Amazon

Ads Area

header ads
header ads

महाराष्ट्र राज्याच्या निर्मिती बद्दल महत्त्वाच्या सनावळ्या Important facts about the formation of Maharashtra state

*इ.स. १९१५*
लोकमान्य टिळक यांनी भाषावार प्रांतरचनेची मागणी केली.

*१२ मे १९४६*
बेळगाव येथील साहित्य संमेलनात संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसंदर्भात ठराव संमत करण्यात आला.

*२८ जुलै १९४६*
महाराष्ट्र एकीकरण परिषदेमध्ये मराठी भाषिक प्रांत निर्माण करण्याबद्दल ठराव संमत करण्यात आला.

*१७ जून १९४७*
भाषावार प्रांतरचनेच्या संदर्भामध्ये 'दार कमिशन'ची स्थापना करण्यात आली. 

*१० डिसें. १९४८*
दार कमिशनने अहवाल प्रसिद्ध केला. दार कमिशन कडून भाषावार प्रांतरचना अमान्य करण्यात आली.


*२९ डिसें. १९४८*
: जे. व्ही. पी. समितीची स्थापना करण्यात आली.

*२८ सप्टें. १९५३*
:नागपूर करार झाला.

*१० ऑक्टो. १९५५*
: फाजल अली कमिशनचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. राज्याचे द्विभाषिक राज्य निर्माण करण्याची शिफारस करण्यात आल 

२९ डिसें. १९५३
: फाजल अली कमिशनची (राज्य पुनर्रचना आयोग) स्थापना करण्यात आली.

*७ नोव्हें. १९५५* 
:मुंबईमध्ये कामगारांची सभा भरवण्यात आली. यात सर्वपक्ष सहभागी झाले होते.

 *८ नोव्हें. १९५५*
:या दिवशी काँग्रेस वर्किंग कमिटीने त्रिराज्याचा ठराव संमत केला.

*१८ नोव्हें. १९५५*
: सेनापती बापट यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेवर मोर्चा काढण्यात आला.

*२१ नोव्हें. १९५५*
: एक दिवसांचा लाक्षणिक संप करण्यात आला होता. तर बंदी आदेश मोडल्याने गोळीबार करण्यात आला यात १५ जण हुतात्मे झाले.

*१६ जाने. १९५६*
: मुंबई केंद्रशासित करण्याची पं. नेहरूं यांच्या कडून घोषणा त्यामुळे प्रचंड जनआंदोलन करण्यात आले. येथील गोळीबारात ९९ हुतात्मे झाले.

*६ फेब्रु. १९५६*
: संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना करण्यात आली.

*७ ऑगस्ट १९५६*
: या दिवशी संसदेने महाद्विभाषिक राज्याचा कायदा संमत केला.

 *१ नोव्हें. १९५६*
: या दिवशी द्विभाषिक मुंबई राज्य अस्तित्वामध्ये आले.

*इ. स. १९५७*
: लोकसभा, विधानसभा व मुंबई महानगरपालिका यांच्या निवडणुकांमध्ये संयुक्त महाराष्ट्र
समितीला मोठे यश मिळाले.

*३० नोव्हें. १९५७* 
: संयुक्त महाराष्ट्र समितीकडून प्रतापगड येथे मोर्चा काढण्यात आला तर समितीकडून पं. नेहरूविरुद्ध निदर्शने करण्यात आली. 

*एप्रिल १९६०* 
: संसदेने मुंबई पुनर्रचना कायदा मंजूर केला.

*1 मे 1960*
: मुंबई, मराठवाडा, विदर्भ यांच्यासह महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली.
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads