hard.


Can
याचा वापर सामर्थ्य(ability), नम्र विनंती(pollite request), शक्यता(possibility), परवानगी(permission) हे दर्शविण्यासाठी केला जातो.

उदाहरण:  Rajesh can solve this problem.

Could
Can प्रमाणेच याचा उपयोग होत असून हे can चे भूतकाळी रूप आहे. 
उदा. Could you lend me your bag?

May
याचा उपयोग permission, ability, possibility, desire, uncertainty, purpose दर्शविण्यासाठी केला जातो. 
उदा. May I come in, Sir?

Might
हे May चे भूतकाळी रूप आहे. 
उदा. I might be late for office.

Must
याचा वापर बंधन(obligation), कर्तव्य(duty), निश्चय(strong determination), संभव  (probability) हे दाखवण्यासाठी होतो. 
उदाहरण: The train must have gone.

Ought to
याचा वापर बंधन, संभव, कर्तव्य, आवश्यकता, हे दर्शविणासाठी होतो. 
उदाहरण: We ought to win this time.

Dare
याचा अर्थ धजणे, ध्येय असणे, आव्हान देणे असा होतो. 
उदाहरण: She dares me to fight.


अश्याच माहितीसाठी जीवन मराठीला सोशल मीडियावर फॉलो करा.
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads