Amazon

Ads Area

header ads
header ads

द्वीपकल्पीय पठारी प्रदेश | TAIT notes PDF

भारताची प्राकृतिक रचना याबद्दल अभ्यास करत असताना शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेमध्ये भारताच्या भू रचनेबद्दल प्रश्न येऊ शकतात त्यामध्ये आपण उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश उत्तरेकडील भारतीय महिलांनी प्रदेश पाहिलेले आहोत. 
या भागांमध्ये आता आपण द्वीपकल्पीय पठारी प्रदेश याबद्दल माहिती घेऊया.

📌 भारतीय पठारी प्रदेश साधारणतः त्रिकोणी आकाराचा आहे.
📌 पूर्वेकडच्या बाजूला पूर्व घाट, च्या बाजूला पश्चिम घाट, कडील बाजूला निलगिरी पर्वत, तर वायव्य दिशेला आरवली पर्वत यांच्यामध्ये पठारी प्रदेशाचा समावेश आहे.
📌 या पठारी प्रदेशाचे क्षेत्रफळ 16 लाख चौरस किलोमीटर आहे. 
📌 हा पठारी प्रदेश सर्वात प्राचीन भाग आहे.
📌 नर्मदा या नदीच्या खचदरीमुळे या पठारी प्रदेशाचे दोन भाग पडलेले आहेत.
1. उत्तर भागात असलेला पठारी प्रदेश
2. दख्खन पठारी प्रदेश

उत्तर भागात असलेला पठारी प्रदेश

आरवली पर्वत, विंध्य पर्वत आणि काही पठारांचा समावेश.

📌 अरवली पर्वत भारतातील सर्वात प्राचीन वली पर्वत आहे.
हा पर्वत नैऋत्य आणि ईशान्य दिशेमध्ये राजस्थान या राज्यांमध्ये आहे.
📌 उत्तर भागात असलेल्या पठारी प्रदेशामध्ये संगमरवराच्या खाणी आहेत या खाणी पर्वतीय प्रदेशामध्ये आहेत.
📌 या भागात असलेल थंड हवेच ठिकाण माउंट अबू आहे.
📌 या भागातील सर्वात उंच शिखर गुरुशिखर या नावाचे आहे.
📌 मध्यप्रदेश राज्यामध्ये नर्मदेच्या उत्तर बाजूला विंध्य पर्वत रांगा आहेत.
या पर्वताला ठोकळ्याचा पर्वत असे देखील म्हटले जात.

दख्खनचा पठारी प्रदेश

📌नर्मदा नदीपासून चा दक्षिणेकडील भाग हा दख्खनचा पठार म्हणून ओळखला जातो.
📌 सातपुडा पर्वतरांगा हे पर्वतरांगा नर्मदा व तापी नदीच्या मध्ये आहेत.
📌 पश्चिम घाट - दख्खनच्या पठाराच्या पश्चिम बाजूला ही पर्वतरांग आहे. पर्वतरांगाला जलविभाजक म्हणून ओळखलं जातं. 

📌या पर्वतरांगेमध्ये कळसुबाई, केमनगुंडी, कृद्रेमुख ही  शिखरे आहेत. यातील कळसुबाईचे शिखर हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे.

📌 पूर्व घाट - दख्खनच्या पठाराच्या पूर्व भागामध्ये या पर्वतरांगा आहेत. या पर्वतरांगा पूर्व वाहिनी नद्यांमुळे तुटक बनले आहेत.

📌 पश्चिम घाट आणि पूर्व घाट ज्या ठिकाणी एकत्र येतात त्या ठिकाणी निलगिरी पर्वत आहे.

📌 भारतातील छोटा नागपूरचे पठार हा खनिज संपन्न भाग आहे. पूर्वी मेघालयाचे पठार हा देखील छोटा नागपूरचा पठार याचा भाग होता.

या पठारी प्रदेशांमध्ये असलेल्या पर्वत रांगा तिथे असले उंच शिखरे त्यांची उंची आणि थंड हवेची तेथील ठिकाणे कोणती आहेत हे आता पाहुयात.

अरवली पर्वतरांग - अरवली पर्वतरांगेमध्ये गुरुशिखर हे सर्वात उंच शिखर आहे याची उंची 1722 मीटर आहे. या पर्वतरांगेमध्ये माउंट आबू हे थंड हवेचे ठिकाण आहे.

सातपुडा पर्वतरांग- सातपुडा पर्वतरांगेमध्ये पंचमढी म्हणजेच धुपगड हे सर्वात उंच शिखर आहे याची उंची १३५० मीटर आहे. या पर्वत रांगेत असलेली थंड हवेची ठिकाणी पंचमढ, तोरणमाळ, धुपगड हे आहेत.

पश्चिम घाट- पश्चिम घाट पर्वतरांगेमध्ये अनाईमुडी हे सर्वात उंच शिखर आहे याची उंची सुमारे 2695 मीटर आहे तर यामध्ये सर्वात थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वर ही आहे.

पूर्व घाट- पूर्व घाट पर्वतरांगेमध्ये महेंद्रा गिरी हे सर्वात उंच शिखर आहे. याची उंची 1501 मीटर आहे.

निलगिरी पर्वतरांग - निलगिरी पर्वतरांगेमध्ये दोडाबेट्टा हे सर्वात उंच शिखर असून याची उंची सुमारे 2627 मीटर आहे. उदक मंडलम हे या पर्वतरांगेमध्ये सर्वात थंड हवेचे ठिकाण आहे.


या भागात आपण द्वीपकल्पीय पठारी प्रदेशाबद्दल माहिती घेतली ही माहिती घेत असताना उत्तर भागातील पठारी प्रदेश आणि दख्खनचे पठार तिथे असलेले पर्वतरांगा त्यांची उंची स्थितीत उंच शिखरांची नावे तेथे असलेले थंड हवेचे ठिकाणे हे सर्व आपण पाहिलं आहोत.


1. हिमालय रांगा (उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश)
2. उत्तर भारतातील मैदानी प्रदेश

हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या