Amazon

Ads Area

header ads
header ads

मालिकेत रंगला नवरात्रीबद्दल भोंडल्याचा खेळ- आई कुठे काय करते

टेलिव्हिजन वरील प्रत्येक मालिकेमध्ये प्रत्येक सण हा अतिशय उत्साहाने साजरा केला जात आहे. आणि या मालिकांमधून या सणांचे महत्त्व देखील सांगितलं जातं. आता छोट्या पडद्यावरील 'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte today episode) या मालिकेत नवरात्र सण साजरा केला जात आहे. या मालिकेत प्रत्येक सण आवर्जून साजरा केला जातो. 

देशमुख कुटुंबात गणपतीचा सण काही दिवसांपूर्वी दणक्यात साजरा करताना आपल्याला पाहायला मिळालं. त्याच पद्धतीने आज मालिकेमध्ये नवरात्र या सणानिमित्ताने भोंडल्याचा खेळ खेळताना दिसणार आहेत. सध्या तणावाचं वातावरण अरुंधतीच्या आयुष्यात आहे. मात्र अरुंधती चे सासु कांचन ह्या सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी आज पुढाकार घेत नवरात्रीचा सण साजरा करताना दिसणार आहे. 

भोंडल्याच्या दिवशी पाटावर रांगोळीने हाती काढत त्या हत्तीला पूजलं जातं. हा हत्ती काढून झाल्यानंतर त्या पाटाभोवती स्त्रिया आणि लहान मुले फेर धरून भोंडल्याची विशेष गाणी गातात आणि गाणी म्हणून झाल्यानंतर सर्वांनी आणलेली खिरापत तेथे बसून सगळ्यांमध्ये वाटून खाल्ली जाते. देशमुख यांच्या घरात भोंडला हा सण दरवर्षी साजरा होतो. त्यामुळे या सणाचं खास महत्व देशमुख कुटुंबियांसाठी आहे त्यामुळे या मालिकेमध्ये आज संपूर्ण कुटुंब हा खेळ उत्साहाने खेळताना दिसणार आहे.

आई कुठे काय करते या टेलिव्हिजनवरील मालिकेत सदर भागात अरुंधती ची सासू कांचन अरुंधतीला सांगताना दिसणार आहे. आज आपण घरी भोंडल्याचा कार्यक्रम आयोजित करणार आहोत. सोबत संजनाची तक्रार करताना दिसणार आहे. तर दुसरीकडे अरुंधतिच्या आश्रमात अडचणी येत असल्याचे दिसत आहे तर देशमुख कुटुंबीय दुसरीकडे भोंडल्याची तयारी करताना दिसत आहेत.

जाहिरात:

 देशमुख कुटुंबीय यांच्या घरी आनंदाचे वातावरण असून यामध्ये भर म्हणून यश कडे आणखी एक गुड न्यूज आहे मात्र या आनंदावर विरजण घालण्यासाठी संजना यश ला कुस्तीत पणे काही तरी बोलताना दिसणार आहे मात्र तिला प्रत्युत्तर देताना दिसेल तर पुढील भागामध्ये देशमुख कुटुंबीय भोंडला हा सण साजरा करत असताना गाणी गाताना आणि खेळ खेळत असताना दिसणार आहेत.


हा खेळ ज्यावेळी चालू असतो त्यावेळी संजना(aai kuthe kay karte sanjana) तिथे नसते मात्र नंतर ती हॉलमध्ये येते आणी हे सर्वजण आनंदाने खेळताना पाहून तिचा मात्र तीळपापड होतो. यावरून आता संजना कोणता तमाशा करणार? हे पाहण्यासाठी आपण 'आई कुठे काय करते' ही मालिका पाहत रहा.  ही मालिका आपल्याला डिस्ने प्लस हॉटस्टार या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर सुद्धा पाहता येणार आहे.(aai kuthe kay karte today episode written update)

अशाच महत्वाच्या साठी जीवन मराठी ला सबस्क्राईब करा
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

amazon ads