Amazon

Ads Area

header ads
header ads

Marathi Serial TRP: जुई गडकरी अभिनित 'ठरलं तर मग' ही मराठी मालिका ठरली TRP मध्ये नंबर वन

Marathi Serial TRP Rating : मराठी मालिकेच्या विश्वात सारखे काही ना काहीतरी नवनवीन प्रयोग. मालिकेचे निर्माते प्रेक्षकांना मालिका बघत राहण्यासाठी  काही ना काहीतरी नवीन ट्विस्ट घेऊन येत असतात. मालिकांसोबतच प्रेक्षकांचे लक्ष मालिकेच्या टीआरपी रेटिंग कडे देखील असते. अनेकदा टीआरपी रिपोर्टमध्ये  देखील बघायला मिळतो. या आठवड्याचे टीआरपी रिपोर्ट नुकताच सगळ्यांसमोर आला आहे. 'ठरलं तर मग' या मालिकेने या आठवड्यात देखील टीआरपीच्या शर्यतीत बाजी मारली आहे. चला तर जाणून घेऊया या लेखांमधून टॉपच्या दहा कोणत्या मालिका आहेत ज्या टीआरपीत अव्वल आहेत. 

1.'ठरलं तर मग' (Tharla Tar Mag)  ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर आहे. या मालिकेचा रेटिंग 6.9 मिळाले आहे.

2. दुसरा क्रमांकवर 'तुझेच मी गीत गात आहे' (Tuzech Mi Geet Gaat Aahe) ही मालिका आहे. या मालिकेचा 6.8 रेटिंग मिळाले आहे.

3. तिसरा क्रमांक वर 'सुख म्हणजे नक्की काय असतं'(Sukh Mhanje Nakki Kay Asta) टीआरपीच्या शर्यतीत असून या मालिकेला 6.3 रेटिंग मिळाला आहे.

4. 'प्रेमाची गोष्ट' (Premachi Gost) तेजश्री प्रधानची ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. ही मालिक टीआरपीच्या शर्यत मध्ये तिसऱ्या स्थानावर आहे.या मालिकेला 6.3 रेटिंग मिळाले आहे.

5. 'आई कुठे काय करते'(Aai Kuthe Kay Karte) ही मालिका  लिस्ट मध्ये पाचव्या क्रमांकावर आहे या मालिकेला 6.0 रेटिंग मिळाले आहे.

6. 'कुन्या राजाची गं तू रानी'('Kanya Raja chi g tu Rani') ही मालिका सहाव्या क्रमांकावर आहे. टीआरपी लिस्टनुसार या मालिकेला 5.5 रेटिंग मिळाले आहे

 7. सातव्या क्रमांकावर 'टिपक्यांची रांगोळी'('tipkyanchi rangoli')ही मालिका आहे. टीआरपीनुसार 5.4 रेटिंग या मालिकेला मिळाले आहे.

8.' मन धागा धागा जोडते नवा'('man dhaga dhaaga jodte namah') ही मालिका आठवा क्रमांक वर आहे. टीआरपीच्या शर्यतीत या मालिकेला 5.3 रेटिंग मिळाले आहे.

9. आठव्या क्रमांकावर 'अबोली'('Aboli') ही मालिका आहे. या मालिकेला टीआरपी रिपोर्ट मध्ये 4.7 रेटिंग मिळाले आहे.

10. दहाव्या क्रमांकावर 'शुभविवाह' ('shubhvivah')ही मालिका आहे या मालिकेला टीआरपी लिस्ट नुसार 4.5 रेटिंग मिळाले आहे.


सर्वाधिक रेटिंग 'ठरलं तर मग'च्या महाएपिसोडला

छोट्या पडद्यावरील ठरलं तर मग ही लोकप्रिय मालिका असून टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर गेला कित्येक आठवड्यापासून ही मालिका आहे. सर्वाधिक रेटिंग या मालिकेच्या महाएपिसोडलाही मिळाले आहे. 5.5 रेटिंग 'ठरलं तर मग' या मालिकेच्या महाएपिसोड ला मिळाले आहे.

'ठरलं तर मग' ही मालिका दर आठवड्याला टीआरपी शर्यती मध्ये नवीन उच्चांक गाठत आहे. 'ठरलं तर मग' ही मालिका महाराष्ट्राची नंबर वन मालिका बनली आहे. या मालिकेवर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. ठरलं तर मग या मालिकेतील सायली आणि अर्जुन मधील केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडत आहे. या मालिकेचे निर्माते सुचित्रा बांदेकर, आदेश बांदेकर, आणि सोहम बांदेकर आहेत.








हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या