Amazon

Ads Area

header ads
header ads

Ankush Chaudhari : ‘मी होणार सुपरस्टार’ रियालिटी शोचा दादर प्लाझा थिएटरमध्ये पार पडला अनोखा कार्यक्रम

21 ऑगस्ट पासून स्टार प्रवाह (Star Pravah Marathi) वर सुरु होत असलेल्या ‘मी होणार सुपरस्टार’ या कार्यक्रमाबद्दल प्रेक्षकांच्यात कमालीची उत्सुकता असून संस्कृती बालगुडे हीच खुमासदार सूत्रसंचालन, जबरदस्त परफॉर्मन्स सादर करणारे महाराष्ट्रामधल्या कानाकोपऱ्यामधले स्पर्धक, नृत्यदिग्दर्शनाची उत्त्तम जाण असलेले कृती महेश व वैभव घुगेसारखे कॅप्टन्स,  सोबत महाराष्ट्राचा सुपरस्टार म्हणजेच अंकुश चौधरी यांचं मोलाचं मार्गदर्शन यामुळे 'Mi Honar Suoerstar' हा कार्यक्रम प्रेक्षकांना चाहत्यांना भावणार आहे. तर या कार्यक्रमाच  निमित्त साधत मुंबईच्या दादर येथल्या प्लाझा थिएटर (Plaza Cinema Theatre) येथे 'मी होणार सुपरस्टार'चं डान्सिंग होर्डिंग अगदी दिमाखात झळकलं.
'मी होणार सुपरस्टार' या कार्यक्रमाचे सुपरजज Maharashtracha Superstar Ankush Choudhary यांच्या हस्ते जल्लोषपूर्ण वातावरणात या डान्सिंग होर्डिंगचं अनावरण करण्यात आलं. यावेळी 'मी होणार सुपरस्टार' कार्यक्रमामधले loins ग्रुप आणि मायनस थ्री हे ग्रुप्स उपस्थित होते. तर या दोन्ही ग्रुप्ससह डान्स करत  अंकुशने या कार्यक्रमाचा आनंद लुटला.
‘मी होणार सुपरस्टार’ या कार्यक्रमामध्ये राज्यातील एकापेक्षा एक स्पर्धक त्यांचं टॅलेंट या मंचावर दाखवत ग्रुप डान्स, सोलो डान्स, ड्युएट असे नृत्याचे अनोखे प्रकार या मंचावर दाखवणार आहेत. पहिल्यांदाच डान्सिंग होर्डिंग हा अनोखा प्रयोग 'मी होणार सुपरस्टार' रियालिटी शोचे प्रमोशन करण्यासाठी करण्यात आला आहे.
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads