Amazon

Ads Area

header ads
header ads

दिवाळी शुभेच्छा संदेशपत्रे मराठीमध्ये: व्हाट्सऍप, फेसबुक, इंस्टाग्राम व इतर सोशलमिडियावर शेअर करता येणार मराठी स्टेटस | Happy Diwali Wishes 2021

Diwali Information in Marathi:
भारतात दिवाळी हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. दिपावली हा सण हिंदू धर्मीयांसाठी खूप महत्त्वाचा सण आहे. दीपावली सण 4 ते 5  दिवस साजरा केला जातो. दिवाळी 2021 ची तारीख 4 नोव्हेंबर असून 2 तारखेला धनत्रयोदशी आहे. जर वर्षी या आठवड्यात आपण सर्वाना 'दिवाळीच्या शुभेच्छा' देतो. या वर्षी सुद्धा आपण Happy Diwali Wishes 2021 सर्च करणार आहात. या दिवाळीवेळी आपण सर्च करत असताना Diwali Wishes 2021, Happy Diwali Photo Download 2021, Diwali 2021 Images, Divali 2021 status, दिवाळी स्टेटस, दिवाळी व्हाट्सऍप स्टेटस सर्च करणार आहात. आपल्याला मदत व्हावी म्हणून आम्ही तुम्हाला आमच्या जीवन मराठी.कॉम वेबसाईटच्या माध्यमातून Happy Divali Photos, Divali Status, Divali Wishes, Happy Divali Images देऊन मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत.

हे दिवाळी स्टेटस आपण आपल्या व्हाट्सऍप, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, शेअरचॅट, कू, या सारख्या सोशल मीडियावर शेअर करू शकणार आहात. 

शेअर करण्यासाठी दिलेल्या इमेजवर क्लिक करून डाऊनलोड इमेजवर क्लिक करून दिवाळी 2021 चे स्टेटस डाउनलोड करून शकता. 

Diwali Wishes in Marathi:
आम्ही आपल्याला Diwali Status Marathi मध्ये देणार आहोत. हे diwali quotes in marathi नक्की शेअर करा.
jeevan marathi diwali image status 

छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने
पावन झालेल्या भुमीत,
आई जगदंब देवीच्या कृपेने,
तुम्हाला व तुमच्या सहपरिवाराला
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

Divali Pic for status marathi

उटण्याचा सुगंध, रांगोळीचा थाट,
दिव्यांची आरास, फराळाचे ताट,
फटाक्यांची आतिषबाजी, आनंदाची लाट,
नूतन वर्षाची चाहूल दिवाळी पहाट...
दिपावलीच्या तुम्हाला व तुमच्या सहपरिवाराला हार्दिक शुभेच्छा💐

Marathi Diwali Banner Download
उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन,
आली आज पहिली पहाट,
पणतीतल्या दिव्याच्या तेजानी,
उजळेल आयुष्याची वहिवाट!!!
शुभ दीपावली आणि सुरक्षित दीपावली💐
jivan marathi Shubh Diwali in Marathi photo

जीवन मराठी दिवाळी 2021 स्टेट्स
दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी, 
सुखाचे किरण येती घरी, 
पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा, 
आमच्याकडुन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

Square Banner Images for Diwali 2021
पुन्हा एक नवे वर्ष, पुन्हा एक नवी आशा, तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी दिशा नवे स्वप्न, नवे क्षितीज, सोबत माझ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
जीवनमराठी स्टेटस फॉर दिवाळी विश

स्नेहाचा सुगंध दरवळला,
आनंदाचा सण आला.
विनंती आमची परमेश्वराला,
सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला. 
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
Marathi Banner For Diwali 

Diwali greetings in Marathi / दीपावलीच्या शुभेच्छा
या लेखात आपल्याला मराठी दिवाळी शुभेच्छापत्रे देण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्याला ही मराठी दिपावलीची शुभेच्छा संदेशपत्रे आवडली असतील असा आमचा मानस आहे.

अश्याच नव्या प्रत्येक सणाच्या शुभेच्छासंदेशपत्रांसाठी 'जीवन मराठी' ला सोशल मीडियावर फॉलो करा.

दिवाळी शुभेच्छा टेटस डाउनलोड

उटणंचे अभ्यंगस्नान 
रांगोळीची प्रसन्नता 
दिव्यांची रोषणाई 
फराळाचा बेत 
फटाक्यांची आतिषबाजी 
थोऱ्या-मोठ्यांचे आशीर्वाद 
शुभेच्छांची देवाण-घेवाण 
उत्साही-आनंदी वातावरण 
असाच असो दिवाळीचा सण 
आपल्या माणसांना आपल्या माणसांकडून दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा💐💐

दिवाळी कोट्स इन मराठी

संपू दे अंधार सारा 
उजळू दे आकाश तारे 
गंधाळल्या पहाटेस 
येथे वाहू दे आनंद वारे…. 
जाग यावी सृष्टीला 
की होऊ दे माणूस जागा 
भ्रष्ट सारे नष्ट व्हावे 
घट्ट व्हावा प्रेम धागा… 
स्वच्छ सारे मार्ग व्हावे 
अन् मने ही साफ व्हावी 
मोकळ्या श्वासात येथे 
जीवसृष्टी जन्म घ्यावी… 
स्पंदनांचा अर्थ येथे 
एकमेकांना कळावा 
ही सकाळ रोज यावी 
माणसाचा देव व्हावा... 
आजपासून सुरू होणाऱ्या दिवाळीच्या …सगळ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा!!!

आपल्याला आवडलीलेली दिवाळी शुभेच्छा संदेश आमच्या कमेंटसेक्शनमध्ये लिहायला विसरू नका. आणि हे शुभेच्छा संदेशपत्रे कसे वाटले नक्की सांगा.
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या