Amazon

Ads Area

header ads
header ads

मृणाल कुलकर्णींची शिवानी रांगोळेच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट; म्हणाली.... | Shivani Rangole Sasubai Mrinal Kulkarni

Tula Shikvin Changlach Dhada: 'तुला शिकवीन चांगला धडा' या मालिकेतून शिवानी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
अभिनेता विराज कुलकर्णी (Virajas Kulkarni) आणि अभिनेत्री शिवानी रांगोळी (Shivani Rangole) हे दोघे मराठी मनोरंजक सृष्टीतील एक लोकप्रिय जोडपं आहे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर गेल्या वर्षी या दोघांनी लग्न गाठ बांधली. गेल्या काही वर्षापासून शिवानी विराजस (Shivani Virajas)या दोघांमध्ये चांगली मैत्री होती. शिवानीचे लग्नाआधी च विराजसच्या कुटुंबांची खूप चांगली बॉण्डिंग तयार झाली होती. मृणाल कुलकर्णी यांची शिवानी ही अत्यंत लाडकी झाली आहे. मृणाल कुलकर्णी यांनी शिवानी लाडक्या सुनेसाठी वाढदिवसानिमित्त खास पोस्ट लिहिली आहे.

अभिनेत्री शिवानी रांगोळी आणि अभिनेत्री मृणाल कुलकर्णी (Mrunal Kulkarni) मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय सासु सुनेची जोडी आहे. त्या दोघी अनेक कार्यक्रमांना एकत्र हजेरी लावताना दिसतात. त्या दोघी एकमेकीबद्दल त्यांना वाटणार प्रेम हे सोशल मीडियावर देखील व्यक्त करत असतात. तर मृणाल कुलकर्णी यांनी आज शिवानी च्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मनातील एक इच्छा एका पोस्टद्वारे व्यक्त केली आहे.

अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी शिवानी चा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत लिहिलं, "सुनबाई कम सून!!प्रिय शिवानी, तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा ! गेले २-३ महिने अविरत कष्ट करते आहेस .. तेही हसतमुखाने… न दमता-न कंटाळता !अक्षरा उर्फ मास्तरीन बाई “तुला शिकविन चांगलाच धडा” मालिकेतून लोकप्रिय झाली आहेस. तुझ्या या यशाचा
आम्हाला खूप आनंद आहे.तसेच अभिमान सुद्धा आहे! तुझी सारे स्वप्न पूर्ण होऊ दे! आणि अशीच खूप यशस्वी हो...आनंदी रहा ! खूप खूप प्रेम ! (ता. क.- पण सून, come soon g ! Miss you! तुझे लाड कधी करायचे आम्ही?)

 ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’या मालिकेतून शिवानी सध्या प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. शिवानी मालिकेच्या शूटिंगच्या निमित्ताने ती तिच्या घरापासून लांब राहत आहे. शिवानी च तिच्या कामाचं या मालिकेतून प्रेक्षकांकडून खूप कौतुक होत आहे. तर आता प्रेक्षक शिवानी च्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मृणाली कुलकर्णी यांच्या पोस्टवर कमेंट करत वर्षाव करत आहेत.
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या