Amazon

Ads Area

header ads
header ads

नाम(Noun) शब्दांच्या जाती- मराठी व्याकरण Information In Marathi

मराठी व्याकरणातील शब्दांच्या जाती भागात विकारी म्हणजे सव्यय शब्दांचा पहिला मुद्दा नाम(Noun) होय

एखाद्या वस्तूच्या, प्राण्याच्या किंवा काल्पनिक गोष्टीच्या नावास 'नाम' अस म्हंटल जात. 
हा एक शब्द असून तो विशिष्ट वस्तू किंवा वस्तूंच्या संचाचे नाव म्हणून कार्य करत असतो
उदा. सजीव प्राणी, ठिकाणे, क्रिया, गुण, अस्तित्वाची स्थिती किंवा कल्पना.
उदा. राम, घर, धाडस, वृक्ष, पर्वत, शिखर....


आता या नामाचे सुद्धा 3 प्रकार आहेत. 
1. सामान्य नाम 2. विशेष नाम 3. भाववाचक नाम

1. सामान्य नाम
एकाच जातीच्या पदार्थामधील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला मिळालेले नाव म्हणजे 'सामान्य नाम' होय.

उदा. बैल, गाय, म्हैस, शेळी, पर्वत, टेकडी, डोंगर, घर, शाळा, विद्यालय, भांडे, नदी, मूल, मुलगा, मुलगी, तलाव, सरोवर,ओढा, पुस्तक...

2. विशेष नाम 
एकाच जातीच्या विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होतो त्या नावास 'विशेष नाम' असे म्हणतात.

उदा. गंगा, युमुना, कृष्णा, राम, तुकाराम, नामदेव, गणेश, कपिला, महादेव, सह्याद्री,

3. भाववाचक नाम
एखाद्या प्राण्यातला किंवा पदार्थातला गुणांचा, भावांचा अथवा धर्माचा बोध होतो त्या नामास 'भाववाचक नाम' अस म्हंटल जात.

उदा.3. सामान्य नाम आणि विशेषण यांना य, त्व, पण, पणा, ई, ता, की, गिरी, वा, आई... असे प्रत्यय लावुन भाववाचक नाम किंवा धर्मवाचक नाम तयार होतात.

उदा. सौंदर्य, गांभीर्य माधुर्य, धैर्य, शौर्य, 
मनुष्यत्व, प्रौढत्व, ममत्व, मित्रत्व, शत्रुत्व, 
गोडी लबाड़ी
लहानपण,शहाणपण, देवपण, मोठेपण 
प्रामाणिकपणा, शहाणपणा, 
गरिबी, श्रीमती, वकिली, शिक्षकी,
आपुलकी, पाटीलकी, भिक्षुकी
समता, समानता, गारवा समता, शांतता, क्रूरता, नम्रता दादागिरी, फसवेगिरी, गुलामगिरी, लुच्चेगिरी,
महागाई, नवलाई, चपळाई, खोदाई, धुलाई

पुढील मुद्दा- 2.सर्वनाम

शब्दांच्या जाती या मुख्य पानावर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

अशीच माहिती मिळवण्यासाठी 'जीवन मराठी' ला सोशल मीडियावर फॉलो करा.


हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

amazon ads