Amazon

Ads Area

header ads
header ads

मन उडू उडू झालं ! तब्बल 50 फूट वरून या सीन चे चित्रीकरण . इंद्रा आणि दिपू दोघेही घाबरले.

 झी मराठीवरील तुमच्या आमच्या सर्वांच्या आवडतीची आणि लोकप्रिय ठरणारी  नवीन आलेली मालिका म्हणजे 'मन उडू उडून झालं.' ऋता दुर्गुले आणि अजिंक्य राऊत अर्थात इंद्रा आणि दिपू यांच्या भन्नाट जोडीमुळे प्रेक्षक मालिका पाहण्यास खूप उत्सुक असतात.या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.


पण सध्या एका वेगळ्याच गोष्टीची सोशल मीडियावर चर्चा होताना दिसते आहे. या मालिकेत एका सीनमध्ये  जबरदस्त चित्रीकरण झाल्याचं ऐकण्यास मिळत आहे.

या सिनचे वैशिष्ट्य म्हणजे या मध्ये तब्बल ५० फूट उंचीवर जाऊन चित्रीकरण केले असे समजत आहे.पाहूया काय आहे हा आश्चर्यकारक चित्रीकरण....

आकाशाला गवसणी घालणारी हॉट एअर बलून मध्ये त्यांनी हे सिन चित्रीकरण केल्याचे दिसून येत आहे.


याबाबतीत ऋता दुर्गुले काय म्हणाली," मला अजूनही विश्वास बसत नाही की आम्ही असा सीन चित्रीत केला हे माझ्या कल्पनेच्या पलीकडचं होतं.सुरुवातीला आम्ही घाबरलो होतो. पण एकदा आकाशात वर गेल्यावर आणि ऍक्शन म्हटल्यावर ती भीती नाहीशी झाली हे चित्रीकरण करणं आव्हानात्मक होतं." त्यांचा हा भरारीचा प्रसंग प्रेक्षकांना लवकर दाखवण्यात येईल.

या मालिकेत या चित्रीकरणाचे अनेक सिन प्रेक्षकांना पाहण्यास मिळणार आहेत. तर हा सुद्धा प्रसंग प्रेक्षकांना उत्सुकता निर्माण करून सर्वजण त्या सीनची वाट बघत आहेत.

हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads