Amazon

Ads Area

header ads
header ads

केवलप्रयोगी अव्यय (Interjection) शब्दांच्या जाती- मराठी व्याकरण Information in Marathi

आतापर्यंत आपण सव्यय भागातील 4 भाग नाम, सर्वनाम,  विशेषण, क्रियापद आणि अव्यय भागातील 2 क्रियाविशेषण अव्यय आणि शब्दप्रयोगी अव्यय हे अभ्यासले. आता पण केवलप्रयोगी अव्यय पाहुयात.
केवलप्रयोगी अव्यय म्हणजे काय?

अचानकपणे किंवा उस्फूर्तपणे उद्गार काढून ज्या भावना व्यक्त केल्या जातात त्या शब्दांना केवलप्रयोगी शब्द म्हणतात.

उदा. दुःख, आश्चर्य, आनंद, राग, द्वेष, तिरस्कार, अबब, वाहवा, अरेरे, हे देवा, अरे बापरे, हाय हाय, बाप रे बाप यासारखे शब्द.


केवल प्रयोगी अव्ययाचे प्रकार 9 आहेत
1. हर्षदर्शक केवलप्रयोगी अव्यय
अहाहा ,ओहो , वा , आहा, वावा

2. शोकदर्शक केवलप्रयोगी अव्यय 
अरेरे , ऊं , हायहाय, देवा रे, हाय, राम राम 

3. आश्चर्यकारक केवलप्रयोगी अव्यय 
बापरे , अगबाई, अबब , ओहो, अरेच्चा , ऑ

4. प्रशंसादर्शक केवलप्रयोगी अव्यय 
वाहवा , खासच, भारी, शाब्बास, छान

5. संमतिदर्शक केवलप्रयोगी अव्यय 
ठीक , बराय, हां , अच्छा

6. विरोधीदर्शक केवलप्रयोगी अव्यय 
अंहं , छे , छट, हॅट, उंहू, छे छे

7. तिरस्कारदर्शक केवलप्रयोगी अव्यय 
 छी , हट , थु:, शी , हुड , छत

8. संबोधनदर्शक केवलप्रयोगी अव्यय 
अरे , अगं, अहो , बा , ए

9. मौनदर्शक केवलप्रयोगी अव्यय :-  चुप, गप

पुढील मुद्दा- 8. उभयान्वयी अव्यय

शब्दांच्या जाती या मुख्य पानावर जाण्यासाठी येथे क्लिक करा.


अशीच माहिती मिळवण्यासाठी 'जीवन मराठी' ला सोशल मीडियावर फॉलो करा.
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads