Amazon

Ads Area

header ads
header ads

'आई कुठे काय करते' मध्ये येणार नवीन ट्विस्ट..... काय आहे अरुंधती चा नवा निर्णय...

 स्टार प्रवाह वरील लोकप्रिय मालिका 'आई कुठे काय करते' हे आता एका वेगळ्याच टप्प्यावर येऊन थांबले आहे .अनेक  ट्विस्ट दाखवत असल्यामुळे प्रेक्षकांचा अगदी लाडकी मालिका म्हणून ओळखले जात आहे. मालिकेतील नवनवीन वळणे हे प्रेक्षकांना आतुरता आणि उत्सुकतेला भाग पाडते.
सध्या ज्या संजना मुळे अरुंधती चा संसार उध्वस्त झाला पण त्याच संजनाला ती मदत करताना दाखवत आहे.

कशाप्रकारे अरुंधतीने संजनाला साथ  देईल आणि दोघी मिळून मेहता ला धडा शिकवतील का पाहूया...

ही लोकप्रिय मालिका नवनवीन टप्प्या मुळे प्रेक्षकांना खूप हवीहवीशी वाटते पण सध्या मालिकेत वेगळाच ट्विस्ट दाखवला जात आहे. ज्या संजना मुळे अरुंधतीला घराबाहेर जावे लागले तिच्या आयुष्याला एक वेगळे वळण आले. त्याच संजनाला तिने मदत करताना दिसणार आहे. केवळ अरुंधती चा नाही तर संपूर्ण देशमुख कुटुंब अरुंधतीने घेतलेल्या निर्णयात साथ देणार आहे. हे सगळे मिळून संजनाला छळत असलेल्या मेहताला धडा शिकवणार आहेत. तर संजना देखील तिच्या बाजूने ठामपणे उभे राहणार्‍या अरुंधतीला वाईट-साईट बोलणाऱ्या मेहताच्या कानाखाली वाजवणार आहे.

कंपनीचे एक महत्वाचे प्रेझेन्टेशन देताना संजना कडून काही चुका घडतात .त्यामुळे मेहता तिला दोन महिने घरी बस असे काही सुनावतो. म्हणून संजनाला वाईट वाटत असताना तिला तिच्या नोकरी जाण्याची शक्यता निर्माण झाली असे तिला वाटू लागते.

आपली नोकरी वाचावी म्हणून अनेक प्रयत्न करत असते. त्यामुळे ति गणेश विसर्जनाच्या दिवशी मेहताला ऑफिसमध्ये भेटायला जाते. त्यावेळी मेहता तिला सांगतो नोकरी हवी असेल तर त्याच्या मागण्या पूर्ण करावे लागतील. हे संजना साठी धक्कादायक असते. त्या टेन्शन मध्ये ती घरी येते तिची अवस्था अरुंधती च्या लक्षात येते. आणि ती संजनाला खोदून खोदून विचारत संजना झालेला सर्व प्रकार घरातल्यांना सांगते तेव्हा सगळेजण संतप्त होतात आणि मेहता ला धडा शिकवण्याचा निर्णय घेतात . अरुंधती संजनाला मेहता विरोधातील लढ्यात तिच्यासोबत असल्याचे सांगते नंतर सर्व देशमुख कुटुंब संजनाला पाठिंबा देण्याचे ठरवतात.


नंतर हे सर्वजण मेहता ला धडा शिकवण्यासाठी एक प्लॅन टाकतात तो प्लॅन नेमका काय असतो ! संजना आणि अरुंधती मिळून कशा पद्धतीने मेहताला धडा शिकवतात . हे पुढे मालिकेत प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. दरम्यान मालिकेत लवकरच अभिषेक आणि अनघा चे लग्न होणार आहे त्यानंतर अनघा देशमुख यांच्या घरात सून म्हणून पाऊल ठेवणार आहे तरी त्यांचे लग्न निर्विघ्नपणे पार पडणारा की पुन्हा त्यात काही  अडचणी येणार हे मालिकेच्या पुढील भागातून प्रेक्षकांना कळेल....

हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads