Amazon

Ads Area

header ads
header ads

माजी खा. राजू शेट्टी यांची आक्रोश यात्रा आज सांगलीत

राज्यातील साखर कारखान्यातील वजन काटे ऑनलाईन व डिजिटल करावे. उसाचा दुसरा हप्ता प्रति टन 400 इतके करावे. माजी खा. राजू शेट्टी यांनी या मागणीसाठी 17 आक्टोबरपासून पासून आक्रोश यात्रेसाठी सुरुवात केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते भागवत जाधव यांनी आक्रोश यात्रा सांगली जिल्ह्यात प्रवेश करणार असल्याची माहिती दिली आहे.
भागवत जाधव म्हणाले गेल्या महिन्यापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तर्फे 1 जुलैपासून जनजागृती अभियानाला सुरुवात केली आहे. उपप्रादेशिक साखर आयुक्त कोल्हापूर कार्यालयावर 13 सप्टेंबर रोजी विराट मोर्चा काढण्यात आला होता.

सांगली जिल्ह्यात 2 ऑक्टोंबर गांधी जयंतीच्या दिवशी प्रत्येक साखर कारखान्यावर ढोल बजाव आंदोलन करण्यात आले होते. तरीसुद्धा साखर कारखान्यातील लोकांना जाग येत नव्हती. कोल्हापूर व सांगली सातारा जिल्ह्यातील 522 किलोमीटर अंतराच्या खा.राजू शेट्टी यांनी पायी प्रवास करण्याचा निश्‍चित करण्यात आला.

सांगली जिल्ह्यामधील शिराळा तालुक्यात आज यात्रेचा प्रवेश होणार असून दिनांक 28 ऑक्टोंबर रोजी निनाई दालमिया शुगर करंगळी, दिनांक 29 रोजी विश्वासराव नाईक साखर कारखाना चिखली, तर दिनांक 30 सप्टेंबर या दिवशी राजारामबापू पाटील साखर कारखाना युनिट क्रमांक दोन वाटेगाव, 31 ऑक्टोंबर रोजी सातारा जिल्ह्यात प्रवेश होऊन कृष्णा सहकारी साखर कारखाना शिवनगर.  

दिनांक 1 नोव्हेंबर रोजी क्रांती सहकारी साखर कारखाना कुंडल आणि राजारामबापू पाटील साखर कारखाना साखराळे तर 2 नोव्हेंबर रोजी हुतात्मा किसन आहेर साखर कारखाना ठिकाण वाळवा 4 नोव्हेंबर रोजी सांगली येथील वसंतदादा साखर कारखाना पाच नोव्हेंबर रोजी आष्टा येथील सर्वोदय सहकारी राजारामबापू पाटील साखर कारखाना युनिट क्रमांक तीन अशा प्रमुख साखर कारखान्यांवर ही पदयात्रा जाणार असून त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश ह्या पदयात्रेचा होणार आहे. जयसिंगपूर येथे सात नोव्हेंबर रोजी ऊस परिषद भरणार असून येथे ऊसदराची आणि आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे. 

प्रत्येक गावागावातून घरची भाकरीची शिदोरी पदयात्रेचा मुक्काम करणार आहे. वाळवा, नांद्रे ,तुंग, तांबवे, रेठरे, कुंडल, हरणाक्ष ,पाडळी, बिळाशी या गावात मुक्काम होणार आहे. अशा या गावातून व जवळपासच्या खेडेगावातून प्रत्येक घरातून सुकी भाजी व दोन भाकरी गोळा करून पदेयात्रेतील शेतकऱ्यांना जेवण करण्याची सोय करण्यात येणार आहे. दुसरा हप्ता 400 रुपये जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत ऊस तोडायला घेऊ नका, असे आवाहन करण्यात आले आहे.


हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या