Amazon

Ads Area

header ads
header ads

पारंपरिक गाणं नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला ‘आली आली गं भागाबाई’| Ali Ali G Bhagabaii

'एकदा येऊन तर बघा' हा चित्रपट दिग्दर्शित प्रसाद खांडेकर दिग्दर्शित केलेला हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये अनेक दिग्गज स्टार कास्ट दिसणार आहेत. या चित्रपटामध्ये गिरीश कुलकर्णी ,सयाजी शिंदे, तेजस्विनी पंडित, प्रसाद खांडेकर, पॅडी कांबळे ,विशाखा सुभेदार ,नम्रता सुभेदार, शशिकांत केरकर ,ओंकार भोजने ,वनिता खरात, रोहित माने ,सुशील इनामदार ,राजेंद्र शिसातकर हे आहेत. 'एकदा येऊन तर बघा' या चित्रपटातील पहिलं गाणं प्रदर्शित झाला आहे.
दिग्दर्शित प्रशांत खांडेकर एकदा येऊन तर बघा या चित्रपटांमधील पहिलं गाणं म्हणजे 'आली आली ग भागाबाई' हे पारंपारिक गाणं एका नव्या रूपाने सादर केले आहे. प्रेक्षकांची पसंती या गाण्याला मिळताना दिसत आहे. चित्रपटातील कलाकारांचं या गीतामधून ढिंच्याक अंदाज पाहायला मिळणार आहे. रोहन प्रधान यांनी 'आली आली गं भागाबाई' या गीताचा गायन केला आहे. हे गीत लेखन मंदार चोळकर यांनी केला आहे आणि या गीताला रोहन -रोहन यांचे संगीत मिळाला आहे. या चित्रपटांमधील 'आली आली ग भागाबाई' या गीताचा खरी गंमत हे चित्रपट पाहिल्यानंतरच उलगडेल. सारेगमकडून या चित्रपटाच्या गीताचे हक्क आहेत.

हा चित्रपट 24 नोव्हेंबरला सर्वांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती राजेश कुमार मोहंती, परितोष पेंटर ,सेजल दीपक पेंटर ,दीपक क्रिशन चौधरी हे आहेत. तसेच या चित्रपटाचे सहनिर्मिती सत्यनारायण मूर्ती ,अश्विनी पद्मनाभन, डॉ. झारा खादर हे आहेत.

हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

amazon ads