Amazon

Ads Area

header ads
header ads

OMG 2: अक्षय कुमारन उज्जैन मध्ये सुरू केलंय ‘ओएमजी 2’ च शूटिंग, महाकाल मंदिर दर्शन घेऊन सुरवात

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार त्याच्या येणाऱ्या 'ओ माय गॉड 2' (O My God 2 Movie) चित्रपटाच्या शूटिंगसाठी उज्जैन येथे पोहोचला असल्याची माहिती मिळत आहे.

अक्षय कुमार 23 ऑक्टोबरला त्याच्या टीमसोबत उज्जैनला पोहोचला. उज्जैन इथं त्यानं महाकाल मंदिरात बॅरिकेडजवळूनच भगवान महाकालाचे दर्शन घेतले. अक्षय कुमार यावेळी मास्क घालून मंदिरात आला होता. एवढेच नाही तर तेथील पंडितांनी कोरोना नियम पाळून घेऊन अक्षय कुमारकडून पूजा करवून घेतली.

मिळालेल्या माहितीनुसार, अक्षयकुमार उज्जैन येथे दोन आठवड्यापर्यंत आपल्या (OMG2) चित्रपटाचं शूटिंग करणार आहे. तर या चित्रपटाचे काही शूटिंग महाकाल मंदिरात ही होणार आहे. याशिवाय या चित्रपटाचं शूटिंग उज्जैन मधील काही मंदिरात आणि रामघाट येथेही होणार आहे. सोबत या चित्रपटांमध्ये उज्जैनमधील वेगवेगळे ऐतिहासिक ठिकाण आणि धार्मिक स्थळे समावेश असणार आहे.

अक्षय कुमार न शेयर केलं सोशल मीडियावर लुक

अक्षय कुमार या चित्रपटामध्ये भगवान शिव यांच्या भूमिकेत दिसणार आहे.(Akshay Kumar to play Lord Shiva) याबद्दलची माहिती अक्षय कुमारने स्वतः सोशल मीडियावर लूक शेअर करत दिली आहे. चित्रपट ओएमजी 2 च शूटिंग सुरू करण्यासोबत सोशल मीडिया अॅप इंस्टाग्राम वर एक पोस्ट शेअर केला आहे. या पोस्टमध्ये तो भगवान शिव यांच्या भूमिकेत दिसणार आहे. 

लूक शेअर करत असताना त्यानं कॅप्शन मध्ये म्हटलंय 'कर्ता करे ना कर सके शिव करि तो होय' OMG 2 साठी आपल्या शुभेच्छा आणि आशीर्वाद आवश्यक आहेत. हा एक जरुरी सोशल मेसेज देणारा आमचा नम्र आणि इनामदार प्रयत्न आहे. आदियोगी त्यांची ऊर्जा आमच्या यात्रेसोबत साथ देऊ दे. हर हर महादेव.


'OMG 2' हा चित्रपट अमित राय यांच्या कडून लिहिला गेला आहे आणि दिग्दर्शक सुद्धा तेच करणार आहेत तर हा चित्रपट केप ऑफ गुड फिल्म, विपुल डी शहा, राजेश बहल, आणि अश्विन  वर्दे फोटो प्रोड्युस केला आहे.

ओएमजी 2 हा चित्रपट अक्षय आणि परेश रावल यांनी अभिनीत केलेल्या ओ एम जी- ओ माय गॉड या चित्रपटाचा सिक्वल असणार आहे आणि हा चित्रपट 2012 वर्षी रिलीज करण्यात आला होता तर पहिला भाग हा कॉमेडी ड्रामा होता जो उमेश शुक्ला यांनी लिहिला होता आणि दिग्दर्शित केला होता.

दरम्यान, अक्षय कुमार, जैकलीन फर्नांडिस आणि सत्यदेव यांनी ऊटी मध्ये 'राम सेतु' या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केल आहे. त्याची माहिती सुद्धा अक्षयने सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली होती.
अक्षय कुमार सध्या अतरंगी रे, रक्षाबंधन, बच्चन पांडे, सूर्यवंशी, पृथ्वीराज आणि गोरखा या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या