Amazon

Ads Area

header ads
header ads

World Mosquito Day 2021 | डासांबद्दल ही माहिती माहीत आहे का?

भारतात इतके डास असण्याचं कारण काय?

भारतामध्ये असलेले हवामान हे अडथळा न आणता डासांची पैदास करण्यासाठी योग्य आहे, पावसाळा आपल्याकडे 4 ते 5 महिने असतो त्यामुळे त्यांना साधक हवामान मिळते तसेच उष्णकटिबंधीय हवामान डासांसाठी वरदान आहे. पावसाळ्यात सगळीकडे  साचलेले पाणी हे  डासांचे प्रजनन करण्यास उपयुक्त आहे.
डास या जीवाचा मानवाला अन्य जीवांच्या तुलनेत जास्त त्रास होतो. आपल्या खाद्याचा वास डासांना 165 फूट अंतरावर येतो. मानवी श्वासाचा वास डास घेऊ शकतात. मानवाच्या श्वासमध्ये असलेले कार्बन डिव्हाईड आणि लॅक्टिक ऍसिड हे डासांना आकर्षित करते.

जगभरात दरवर्षी सुमारे 700 मिलियन म्हणजे 70 कोटी लोक हे डास चावल्यामुळे आजारी पडतात तर त्यातील 10 लाखावर लोक मृत्यू पावतात. मलेरिया, डेंग्यू, वेस्ट नाईल विषाणू, चिकनगुनिया, पिवळा ताप आणि झिंका हे डासांमुळे होणारे सामान्य आजार आहेत. 

Mosquito Borne disease
डासांच्या जगभरात सुमारे 3000 प्रजाती( Species of Mosquitoes )आहेत. सर्वात मोठा डासाची लांबी 18 मिमी आणि पंख 24 मिमी आहे. त्याचे नाव टॉक्सोरिन्चाईट्स, ज्याला हत्ती मच्छर म्हणतात. 2019 या वर्षात संपूर्ण जगात सुमारे 22 कोटी मलेरिया केसेस आलेत तर 400,000च्या वर मलेरिया (malaria) मुळे मृत्यू झालेत. 2021 च्या जुलै महिन्यापर्यंत 85,304 चिकनगुनिया या आजाराची केसेस नोंदवली गेली असून यात ब्राझील, भारत, बेलीज, मलेशिया आणि पेरु या देशाचा समावेश आहे.
एलिफेंटियासिस या आजाराचीची सुमारे 12 कोटी केसेस दरवर्षी  नोंदवली जातात. 40 कोटी लोक जर वर्षी डेंग्यू (dengue fever) ने प्रभावित होतात. दरवर्षी येलो फिवर विषाणूमुळे 200,000 लोक प्रभावित होतात आणि 30,000 लोकांचा मृत्यू होण्याचा अंदाज आहे. 

डास याकडे होतात आकर्षित

डास हे गोऱ्या लोकांकडे अधिक आकर्षित होतात. त्याच सोबत अत्तर परफ्युम फुलांचा वास यांच्याकडे डास आकर्षित होतात. तसेच गडद रंगाकडे डास आकर्षित होतात कारण गडद रंग हा उंष्णता धारण करून ठेवतो.

डास होऊ नयेत या करिता उपाय

घराजवळ पाणी साचू देऊ नका. जुने टायर, टाकी, बॅरल, न वापरत आणि पाणी साचून राहण्यास उपयोगी साहित्य यात पाणी साचू देऊ नका. घराचे दरवाजे खिडक्या यांना बारीक जाळी लावून घ्या. शरीर उघडे ठेऊ नका. हलका रंग असलेले कपडे वापरा. गडद रंगाकडे डास लगेच आकर्षित होतात. मच्छरदाणी आणि डासांना पळवून लावणारे साहित्य यांचा आवशक तेवढा वापर करा.

World Mosquito Day 2021


हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या