Amazon

Ads Area

header ads
header ads

किनारी मैदानी प्रदेश | TAIT Exam PDF Download

भारताच्या प्राकृतिक रचने विषयी अभ्यास करत असताना भारताच्या भू रचनेविषयी आतापर्यंत आपण अभ्यास केला त्यामध्ये उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश, उत्तरेकडील भारतीय मैदानी, द्वीपकल्पीय पठारी प्रदेश, यांचा आपण अभ्यास केलेला आहे. 

या भागांमध्ये आपण किनारी मैदानी प्रदेशाचा अभ्यास करणार आहोत.

📌 भारताला बेटांसह एकूण समुद्रकिनारा 7517 किलोमीटरचा लाभलेला आहे. 
📌 त्या किनारी मैदानी प्रदेशांची देखील दोन भाग पडतात.
1. पूर्व किनारपट्टी मैदानी प्रदेश
2. पश्चिम किनारपट्टी मैदानी प्रदेश

पूर्व किनारपट्टी मैदानी प्रदेश

पूर्वेकडे असणारा किनारपट्टी मैदानी प्रदेश याचा किनारी भाग थोडासा उंचावलेला आहे याला उन्मग्न असे नाव आहे.

📌 हा मैदानी प्रदेश सुवर्णरेखा नदीपासून कन्याकुमारी या ठिकाणापर्यंत पसरलेला आहे.

📌 या मैदानाची रुंदी 100 ते 150 किलोमीटर पर्यंत असून या भागांमध्ये तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिसा, पश्चिम बंगाल या राज्यांचा समावेश आहे. 

📌 समुद्रकिनारा उथळ तसेच वक्राकार आहे.

📌 या किनारी प्रदेशांमध्ये त्रिभुज प्रदेश जास्त आहेत.

त्रिभुज प्रदेश म्हणजे नदीच्या ठिकाणी समुद्राला मिळते तिथे नदीने वाहून आणलेल्या गाळामुळे तयार झालेला त्रिकोणी प्रदेश म्हणजेच त्रिभुज प्रदेश होय.

पश्चिम किनारपट्टी मैदानी प्रदेश

या मैदानी प्रदेशाचा किनारी भाग खचलेला आहे याला जलमग्न असं नाव आहे.

📌 गुजरात राज्यातील कच्छ आखातापासून कन्याकुमारी या ठिकाणापर्यंत हा मैदानी प्रदेश पसरलेला आहे.

📌 या मैदानी प्रदेशाची रुंदी साधारणपणे दहा ते पंधरा किलोमीटर आहे.

📌 येथील किनारी प्रदेश हा दंतुर असून अनेक खाड्यांची निर्मिती येथे झालेली आहे.

📌 पश्चिम किनारपट्टी मैदानी प्रदेश हा केरळ, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, गुजरात या राज्यांमध्ये आहे. 

प्रत्येक राज्यामध्ये तेथील किनारपट्टीला नाव दिलेलं आहे या नावांची माहिती आता आपण घेऊयात.

📝गुजरात राज्यामध्ये असलेल्या किनारपट्टीला कोठे वाड किंवा कच्छचे मैदान असे म्हटले जाते.
📝 महाराष्ट्र राज्यात असलेल्या किनारपट्टीला कोकण किनारपट्टी असं म्हटलं जातं
📝 कर्नाटक राज्यात असलेल्या किनारपट्टीला कानडा किंवा कारवार किनारपट्टी म्हटलं जातं.
📝 केरळ राज्यात असलेल्या किनारपट्टीला मलबार असं नाव आहे.
📝 तामिळनाडू राज्यातील किनारपट्टीला कोरोमंडल नाव देण्यात आलेल आहे. 
📝 आंध्रप्रदेश राज्यामध्ये असलेल्या किनारपट्टीला देखील कोरोमंडल हेच नाव आहे.
📝 उडीसा या राज्यामध्ये असलेल्या किनारपट्टीला उत्कल मैदान असं नाव आहे.

शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता परीक्षा म्हणजेच टी ए आय टी या परीक्षेसाठी आपण भारतीय प्राकृतिक रचना पाहत आहोत यामध्ये या भागात किनारी मैदानी प्रदेशांचा आपण अभ्यास केला.
पुढील भागामध्ये आपण भारतीय बेटे यांच्या बद्दल माहिती घेऊयात.
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads