Amazon

Ads Area

header ads
header ads

मालिका बंद करा! 'या' कारणामुळे 'Aai kuthe ky krte' वर संतापले आहेत प्रेक्षक...

 स्टार प्रवाह वरील प्रचंड गाजलेली मालिका 'आई कुठे काय करते 'सध्या सोशल मीडियावर खूपच चर्चेत आहे. या मालिकेतील सर्वच पात्रांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्यामुळे हे प्रेक्षकांच्या आवडीचे आणि लाडके कार्यक्रम म्हणून ओळखला जाऊ लागला आहे .आता मालिकेत नवनवीन ट्विस्ट दाखवत असल्यामुळे मालिका खूपच रंजक ठरत आहे. पण अलीकडच्या काळात सोशल मीडियाद्वारे शिक्षकांचा विरोध होताना दिसत आहे .सध्या मालिकेत दाखवण्यात येणाऱ्या घटनांवर प्रेक्षक नाराज आहेत. त्या बाबतीत अनेक प्रतिक्रिया येत आहेत. ही मालिका बंद करण्यात यावी, चांगल्या मालिकेची पुन्हा माती केली, कुठे नेऊन ठेवले आहे मालिका.... अशा प्रकारचे अनेक प्रतिक्रिया नेटकर्यांनी केली आहे.




सध्या मालिकेत दाखवण्यात येत असलेल्या कथेप्रमाणे अरुंधती आणि अनिरुद्ध च्या घटस्फोटानंतर अरुंधती असूनही त्याच घरात राहते. आणि संजना ही लग्न करून त्या घरात राहत असल्यामुळे ते प्रेक्षकांना पसंत पडले नाही. आपल्या नवऱ्याच्या दुसऱ्या पत्नीसोबत एकाच घरात राहण कुठल्याही स्वाभिमानी स्त्रीला आवडलं नसतं ,असे प्रेक्षकांचे ठाम मत आहे. त्याचप्रमाणे एवढं सगळं होऊनही अरुंधती संजनाला मदत करताना दिसते तर दुसरीकडे संजना मात्र अनेकदा अरुंधती चा टोमणे मारत अपमान करताना दिसते .तरीही अरुंधती तिच्यामागे मदतीसाठी धावत असते .आता ऑफिस मध्ये घडलेल्या घटनांवर अरुंधती संजना ची साथ देणार आहे असे दाखवले आहे.

या घटनेवर नेटकरी प्रचंड संतापले आहे. एखाद्या स्त्रीवर अन्याय होत असेल तर तिच्या बाजूने नक्की लढा द्यावा पण येथे ती बाई चुकीची निवडली आहे .आता अरुंधती सिंगल मदर आहे"असे प्रेक्षकांचे मत आहे. 

सोबतच एका युजरने लिहिलं,"स्त्रीवर होणारे अन्याय सहन न करण्याचे अरुंधती धडे देते गेली पंचवीस वर्षे अनिरुद्ध करत असलेला अन्याय का सहन करत होती...

एका युजरने आपलं मत मांडत असे लिहिलं की," असं कुठेही होत नाही ज्या बाईने आपला पंचवीस वर्षांचा संसार मोडला त्या बाईसोबत एकाच घरात राहणं तिला मदत करणं समजून घेणं हे खर्‍या आयुष्यात घडत नाही"


अशा सर्व मालिकेत दाखवल्या जात असलेल्या घटनांमुळे प्रेक्षक संतापून ही मालिका बंद करण्यात यावे अशी मागणी केली आहे....

हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads