Amazon

Ads Area

header ads
header ads

राष्ट्रीय एकता दिवस शपथ मराठी | Rashtriy Ekta divas Shapath Marathi

नॅशनल युनिटी डे 31 ऑक्टोबर या दिवशी सरदार वल्लभाई पटेल यांची जयंती पूर्ण देशभरात राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी केली जाते. 30 ऑक्टोबर हा दिवस एकता आणि अखंडता सर्वांना बळकट करण्याच्या व राष्ट्राची सुरक्षा करण्याची वचनबद्धतेला केला एक संधी प्रदान करते.

स्टॅच्यू ऑफ युनिटी केवडिया गुजरात येथे 31 ऑक्टोबर 2023 रोजी देशातल्या सर्व विभागातली पोलीस दल आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दल यांच्या सहभागाने परेडचे आयोजन करण्यात येते. या दिवशी सरदार वल्लभाई पटेल यांच्या पुतळ्याचे पद पूजन करून आदरांजली वाहण्यात येणार आहे. 750 जिल्ह्यांमध्ये शिक्षण आणि क्रीडा मंत्रालय यांच्यामार्फत राष्ट्रीय एकता दिनानिमित्त 75 हजार एकता दौड याचे आयोजन करण्यात येणार आहे. राष्ट्रीय एकता दिवस हा दिवस 31 ऑक्टोंबर रोजी उत्साहाने साजरा करण्यात येणार आहे.

महाविद्यालयामध्ये एकता दौड उच्चतंत्र शिक्षक विभागाच्या अधिपत्याखालील कार्यालय/ विद्यापीठे/ संस्था यांचे आयोजन करण्यात यावे. यामध्ये समाजातील लोकांचा समावेश असेल त्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश आणि 'आजादी का अमृत महोत्सवा'ची भावना देशभरात पोहोचवण्यास मदत होईल.

राष्ट्रीय एकता दिवस म्हणून दिनांक 31 ऑक्टोबर 2023 रोजी साजरा करण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील संस्था /विद्यापीठे/ कार्यालय/महाविद्यालयांमध्ये 31 ऑक्टोबर 2023 रोजी राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करण्यात यावे तसेच या दिनानिमित्त प्रतिज्ञा घेण्याचे आयोजन करण्यात यावे.

राष्ट्रीय एकता दिवस शपथ

मी सत्यनिष्ठापूर्वक शपथ घेतो 
की, मी राष्ट्राची एकता ,अखंडता
व सुरक्षा अबाधित राखण्यासाठी 
स्वतःला समर्पित करीन आणि 
माझ्या देशवासीयांमध्ये हा संदेश 
पोहोचवण्यासाठी देखील भरीव 
प्रयत्न करीन. मी ही शपथ 
आपल्या देशाची एकता टिकून 
ठेवण्याच्या भावनेने घेत आहे 
जे सरदार वल्लभाई पटेल यांच्या
दूरदृष्टी व कार्यामुळे राखणे 
शक्य झाले आहे तसेच मी माझ्या
 देशाची अंतर्गत सुरक्षा सुनिश्चित 
करण्याकरिता माझे स्वतःचे योगदान 
देण्याचा सुद्धा सत्यनिष्ठापूर्वक संकल्प 
करीत आहे.


हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

amazon ads