Amazon

Ads Area

header ads
header ads

भारतीय बेटे | TAIT Notes PDF

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच टी ए आय टी परीक्षेचा अभ्यास करत असताना आपण भारताची प्राकृतिक रचना याबद्दल अभ्यास केला यामध्ये भारताची भू रचना कशी आहे हे अभ्यासलं. यामध्ये भारतीय प्राकृतिक रचनेचे पाच विभाग पाडण्यात आले होते यात आत्तापर्यंत आपण उत्तरेकडील पर्वतीय रांगा, उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, द्वीपकल्पीय पठारी प्रदेश आणि किनारी मैदानी प्रदेश यांचा अभ्यास केला.
आता आपण भारतीय बेटे यांचा अभ्यास करू.
भारतीय बेटांचा अभ्यास करत असताना तीन प्रकार पडलेले आहेत.
1. अरबी समुद्रातील बेटे 
2. बंगालच्या उपसागरातील बेटे
3. किनारपट्टी भागातील बेटे

अरबी समुद्रातील बेटे

📌 अरबी समुद्रातील बेटांना पूर्वी लकादीव, मिनीकाय आणि एमीनदीव चित्र असं नाव होतं.
📌 लक्षद्वीप असं 1973 या वर्षी या बेटांचं नामकरण करण्यात आलेला आहे.
📌 येथे 36 मोठी बेटं आहेत.
📌 या बेटाचे क्षेत्रफळ 32 चौरस किलोमीटर आहे.
📌 हे बेट ज्वालामुखी शंका भोवती प्रवाळ कीटकांच्या संचयनाने तयार झाल आहे.

बंगालच्या उपसागरातील बेट

📌 बंगालच्या उपसागरामध्ये एकूण 572 बेट आहेत.
📌 बंगालच्या उपसागरामध्ये असलेल्या बेटांचे एकूण क्षेत्रफळ 8249 चौरस किलोमीटर आहे.
📌 अराकान योमा पर्वताची शिखर म्हणजे ही बेटं आहेत.
📌 बंगालच्या उपसागरामध्ये हॅरीएट हे शिखर सर्वोच्च शिखर आहे. 
📌 बॅरन बेटावर भारतामधील एकमेव जागृत ज्वालामुखी आहे.

किनारपट्टी भागातील इतर बेट
📌 न्यमुर बेटे, नर्मदा नदी च्या मुखाशी आहे.
📌 आलिया हे बेट देखील नर्मदा नदीच्या मुखाशी आहे.
📌 पछम, खादीर बेला, ही बेट कच्छ भागामध्ये आहेत.
📌 दीव बेट सौराष्ट्राच्या किनाऱ्यावर आहे.
📌 कोकोनट बेट हे कर्नाटक किनाऱ्यावर आहे.
📌 आता मुख्य भूमीचा भाग असलेली मुंबई आणि श्रीहरीकोटा येथ काही बेटं होती.

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेचा (TAIT) अभ्यास करण्यासाठी आपण भारताचा प्राकृतिक रचनेचा अभ्यास केला यामध्ये आपण आत्तापर्यंत उत्तरेकडील पर्वतीय प्रदेशांचा, उत्तर भारतीय मैदानी प्रदेशांचा, द्वीपकल्पीय पठारी प्रदेशांचा, किनारी मैदानी प्रदेशांचा आणि भारतीय बेटांचा अभ्यास केला.

भारतीय प्राकृतिक रचने विषयी काही महत्त्वाचे फॅक्ट्स किंवा मुद्दे आहेत ते आपण पुढील भागांमध्ये पाहणार आहोत. 

ही माहिती इंटरनेट आणि संदर्भ ग्रंथ यांच्या माध्यमातून मिळवलेली आहे यामध्ये काही त्रुटी राहिले असल्यास आमच्या कमेंट सेक्शन मध्ये मांडायला विसरू नका.

ही माहिती आपल्या शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा देणाऱ्या प्रत्येक उमेदवारापर्यंत नक्कीच पोहोचवा.
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads