Amazon

Ads Area

header ads
header ads

भारतामध्ये असलेल्या नद्या | MAHA TAIT Notes PDF

कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना आपल्याला भारतातील नद्यांविषयी प्रश्न येऊ शकतात. भारतामध्ये प्रमुख काही नद्या आहेत त्याविषयीची माहिती आपल्याला असेल तर ते प्रश्न सोडवणे खूपच सोपे जातात. शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा (MAHA-TAIT 2023) साठी अभ्यास करत असताना भारतातील नद्या, त्यांच्या उपनद्या, उगमस्थान यांचा अभ्यास आपल्याला करावा लागेल.
शिक्षक पात्रता परीक्षा, स्कॉलरशिप परीक्षा, पोलीस भरती, केंद्रप्रमुख भरती, शिक्षणाधिकारी , उपशिक्षणाधिकारी एमपीएससी यासारख्या परीक्षा देत असताना भारतातील नद्याविषयी प्रश्न विचारले जातात.

चला तर माहिती घेऊया भारतातील नद्यांविषयी.

भारतामध्ये असलेल्या नद्यांचे दोन विभाग करता येतात.

1. हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या.
2. पठारावरील नद्या.

तर दुसऱ्या बाजूला
1. अरबी समुद्राला मिळणाऱ्या नद्या.
2. बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्या.
असेही भाग पाडले जाऊ शकतात.

चला तर आता महत्त्वाच्या नद्यांच्या बद्दल माहिती घेऊया.

1. सिंधू नदी (Indus River)

सिंधू नदीचा उगम मानसरोवर येथे झाला आहे. याची लांबी 2880 किलोमीटर आहे. सिंधू नदीच्या उपनद्या झेलम आणि सतलज आहेत. सिंधू नदीच्या काठावर लेह, स्कर्डू यासारखी शहर वसलेली आहेत.

2. गंगा नदी (River Ganges)

गंगा नदीचा उगम गंगोत्री, अलकापुरी येथे झाला आहे. याच्या लांबीबद्दल 2510 किंवा 2580 किलोमीटर आहे असं म्हटलं जातं. 

यमुना, रामगंगा, शोन, गंडक, कोसी या नद्या गंगा नदीला जाऊन मिळतात म्हणजेच या नद्या गंगा नदीच्या उपनद्या आहेत. 

हरिद्वार, अलहाबाद, काशी, पटना, कानपूर, ऋषिकेश इत्यादी शहर गंगा नदीच्या तीरावरती वसलेले आहेत.

गंगा नदीवर फराक्का, मयुराक्षी, तिहेरी म्हणजेच भागीरथी ही धरणे आहेत.

भारतातील सर्वात मोठी, लांब आणि जास्त राज्यांमधून वाहत जाणारी नदी म्हणून गंगा नदीच वैशिष्ट आहे.

3. ब्रह्मपुत्रा नदी (Brahmaputra River)

भारतातील मानसरोवर येते ब्रह्मपुत्रा नदीचा उगम झालेला आहे. या नदीची लांबी 2900 किलोमीटर आणि 725 किलोमीटर आहे. या नदीच्या उपनद्या सुभानसिरी, तिस्ता, कोपिली, चंपावती दिहांग, मानस या आहेत.

गुवाहाटी दिब्रुगड यासारखी शहर ब्रह्मपुत्रा नदीच्या काठावरती आहेत. 

ब्रह्मपुत्रा नदीचे वैशिष्ट्य म्हणजे भारतामधील तांबडी नदी आणि आसामचं दुःखात रूप या वैशिष्ट्याने ओळखलं जातं.
या नदीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे जगातील सर्वात मोठे नदीपात्रा मधले बेट माझोली हे याच नदीमध्ये आहे.

4. गोदावरी नदी (Godavari River)

गोदावरी नदीचा उगम नाशिक येथील त्र्यंबकेश्वर येथे झाला आहे. हे ठिकाण महाराष्ट्र राज्यामध्ये आहे. याची एकूण लांबी 1498 किलोमीटर आहे. गोदावरी नदीच्या सिंदफणा, पैनगंगा वर्धा, प्राणहिता, मांजरा, इंद्रावती, दुधना या उपनद्या आहेत. 
या नदीच्या काठावर नाशिक, पैठण, नांदेड,  कोपरगाव, गंगाखेड ही शहर वसलेली आहेत.

गोदावरी नदीवर जायकवाडी हे धरण पैठण येथे आहे. गंगापूर आणि आंध्र प्रदेशातील पोचमपटू हे धरण आहे.
दक्षिण भारतामधील सगळ्यात मोठी नदी आणि लांब नदी म्हणून गोदावरी नदीला ओळखलं जातं तर याला दुसरं नाव म्हणून दक्षिणेकडील गंगा दक्षिणगंगा वृद्धगंगा असं म्हटलं जातं.

5. कृष्णा नदी (Krishna River)

महाबळेश्वर हे सातारा जिल्ह्यातील ठिकाणी कृष्णा नदीचा उगम होतो. कृष्णा नदीची एकूण लांबी 1290 km आहे. कोयना, वारणा, पंचगंगा, भीमा, तुंगभद्रा या नद्या कृष्णा नदीच्या उपनद्या आहेत. 

कृष्णा नदीच्या काठावर कराड, सांगली, मिरज, विजयवाडा यासारखे शहर वसलेली आहेत.

श्रीशैलम हे आंध्रप्रदेश मधील धरण कृष्णा नदीवरच आहे. कर्नाटक राज्यामध्ये नागार्जुन सागर हे धरण कृष्णा नदीवर आहे.

कोयना येथील कोयना धरण हे कोयना नदीवर असून पुढे कोयना नदी कृष्णा नदीला मिळते.
कृष्णा आणि कोयना नदीचा संगम कराड येथे झाला असून या संगमाला प्रीती संगम असं म्हटलं जातं. 

धोम हे देखील धरण कृष्णा नदीवर आहे.

6. नर्मदा नदी (Narmada River)

नर्मदा नदीचा उगम अमरकंटक मायकल पर्वतरांग येथे झालेला आहे.
या नदीची लांबी 1312 किलोमीटर असून बाजार, शेर बऱ्हेनेर, दुधी, तवा, हिरण, कोलार या नर्मदा नदीच्या उपनद्या आहेत.
तिच्या काठावर जबलपूर शार हे शहर वसलेली आहेत.
मेधा पाटकर यांनी नर्मदा नदीवर नर्मदा बचाव आंदोलन हे केलं होतं.

7. तापी नदी (Tapi River)

तापी नदीचा उगम मुलताई बेतुल येथे झाला आहे. याची लांबी 724 km आहे. या नदीच्या उपनद्या बेतुल, गंजाल, पातळी, अरुणावती, गिरणा, पांजरा या आहेत.
तापी नदीच्या काठावर भुसावळ आणि सुरत ही शहर वसलेले आहेत.

उकाई प्रकल्प काक्रापारा प्रकल्प हे गुजरात राज्यामध्ये आहेत हे तापी नदीवर असून महाराष्ट्रामध्ये हातनूर प्रकल्प आहे. हे सर्व धरणे आहेत.

तापी नदीचे वैशिष्ट्य म्हणजे तापी नदी महाराष्ट्रामध्ये दोनदा प्रवेश करते.

8. महानदी (Mahanadi)

रायपूर सिंहावा येथे या नदीचा उगम झाला असून या नदीची लांबी 858 किलोमीटर आहे. चैरी, सेवनाथ, तेल या महानदी या नदीच्या उपनद्या आहेत तर कटक हे शहर या नदीवर वसलेलं आहे.
हिराकुड प्रकल्प हे मानदीवर धरण आहे.
महानदीवर जगातील सर्वात लांब भिंत असलेले धरण आहे.

9. कावेरी नदी ( Kaveri river )

कावेरी नदीचा उगम ब्रह्मगिरी येथे झालेला आहे.  याची लांबी 407 किलोमीटर आहे. कावीळ नदीच्या उपनद्या हेमवती, सिसमा, सुवर्णावती, अमरावती या आहेत.
या नदीच्या तीरावर श्रीरंगपट्टनम तिरुचिलापल्ली ही शहर वसलेली आहेत. 
कृष्णराज सागर मैचूर प्रकल्प हे धरण कावेरी नदीवर आहे. कावेरी नदीवर शिवसमुद्रम या ठिकाणी धबधबा आहे.

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेचा अभ्यास करत असताना आपल्याला भारतातील नद्या संदर्भात प्रश्न विचारले जाऊ शकतात. यामध्ये कोणत्या नदीचा उगम कोठे झाला आहे? त्या नदीवर असलेली प्रसिद्ध शहरे कोणती आहेत? नद्यांच्या उपनद्या कोणत्या आहेत? नद्यांची लांबी किती किलोमीटर आहे? असे प्रश्न या टॉपिक वर विचारले जाऊ शकतात. बर आम्ही काही नद्यांची माहिती दिलेली आहोत ती माहिती तुम्ही नक्कीच अभ्यासा म्हणजे तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये आलेल्या प्रश्नांना उत्तर देणं खूप सोपं होऊन जाईल.


आपल्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असणाऱ्या उमेदवारांपर्यंत ही माहिती नक्कीच पोहोचवा.

सदर भागांमधील माहिती ही इंटरनेट आणि इतर संदर्भ ग्रंथांच्या माध्यमातून गोळा केलेली आहे यामध्ये काही त्रुटी असल्यास आम्हाला नक्की कमेंट सेक्शन मध्ये कळवायला विसरू नका.
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या