Amazon

Ads Area

header ads
header ads

'बाईपण भारी देवा' नंतर केदार शिंदेंनी केली 'या' सिनेमाची घोषणा | आता येणार Aaipan Bhari Deva मराठी चित्रपट

Kedar Shinde New Movie Aaipan Bhari Deva: पुरुषाने मोठ्या प्रमाणात पहावी अशी अपेक्षित असलेली  ''बाईपण भारी देवा'' (Baipan Bhari Deva) हा सिनेमा.या सिनेमाला फक्त स्त्रियांनीच प्रचंड गर्दी केली होती आणि फक्त स्त्रियांमुळेच या सिनेमाला ८० कोटीचा व्यवसाय मिळाला. केदार शिंदेंना या सिनेमातून प्रचंड यश मिळालं. पुढचा सिनेमा कोणता असेल असे लोक विचारतात. अशा या मोठ्या यशानंतर दिग्दर्शकांची जबाबदारी वाढते. 
सांगू इच्छितो की आम्ही लवकरच आई पण भारी हा सिनेमा प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहोत. अस दिग्दर्शक केदार शिंदे यांनी हे चित्रपट घेऊन येण्याचं जाहीर केले आहे.


शरद व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफतांना कारंजा येथे ते बोलत होते. त्यांच्या व्याख्यानांचा विषय होता "कलावंत म्हणून माझा प्रवास" ललित वरांडे उपविभागीय अधिकारी यांनी वक्त्यांचे स्वागत केले. प्रस्ताविक प्रमोद दहिहांडेकर यांनी केली. डॉ. सुनील देशपांडे यांनी परिचय करून दिला. डॉ. अजय कांत यांनी देवेंद्र फडणवीस यांनी पाठवलेल्या संदेशाचे वाचन केले. त्यावेळी गतवर्षात दिवंगत व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली.

केदार शिंदे(Kedar Shinde) आपल्या कला प्रवासाविषयी बोलताना पुढे म्हणाले मला पायलट व्हायचे होते. मी त्यासाठी भोसला मिलिटरी स्कूलची पात्रता परीक्षा सुद्धा दिली होती. त्यानंतर माझं सिलेक्शन होऊन मी जॉईन केले होते. माझे आजोबा शाहीर साबळे यांचा महाराष्ट्राची लोकधारा(Maharashtrachi Lokdhara)या नावाचा कार्यक्रम खेड्यापाड्यात पोहोचला होता. त्यावेळी त्यांना बालकलावंतांचे खूप गरज भासू लागली. मी पुढे शिक्षण न पूर्ण करता त्यांच्यासोबत काम करू लागलो. मी माझ्या आजोबांच्या सोबत 23 वर्ष सोबत राहिलो.''अग...अग...अग...विंचू चावला'', जेजुरीच्या खंडोराया जागराला या हो, अशी अनेक प्रबोधन करणारी भारुडे त्यांनी सादर केली. माझे आजोबा खूप दूरदृष्टीचे होते त्यांची कला पहातच मी मोठा झालो. या क्षेत्रात मी त्यांचा वारसा मला पुढे चालवायला पाहिजे या जाणीवने आलो. केदार शिंदेने सांगितले हे क्षेत्र लोकांना खूप चांगले वाटते पण या चांगल्या च्या पाठीमागे खूप काळोख असतो.

माझा पहिला सिनेमा फसला. जेव्हा "जत्रा" सिनेमाची निर्मिती केली त्यावेळी माझ्यावर कर्ज खूप होते अनेक अडचणी सामोरे आल्या. मी पुन्हा उमेदीने भरत जाधव सारख्या मित्रामुळेच उभा राहिलो. अनेक एकांकिका व्यावसायिक नाटके केली, यामध्ये मला भरपूर पारितोषिके मिळालीत.

''आमच्यासारखे आम्हीच'',  ''बॉम्ब ए मेरी जान'',श्रीमंत दामोदर पंत अशा या अनेक सिनेमाच्या माध्यमातून लोकांपर्यंत मी पोहोचलो. 'सही रे सही' हे 2002 या वर्षी नाटक सादर केले. खूप मोठे प्रयोग झाले. "गोपाळा रे गोपाळा" "लोच्या झाला", या चित्रपटांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. भरत जाधव यांचा मुक्काम पोस्ट लंडन या चित्रपटाची शूटिंग लंडन येथे झाले. त्यानंतर मालिकांना सुरुवात केली त्यामध्ये "गंगाधर टिपरे" ही मालिका सुरू केली. "अगंबाई अरेच्चा" "यंदा कर्तव्य आहे" हे सिनेमा 2004 ला मला भरपूर समाधान दिला."बाई पण भारी देवा" कोरोना नंतर आलेला सिनेमा प्रत्येकांच्या घराघरापर्यंत पोहोचला. सैराट नंतर "बाई पण भारी देवा" या चित्रपटाला खूप यश मिळालं. केदार शिंदे यांनी सांगितले की रसिकांच्या आमच्याकडून अपेक्षा खूप वाढलेल्या असून आमची सुद्धा जबाबदाऱ्या वाढले आहेत.

हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या