Amazon

Ads Area

header ads
header ads

दिवाळी म्हणजे काय? का साजरी केली जाते दिवाळी? अन दिवाळीला इतकं महत्व का आहे? What is Diwali and why is it celebrated?

आपला भारत देश विविधतेने नटलेला आहे. या देशात प्रत्येक महिन्यात एक सण असतोच. पण दिवाळी सणाला विशेष महत्व आहे. दिवाळी सणाचे महत्व हिंदू धर्मात खूप असून प्रत्येक वर्षी हा सण केव्हा येईल याची वाट सर्वजण पाहत असतात आपल्याला माहित आहे दिवाळी कधी आहे? वाचा
मात्र हा दिवाळी सण आपण का साजरा करतो? हे आपल्याला माहित नसेल किंवा आपल्यापैकी बऱ्याच जणांना दिवाळी हा सण 'रामाच्या अयोध्येतील अगमना'मुळे साजरा केला जातो ही कथा माहित असेल. 



दिवाळी सणाला इतकं महत्त्व का? या माग सर्वश्रुत असणारी कथा म्हणजे 'राम आगमन' म्हणजेच रावणाचा वध करून, 14 वर्षांचा वनवास पूर्ण करून श्रीराम, सीता आणि लक्ष्मण आपल्या अयोध्येत येतो, म्हणून अयोध्येत राहणारे लोक अतिशय आनंदी होऊन हा सण साजरा करतात. या दिवशी अमावास्या असल्याने अंधार असतो त्यामुळे अयोध्येतील लोक दिवे लावून दिपोत्सव साजरा करत अयोध्येत आलेल्या रामाचे स्वागत करतात. म्हणून दिवाळी साजरी केली जाते.

मात्र या लेखात जाणून घेऊया अशी आणखी काही कारण ज्यामुळे आपल्याला दिवाळीच महत्व आणखी पटेल. किंवा दिवाळीला आपण इतकं महत्व का देतो. 

दिवाळी कधी आहे?

या वर्षी दिवाळी (Diwali 2021 in Maharashtra) 4 नोव्हेंबर ला आहे. म्हणजे या दिवशी आपण सर्वजण लक्ष्मी कुबेर पूजन किंवा लक्ष्मी पूजन करतो. Divali हा सण सहा दिवसाचा असतो. शरद ऋतूच्या ऐन मध्यभागी, आश्विन व कार्तिक या महिन्यांच्या संधिकालात हा सण येतो. आश्विन वद्य द्वादशी ते कार्तिक शुद्ध द्वितीया या सणाचे असतात. आपण या सहा दिवशी दिपोत्सव साजरा करतो. फटाके फोडतो. 

दीपावलीचे सहा दिवस

दिपावलीच्या पहिल्या दिवशी आपण बसुबारस साजरा करतो. दुसऱ्या दिवशी धनत्रयोदशी असते, तिसऱ्या दिवशी नरक चतुर्थी असते तर मुख्य दिवशी म्हणजे चौथ्या दिवशी लक्ष्मी पूजन असते. पाचव्या दिवशी आपण बलिप्रतिपदा करतो. तर सहाव्या दिवशी आपण भाऊबीज साजरा करतो. 

चला आता जाणून घेऊ फक्त 'रामाचं अयोध्येतील आगमन' कारण आहे का'?

दिवाळी सणाला फक्त प्रभू राम यांचं अयोध्येत आगमन हेच कारण आहे असं म्हणता येणार नाही. या मागे अजून भरपूर कारणं आहेत. 

1. लक्ष्मी देवतेचा जन्म
हिंदू धर्मामध्ये लक्ष्मी देवीला खूप महत्व आहे. लक्ष्मी देवी ऐश्वर्य, शांती, सौन्दर्य, समृद्धी, संपत्ती, सत्याची अधिष्ठात्री देवी आहे. या लक्ष्मी देवीचा जन्म या दिवशी झाला अस शास्त्रानुसार मानलं गेलं आहे. म्हणून दीपावलीच्या मुख्य दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते.

2. विष्णूं देवाचा वामन अवतार
वामन अवतार हा भगवान विष्णू यांच्या दशावतारापैकी पाचवा अवतार आहे. प्रजाहितदक्ष, दानशूर आणि बलाढ्य असलेल्या बळीराजाने आपल्याला सामर्थ्यावर देवांचे राज्य जिंकून देवांना आणि लक्ष्मी देवीला बंदिवासात टाकले. त्यावेळी भगवान विष्णू यांनी वामन अवतार घेत देवी लक्ष्मीला राजाच्या बंदिवासातून सोडवले. आणि बळीराजाला पाताळात दडपले त्यावेळी बळी राजाने वर मागितला "जो कोणी आश्‍विन वैद्य त्रयोदशीपासून अमावास्येपर्यंत तीन दिवस यमाप्रीत्यर्थ दीपदान करील त्याला यमयातना भोगाव्या लागू नयेत व त्याच्या घरामध्ये लक्ष्मीचे निरंतर वास्तव्य राहील" हा वर वामनाने मान्य केला. म्हणून दिवाळी साजरी केली जाते. 

3. नरकासुराचा वध

भूदेवीकडून प्राग्‌ज्योतिषपुराचा राजा नरकासुर यास वैष्णवास्त्र मिळाले. त्यामुळे तो  रयतेवर आणि देवादिकांना त्रास दयायला लागला. बऱ्याच राज्यांमधल्या काही राजांना आणि 16,100 राजकन्यांना बंदिवासात  ठेवले. या कारणामुळे नरकासुरापासून झालेल्या अत्याचाराने त्रस्त असलेल्या प्रजेने राजा इंद्रास आपली तक्रार सांगितली. त्यांनंतर राजा इंद्राने नरकासुराच्या जाचातून प्रजेला सोडवण्याची विनंती श्रीकृष्णास केली. यावेळी श्रीकृष्णाने नरकासुराला ठार केले आणि बंदीमध्ये असलेल्या राजकन्यांची सुटका केली. म्हणून नरकासुराचा वध केलेल्या दिवशी आनंद व्यक्त करत दीपोत्सव साजरा केला जातो म्हणून दिवाळी साजरी केली जाते असे कारण आहे.

4. पांडव अज्ञातवासातून परतले

द्युत खेळात पराभूत झाल्यानंतर पांडवांनी बारा वर्षे अज्ञातवासात घालवले. कार्तिक अमावस्या दिवशी अज्ञातवासातुन परत आले. म्हणून हस्तिनापुरमधील रयतेने दिवे लावत त्याचं स्वागत केलं होतं. 

5. समुद्रमंथनामधून लक्ष्मी आणि कुबेर प्रकट 

देव आणि राक्षस मिळून अमृत मिळवण्यासाठी समुद्रमंथन केले होते. ही समुद्रमंथन खूप वर्ष चालू होते. या मंथनातून सर्वात प्रथम विष आले. मात्र या विषाच्या ज्वाला असल्याने तिन्ही लोकांमध्ये हाहाकार माजला. त्यावेळी शंकराने त्या ज्वाला आपल्या कंठामध्ये धारण केल्या. नंतर या समुद्रमंथनात चौदा रत्ने मिळाली. त्यात श्री रंभा, विष, वरूण, अमृत, शंख, धेनू, गजराज, धनू, कल्पद्रुम, धन्वंतरी, शशी, बाज आणि मणी त्यापैकी एका रत्नाच्या रूपात लक्ष्मीचा जन्म झाला.
 
या सर्व रत्नांचे देव आणि राक्षसांनी वाटप करून घेतले.  देवी लक्ष्मीला भगवान विष्णूने अर्धांगिनीच्या रूपात स्वीकार केला. पौराणिक मान्यतेनुसार देवी लक्ष्मी ही दिवाळीच्या दिवशी समुद्रमंथनातून देवी लक्ष्मी प्रकटली होती. लक्ष्मी देवी सोबत कुबेर प्रकटले होते. यावेळी लक्ष्मीने संपूर्ण प्राण्यांना सुख-समृद्धीचे वरदान दिले. 

6. शिखांचे सहावे गुरु हरगोविंद साहब यांची सुटका 

शिख धर्मीयांसाठी दिवाळी सणाचे महत्व खूप आहे. कारण १५७७ मध्ये दिवाळी दिवशीच अमृतसर येथल्या सुवर्ण मंदिराची पायाभरणीची सुरवात झाली होती. तर पुढे १६१८ मध्ये शिखांचे सहावे गुरु हरगोविंद सिंह यांची बादशाह जहांगीर याच्या कैदेतून सुटका दिवाळी दिवशी झालेली.

7. भगवान महावीर यांचे निर्वाण

जैन धर्मियांसाठी दिवाळी सण महत्वाचा आहे कारण  या दिवशी भगवान महावीर यांना निर्वाण प्राप्ती झाली, असे मानले जाते.

असे आहे दिवाळीचे महत्व. म्हणूनच divali हा सण संपूर्ण भारतात आणि हिंदू धर्मीयांत साजरा केला जातो. या सहा दिवशी दीपोत्सव केला जातो. फटाके फोडले जातात. उत्सव साजरा केला जातो. 

आपल्याला ही माहिती कशी वाटली नक्की सांगा. 
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या