Amazon

Ads Area

header ads
header ads

Appleचा MacBook Pro लॅपटॉप झाला लॉन्च: पहा किंमत आणि स्पेसिफिकेशन्स, सोबत एअर...

Apple Unleashed Event 2021 आज पार पडला. अँपल कंपनीच्या या कार्यक्रमात नवीन मॅकबुक प्रो लॅपटॉप वरून पडदा हटवण्यात आला . या लॅपटॉपमध्ये शक्तिशाली M 1 PRO चिपसेट देण्यात आल आहे.  याशिवाय, युजर्सना मॅकबुक प्रो लॅपटॉपमध्ये शानदार डिस्प्ले देण्यात आलं आहे. याव्यतिरिक्त या ऑनलाईन संपन्न झालेल्या कार्यक्रमात Airpods 3 सुद्धा लॉन्च करण्यात आले आहे.  चला तर आता जाणून घेऊया Appleच्या दोन्ही उत्पादनांबद्दल सविस्तर...

Apple Unleashed Event 2021 Highlights:

या कार्यक्रमात सर्वप्रथम Apple Home Pod mini नवीन कलर ऑप्शन येलो, ऑरेंज आणि ब्लू कलर ऑप्शन मध्ये येणार असल्याचे सांगण्यात आले. Apple कडून नवीन प्लॅन जारी करण्यात आला जो Apple Music स्ट्रीमिंग साठी आहे त्याची 4.99 डॉलर सुरू करण्यात आलं आहे.
आता यूजर्स Siri च्या मदतीने Apple म्यूजिक चा आस्वाद घेऊ शकणार आहेत.

Apple MacBook Pro ला लॉंच करण्यात आलं. यात पहिल्यांदाच M1 Pro चिपसेट चा वापर करण्यात आला आहे.  आणि यामुळे या नव्या लॅपटॉपच नाव Apple MacBook Pro देण्यात आलं आहे. या मॅकबुक प्रो मध्ये 2 CPU वापरण्यात आले असून 16 Core GPU चा सुद्धा वापर करण्यात आला आहे. Appleच्या या Macbook Pro मध्ये दमदार परफॉर्मेंस चा सपोर्ट मिळणार आहे.

आज लॉन्च करण्यात आलेले AirPods दिसायला  AirPods Pro सारखेच आहेत. हा Airpod वॉटर रंजिस्टन्स सपोर्ट सोबत येईल. तर यामधये असणारी बॅटरी 6 तास बॅटरी बॅकअप देईल. हा Airpod MagSafe आणि वायरलेस सपोर्ट सोबत येणार आहे.  या Airpods मध्ये Spatial ऑडियो आणि एडॉप्टिव EQ चा सपोर्ट देण्यात आला आहे. या Airpods 3 ची किंमत 179 डॉलर असल्याची माहिती मिळाली आहे. या Airpod 3 ची आजपासून प्री बुकिंग चालू आहे. नवीन Airpods पुढील आठवड्यापासून विक्रीसाठी उपलब्ध होतील अशी माहिती यावेळी देण्यात आली.

आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, या M1 Pro प्रोसेसरमध्ये  10 core देण्यात आलं असून 5nm डिजाइन आणि 33.7 बिलियन ट्रांसजिस्टर सपोर्ट सोबत येणार आहे. प्रोसेसरला 16 core GPU चा सपोर्ट देण्यात आला आहे.
यात डबल पॉवर ग्राफिक्सचा सपोर्ट मिळतो. हा M1 आर्किटेक्ट बेस्ट परफॉर्मेंस सोबत येणार आहे.


Apple कडून लॉन्च करण्यात आलेल्या चिपसेट चे 2 व्हर्जन आहेत. यातील एक M1 Max चिपसेट आहे. हा चिपसेट डबल मेमरी बैंडविड्थ सोबत येईल तसच यामध्ये  57 बिलियन ट्रांसजिस्टर चा सपोर्ट देण्यात आला आहे. Apple मध्ये 32 कोर GPU चा सपोर्ट मिळणार असल्याची माहिती देण्यात आली. Apple M1 Pro आणि Max चिपसेट दमदार बैटरी लाइफ सोबत येतील. 

अॅपलचा मॅकबुक प्रो दोन स्क्रीन साईजमध्ये लॉन्च करण्यात आला असून तो 14 इंच आणि 16 इंच अश्या व्हरीयंट मध्ये लॉन्च करण्यात आले आहेत.  या मॅकबुक मध्ये पूर्वीपेक्षा जास्त पोर्टस देण्यात आले आहेत. सोबत यात HDMI, थंडरबोल्ट 4, SD कार्ड स्लॉट आणि हेडफोन जॅक सपोर्ट देण्यात आले आहे. हा प्रोडक्ट मॅगसेफ चार्जिंग सपोर्टसह येईल.

Apple Macbook Pro में 1600 की पीक ब्राइटनेस मिलेगी। इसमें एक नॉच डिस्प्ले मिलेगा। जिससे नोटबुक की स्क्रीन बड़ी और प्रीमियम नजर आएगी। डिस्प्ले में काफी ब्राइटनेस मिलेगी। यह ProMotion टेक्नोलॉजी सपोर्ट के साथ आएगा। इसका रिफ्रेश्ड रेट 120Hz होगा। नये MacBook Pro में एक मिनी LED डिस्प्ले दिया गया है। यह HDR डिस्प्ले सपोर्ट करेगा।

Apple MacBook Pro मध्ये 1600 ची पीक ब्राइटनेस मिळणार असून यामध्ये नॉच डिस्प्ले मिळणार असून नॉचमुळे या नोटबुकची स्क्रीन मोठी आणि प्रीमियम दिसेल.  डिस्प्लेमध्ये भरपूर ब्राइटनेस असेल.  हे Pro Motion टेक्नॉलॉजीच्या सपोर्टसह येईल. या मॅकबुकच्या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz असेल. या नव्या मॅकबुक प्रोमध्ये मिनी एलईडी डिस्प्ले देण्यात आला असून HDR डिस्प्लेला सपोर्ट करेल.
या macbook pro मध्ये 1080 पिक्सेलचा वेब कॅमेरा देण्यात आला आहे.  यात वाईड लेन्स सुद्धा असणार आहे.  हे 60 टक्के लोअर नोईज कॅन्सलेशन मायक्रोफोन सोबग येईल. सोबत यात  वूफर आणि डीपर बास चा सपोर्ट मिळेल.  या व्यतिरिक्त 6 स्पीकर साउंड सिस्टीमची सुविधाही यात उपलब्ध असेल.

Macbook Pro ची किंमत

मॅकबुक प्रो च्या 14 इंच स्क्रीन साइज व्हरीयंट ची किंमत 1999 डॉलर आहे. आज पासून मॅकबुक आपण बुकिंग करू शकता. Macbook Pro च्या 16 इंच स्क्रीन साइज असलेल्या व्हेरीयंट ची किंमत 2499 डॉलर आहे. Macbook Pro चे दोन्ही मॉडेल पुढील आठवड्यात विक्रीसाठी उपलब्ध  होतील. 


AirPods 3rd जनरेशन ची किंमत

 आज लॉन्च करण्यात आलेल्या Airpods 3rd जनरेशनची किंमत 18,500 रुपये असेल. तर हे Airpods ऍपल च्या ऑफिशियल साईटवर म्हणजेच Apple.com आणि Apple Store वर विक्रीसाठी उपलब्ध होतील. Apple pods ची विक्री 26 ऑक्टोबर पासून सुरू होईल. AirPods 2nd जनरेशन ची किंमत 12,900 रुपये असेल. AirPods Pro ला MagSafe चार्जिंग सोबत लॉन्च करण्यात आलं. Airpods pro ची किंमत 24,900 रुपये असेल अशी माहिती मिळत आहे.


हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या