Amazon

Ads Area

header ads
header ads

स्टार प्रवाह वरील 'सुख म्हणजे नक्की काय असतं' असतं ही मालिका होणार बंद | Sukh Mhanje Nakki Kay Asta

Star Pravah Serial Going Off Air: स्टार प्रवाह वरील अनेक मालिकांनी गेल्या काही महिन्यात प्रेक्षकांचा निरोप घेतलाय. यामध्ये आणखी एक मालिका बंद होणार आहे.
Marathi Serials | 
प्रेक्षकांचा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका म्हणजे अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. त्यातील काही मालिका चांगल्या कथानकासह वर्षानुवर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतात तर काही मालिका प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवतात, तर काही विस्मरणात जातात. तर काही मालिका कथानक संपल्याने किंवा कमी टीआरपीमुळे(TRP) प्रेक्षकांचे निरोप घेतात.'स्वाभिमान' ,'सहकुटुंब सहपरिवार', 'रंग माझा वेगळा', ह्या मालिकांनी गेल्या महिन्याभरात प्रेक्षकांचा निरोप घेतला. आता आणखी एक मालिका या मालिकांच्या पाठोपाठ बंद होण्याच्या मार्गावर आहे.  

'ह्या' मालिकेच्या जागी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे 'लक्ष्मीच्या पावलांनी' ही मालिका

लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेत अक्षर कोठारी आणि ईशा केसरकर हे मुख्य पात्र निभावणार आहेत. 'लक्ष्मीच्या पावलांनी' या मालिकेची वेळ रात्री 9 वाजून 30 मिनिटाची ठरवली आहे. तर यावेळी सध्या सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका सुरू आहे. 'लक्ष्मीच्या पावलांनी' (Lakshmichya Pavlani)या मालिकेची वेळ कळताच प्रेक्षकांनी 'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही मालिका बंद होण्याचा अंदाज लावला होता. पण 'सुख म्हणजे नक्की काय असतं' (Sukh Mhanje Nakki Kay Asta) या मालिकेबद्दल नवीन माहिती समोर आली आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत राहणार आहे पण 9:30 ला नसून  ही मालिका 10 वाजता लागणार आहे. 'टिपक्यांची रांगोळी'(Tipkyanchi Rangoli) दहा वाजता प्रसारित होणारी ही मालिका आता प्रेक्षकांचे निरोप घेणार आहे. टिपक्यांची रांगोळी या मालिकेचे प्रेक्षक स्टार प्रवाह चॅनेलवर नाराज आहेत.

स्टार प्रवाह(Star Pravah) चैनलच्या निर्णयाचा प्रेक्षक विरोध करत आहेत. प्रेक्षक 'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेऐवजी दुसरी मालिका बंद करा याची विनंती करत आहेत किंवा या मालिकेची वेळ बदलण्यात यावी अशी प्रतिक्रिया प्रेक्षक देत आहेत. 20 नोव्हेंबर पासून प्रेक्षकांच्या भेटीला 'लक्ष्मीच्या पावलांनी' ही मालिका येणार आहे.
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या