Amazon

Ads Area

header ads
header ads

भारताच्या प्राकृतिक रचने विषयी फॅक्ट्स / माहिती | Marathi Facts for TAIT Notes PDF

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेचा अभ्यास करत असताना आपल्याला भारताच्या प्राकृतिक रचनेविषयी अभ्यास करावा लागतो यावर प्रश्न येऊ शकतात यामुळे आम्ही काही महत्त्वाचे फॅट्स किंवा मुद्दे या भागात देणार आहोत.
📌 हिमालय पर्वत हा भारतातील सर्वात तरुण घडीचा पर्वत आहे.
📌 अरवली पर्वत हा सर्वात प्राचीन घडीचा पर्वत आहे.
📌 एकूण भूभागाच्या 27 % भाग भारतीय पठाराने व्यापला आहे. 
📌जम्मू काश्मीर राज्यात जोझीला, जोझिलाही या खिंडी आहेत.
📌सिक्कीम राज्यात नथुला ही खिंड आहे.
📌 पीर पंजाल ही महत्त्वाची रांग मध्ये हिमालयात आहे.
📌 पत्कोई टेकड्या ह्या भारत आणि म्यानमार या देशांच्या दरम्यान आहेत.
📌 सतलज नदीच्या वायव्येस पंजाब हिमालय पसरलेला आहे.
📌 कुमाऊ हिमालय उत्तराखंड राज्यामध्ये आहे.
📌 नद्या भाबर या मैदानी भागांमध्ये लुप्त होतात.
📌 के2 हे भारतातील सर्वात उंच शिखर जम्मू-काश्मीर राज्यामध्ये असून हे पाक व्याप्त काश्मीर मध्ये आहे. 
📌 भारतातल्या एकूण भूमीच्या 30% भाग पर्वतीय आहे.
📌 पठारी भाग हा 27% आहे.
📌 मैदानी भाग हा 43% आहे.
📌 भारतातील भूभागावरील सर्वात खोलबिंदू केरळ राज्यात असून त्याचं नाव कुट्टानद अस आहे.
📌 दशांश खाडी ही अंदमान आणि निकोबार या बेटांच्या दरम्यान आहे.
📌 36 मोठी बेटं अरबी समुद्रात आहेत.
📌 नैसर्गिक बंदरांची संख्या भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर जास्त आढळते.
📌भारताचा पश्चिम किनारपट्टी पेक्षा पूर्व किनारपट्टीचा भाग अधिक रुंद आहे.
📌 पालघाट खिंड ही निलगिरी पर्वताच्या दक्षिणेला आहे.
📌 आंध्र प्रदेशात नल्लामला डोंगर आहे.
📌 सोळाशे किलोमीटर पश्चिम घाटाची लांबी आहे.
📌 मध्यप्रदेश यामध्ये सातपुडा पर्वत पूर्व पश्चिम दिशेमध्ये पसरलेला आहे.
📌 बुदेलखंड पठार हे उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश भागांमध्ये वरच्या बाजूला आहे.
📌 बाघेलखंडपठार हे छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या भागांमध्ये आहे.
📌 छोटा नागपूर पठार हे झारखंड राज्यामध्ये आहे.
📌 माळवा पठार हे मध्य प्रदेश भागात आहे.
📌 मेवाड पठार व मारवाड पठार या नावाने राजस्थान भागातील पठार ओळखले जातात.

भारताचा प्राकृतिक रचना पाहत असताना या महत्त्वाच्या काही फॅक्ट्स विषयी अभ्यास करावा लागतो हे महत्त्वाचे मुद्दे आपल्याला शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेसाठी विचारले जाऊ शकतात. 

टी ए आय टी परीक्षेसाठी लागणारे सर्व नोट्स आपल्या वेबसाईटचे इतर पेजेस वर उपलब्ध आहेत आपण नक्कीच चेकआउट करू शकता.

ही माहिती इंटरनेट आणि संदर्भ ग्रंथांच्या माध्यमातून मिळवलेली आहे त्यामुळे यामध्ये काही त्रुटी राहिले असल्यास आमच्या कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका.

हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या