Amazon

Ads Area

header ads
header ads

आर्यन च्या अटकेमुळे शाहरुख खान चे नुकसान! BYJUS ने थांबविल्या जाहिरात..

गेल्या काही दिवसांपासून एक वेगळीच बातमी चर्चेत गाजत आहे. ते म्हणजे आपला लाडका बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान हा क्रूज शिप वर ड्रग्स पार्टीत सामील असल्याने NCB ने त्याला अटक करून चांगलीच चौकशी सुरू केली होती. 

बॉलीवूड बादशाह शाहरुखला मात्र या घटनेचा खूप मोठा फटका बसला आहे. शाहरुख खान हा बॉलिवूड अभिनेता म्हणून खूप वर्षे काम करत आहे. प्रेक्षकांच्या मनावर राज्य करून त्याने त्याचे एक वेगळेच साम्राज्य उभे केले. ॲक्शन फिल्म साठी तो खूपच गाजलेला बादशहा म्हणून ओळखला जातो. 
 शाहरुख खान हा बायजूस( Byjus ) या शैक्षणिक ॲप ब्रँड ॲम्बेसिडर आहे. या ॲपच्या प्रत्येक जाहिरातीत शाहरुख नेहमी पुढे असतो. वेगवेगळ्या जाहिरातीतून त्याने या ॲप बद्दल विशेष माहिती देत शैक्षणिक क्षेत्रात याचे महत्व दर्शवत असतो.
पण शाहरुखचा मुलगा आर्यन खान याला अमली पदार्थांचं सेवन केल्याप्रकरणी कडून अटक सुनावणी होती. तसेच न्यायालयाने आर्यनला 14 दिवसांची कोठडी दिली होती. सध्या तो कारागृहात असून शाहरुख सोबत सर्व खान कुटुंबीय चिंतेत आहेत. या घटनेचा सर्व परिणाम शाहरूखच्या कामावर दिसत आहे. अर्थात बायजूस सारख्या नामवंत कंपनीने शाहरुखला नकार देत आहेत. आधी केलेल्या जाहिराती देखील प्रदर्शित होण्यापासून थांबवल्या.



बायजूस हा शाहरूखच्या स्पॉन्सरशिप डील्स मधील सगळ्यात मोठा ब्रँड होता. सोशल मीडियावर ही गोष्ट चर्चेत असल्यामुळे नेटकरी शाहरुख सोबत बायजूूसला देखील ट्रोल करू लागले आहेत.

शाहरुखला byju's कडून वर्षाला ३ ते ४ कोटी रुपये मिळत असे. दुसरी एक बाब म्हणजे शाहरुखला त्याच्या आगामी चित्रपटाचं चित्रीकरण थांबवावे लागले आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण परदेशात सुरू होते. पण या घटनेनंतर त्याला ते सोडून भारतात परतावे लागले.
या सर्व प्रकरणामुळे शाहरूखच्या आर्थिक स्थिती सोबत मानसिक स्थितीवर देखील प्रभाव पडत आहे.

हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या