Amazon

Ads Area

header ads
header ads

‘Mulgi Zali Ho’ मालिकेचे पूर्ण झाले 300 Episode

स्टार प्रवाह या टीव्ही चॅनेलवरील लोकप्रिय मालिका 'मुलगी झाली हो' या मालिकेचे 300 एपिसोड पूर्ण झाल्याची माहिती इंस्टाग्राम द्वारे स्टार प्रवाहच्या इन्स्टग्राम पेज वरून देण्यात आली.


सध्या या मालिकेत आपल्याला विविध वळणे पाहायला मिळत आहेत. शौनकवर साजिरीचे असलेलं प्रेम तर  शौनकवरचा विलासचा अविश्वास या कात्रीत साजिरी ही  अडकली आहे. मात्र या सगळ्या स्टोरीलाईनमध्ये 'मुलगी झाली हो' मालिकेने 300 भागाचा टप्पा  गाठला आहे. यावेळी स्टार प्रवाह वाहिनीने त्याच्या ऑफिशियल सोशल मिडियावर फोटो पोस्ट शेअर करत सर्वांचे आभार मानले आहेत.
आपण या 300 भागाच्या प्रवासात मोलाची साथ दिलीत आणि भरभरून प्रेम केलंत, त्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार..!! अस या पोस्ट मध्ये लिहीत ही मालिका पाहण्याऱ्या प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. सोबत निर्माते, लेखक, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ यांचे अभिनंदन आणि आभार मानले आहेत. 


Mulgi Zali Ho ही मालिका स्टार प्रवाह या भारतीय मराठी वाहिनीवर दाखवयण्यात येते. तर आपण ही मालिका डिस्ने प्लस हॉट स्टार या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर पाहू शकता. 'मुलगी झाली हो' मालिकेत शर्वानी पिल्लई, किरण माने, दिव्या पुगावकर आणि योगेश सोहनी मुख्य भूमिका आहे. पॅनरोमा एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडच्या बॅनरखाली सुझाना घई, हेमंत रुप्रेल आणि रणजीत ठाकूर यांनी मुलगी झाली हो या मराठी मालिकेची निर्मिती केली आहे. स्टार माँच्या तेलुगु मालिका 'मौना रागम'ची अधिकृत रिमेक आहे.


अश्याच अपडेट्ससाठी 'जीवन मराठी' ला सोशल मीडियावर फॉलो करा.

हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

amazon ads