Amazon

Ads Area

header ads
header ads

'ठरलं तर मग' मालिका अपडेट: सायली आणि अर्जुन होणार आई-बाबा l Tharala Tar Mag Marathi Serial

Tharala Tar Mag 27 October Ep Update: "ठरलं तर मग" ही मालिका स्टार प्रवाह या वाहिनीवर आपल्याला पाहायला मिळते. या मालिकेच्या आजच्या एपिसोड मध्ये सायली अस्मिता ची चांगली शाळा घेताना दिसत आहे. आपण पुढील भागाच्या प्रोमो मध्ये पाहू शकतो अर्जुन आणि सायलीला खूप मोठा धक्का बसणार आहे. 
tharl tr mg today episode: ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागाच्या सुरुवातीलाच अस्मिता रागा करत असते. अस्मिताचा प्लॅन सायलीला घराबाहेर काढण्याचा   असतो. पण तो प्लॅन साकार होत नाही. सायलीच्या रूममध्ये अस्मिताने मोबाईल लपवून ठेवण्याचा काहीच उपयोग झाला नाही. तीच अस्मिताचा प्लॅन फ्लॉप झाला आहे हे जेव्हा ती बोलत असते तेव्हा अस्मिताला माहीत नसतं की ही जे बोलते ते सायलीने लपवलेला कॅमेऱ्यामध्ये काय झाला आहे. तेवढ्यात अचानक सायली तिच्या रूममध्ये येते पण अस्मिताला म्हणते की माझा फोन या खोलीत राहिला आहे तर तो मी घेऊ शकते का? अस्मिता च्या समोरच सायलीने तिच्या खोलीत लपवलेला मोबाईल काढून घेऊन जाते.

हे सर्व पाहून अस्मिताला सायलीचा खूप राग येतो व ती तिला जॉब विचारते तू व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू ठेवून रूममध्ये फोन का लपवला. तुला इथे काय घडतंय हे बघायचं होतं का असे अस्मिता सायलीला म्हणते. तेव्हा सायली सुद्धा अस्मिताला हाच प्रश्न विचारते की माझ्या रूममध्ये का मोबाइल लपवून ठेवला होता? तुला असलं काय बघायचं होतं म्हणून रूममध्ये मोबाईल लपून ठेवलीस. अस्मिता ने देखील अर्जुन सायलीच्या खोलीत व्हिडिओ रेकॉर्डिंग साठी फोन ठेवला होता त्यावरून सायली रागाने अस्मिताला चा विचारते.(tharala tar mag today episode hotstar)

दुसरीकडे तन्वीच्या आधीच विपुल हा घरी पोहोचलेला असतो. त्यामुळे तन्वी आणखी रागाला येते. तन्वीला किल्लेदार काही बोलण्याआधीच त्यांनी सांगते की मी अस्मिताला भेटायला गेलेली असते. तनवी ला बोलता बोलता मग समजते की विपुल हा त्यांच्या घरी दसऱ्यानिमित्त तिला घेऊन जाण्यासाठी आलेला असतो.(tharala tar mag today episode)

अस्मिता ची चोरी जेव्हा सुभेदारांकडे पकडली गेलेली असते तेव्हा अस्मिता साईलीला म्हणते की तुझ्या घरात काही करू शकते. काहीही करू शकते अगदी घराला आग ही लावू शकते किंवा कोणी लपवून ठेवू शकते. सायलीला प्रश्न विचारते की तू कोण आहेस मला जाब विचारणारी? सायली म्हणते 'मी या घरची सून' आहे असा उत्तर ती अस्मिताला देते. अस्मिताला सायली आठवण करून देते की ती या घरची लेक आहे. अस्मिताला खूप राग येतो व ती म्हणते मी घरातल्या सगळ्या कुटुंबांना बोलून सांगेन की तू काय केलं  आहे. तेव्हा सायली अस्मिताला म्हणते की ठीक आहे सर्वांना बोलावल्यावर जे काही माझ्या मोबाईल मध्ये आता शूट झाले ते मीच सर्वांना दाखवेल. तेव्हा सायली अस्मिताला तिच्या चुकांचा पाढा वाचून दाखवते व आजपर्यंत जो काही त्रास अस्मिताने सायलीला दिला आहे ते तिला ऐकवते.(tharla tar mag full episode)

तेव्हा अस्मिता सायलीला विनंती करून तिची माफी मागू लागते.अस्मिता सायलीला व्हिडिओ डिलीट करायला सांगते. तेव्हा सायली अस्मिताला म्हणते मी फोनचा कॅमेरा ऑन केला नव्हता. सायली म्हणते मला त्रास व्हावा म्हणून तुम्ही तुमच्या भावाला त्रास देऊ नका. सायली अस्मिताला म्हणते वाईट संगतीचे परिणाम वाईट असतात त्यामुळे तुम्हाला जमलं तर संगत बदला. हा टोमणा सायलीचा तनवी साठी असतो. हे सर्व बोलून सायली अस्मिताला दसऱ्याचं सोनंही देते. हे बोलणं चालू असतं तेव्हा शेवटी शेवटी अर्जुन ऐकतो आणि सायली बद्दल त्याच्या चेहऱ्यावर अभिमान दिसतो. अर्जुन सायलीला विचारतो काय झालं पण सायली न काही सांगता तेथून निघून जाते. पण अर्जुन खूपच आग्रह केल्यामुळे सायली जे काही झालं ते सर्व सांगते आणि अर्जुन हे ऐकून सायलीचा खूप कौतुक करतो. सायलीने सांगितल्यामुळे अर्जुन म्हणतो की आपल्याला आता जास्त सावध राहायला हवं.

तर दुसरीकडे महीपत आणि साक्षीचं बोलणं दाखवण्यात आला आहे. साक्षी महिपतला सांगत असते की आता नागराज सुद्धा सोबत नाहीये आणि प्रियाची सारी सूत्र त्यांच्या हातात आहेत. प्रिय विलास च्या खून प्रकरणात साक्षीदार आहे त्यामुळे माझी सर्व सूत्र प्रियाच्या हातात आहेत. पण महिपात म्हणतो की नागराज पुन्हा आपल्याकडे परत येईल.

पुढील भागात असे दाखवले आहे की सायली किचनमध्ये काम करत असते व अचानक तिला चक्कर येते शिवाय उलटीही होते. कल्पना अर्जुन- सायलीला मिठाई भरवत असलेला दाखवलं आहे आणि सायली आई व अर्जुन बाबा होणार आहेत हे ऐकून त्या आश्चर्यचकित होतात.

हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

amazon ads