Amazon

Ads Area

header ads
header ads

या आश्चर्यकारक कथेमुळे कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाते. माहित आहे का तुम्हाला?| Kojagiri Paurnima


चातुर्मासात येणाऱ्या आश्विन महिन्यातील विजयादशमी नंतर येणाऱ्या अश्विन पौर्णिमेला श्री महालक्ष्मीचे पूजन केले जाते. हे पौर्णिमा शरद ऋतूत येत असल्यामुळे याला शरद पौर्णिमा असे म्हणतात. तसेच या दिवशी जागरण करून श्री लक्ष्मी मातेचे पूजन केले जाते .म्हणून याला कोजागिरी पौर्णिमा असे संबोधले जाते.


पाहूया कोजागिरी पौर्णिमेची कथा.
प्राचीन युगात मगध  देशातील  वलीत नावाचा एक दरिद्री ब्राम्हण होता. तो ब्राम्हण  गरीब असला तरी संस्कारी होता. पण यालाच विरोध त्याची पत्नी  खूप दुष्ट होती. गरिबीमुळे त्याची पत्नी त्याला रोज त्रास देत असे. संपूर्ण गावासमोर ती तिच्या पतीची चेष्टा करत असे. पतीच्या विरुद्ध आचरण करणे हाच तिने आपला धर्म मानला होता. पैशाच्या हव्यासापोटी ती आपल्या पतीला चोरी करण्यासाठी नेहमीच प्रोत्साहित करत असे.
एकदा श्राद्ध करताना ब्राह्मणाच्या पत्नीने पूजेमध्ये  ठेवलेले सर्व पिंड उचलून एका विहिरीत फेकून दिले. पत्नीचे हे वर्तणूक पाहून ब्राह्मण खूप चिडला आणि जंगलात निघून गेला. तो जंगलात गेल्यानंतर त्याला तेथे आश्चर्य दिसले. जंगलात त्याला नागकन्या भेटल्या. तो दिवस म्हणजे अश्विन मासातील पौर्णिमा होता. नागकन्यांनी ब्राह्मणाला रात्रभर जागून श्री लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्याचे व्रत सांगितले. ते व्रत ऐकून ब्राह्मण खुश झाला आणि विधीप्रमाणे कोजागरी व्रत करण्यास सुरू केले. या व्रताच्या प्रभावाने श्री लक्ष्मी मातेच्या कृपेने धनसंपत्ती प्राप्त झाले. त्याच प्रमाणे त्याच्या पत्नीचीही बुद्धी शुद्ध झाले आणि ते दोघे सुखाने संसार करू लागले.


कशी करावी ही पूजा.
पौर्णिमेच्या दिवशी या व्रतानिमित्त रात्री श्री लक्ष्मी देवीची आणि ऐरावतावर बसलेल्याा इंद्राची पूजा केली जाते. उपवास ,पूजा व जागरण या तीनही अंगांना करतात सारखेच महत्त्व आहे. या भरतात रात्रीच्या पहिल्या प्रहरी लक्ष्मी व इंद्र असे पूजन करून त्या दोघांना पुष्पांजली वाहतात. पूजा झाल्यावर पोहेेे व नारळ पाणी सर्व देवांना अर्पण करून आप्तेष्टांना वाटतात .  विविध मंदिरांमध्ये घरांमध्ये अशाप्रकारे कोजागिरी पौर्णिमा साजरी करतात. या कोजागिरी पौर्णिमा मध्ये लक्ष्मीचे विशेष उपासना मानली जाते.

अनोखा इतिहास.

द्वापार युगात वृंदावन मध्ये श्रीकृष्णाने गोपी कान सोबत याच रात्री रासलीला केली होती. वृंदावनात आजही श्रीकृष्ण आणि गोपिका रासलीला रस असतात अशी मान्यता आहे. त्या विशेष प्रसंगाचे आठवण म्हणून वैष्णव संप्रदायाचे भक्त रास उत्सव करतात. यामध्ये श्रीकृष्ण आणि राधा चे विशेष उपासना करून त्यांना आठवले जाते.
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads