Amazon

Ads Area

header ads
header ads

WhatsApp chats असतात सुरक्षित ! पण मग आर्यन खान आणि अनन्या पांडे यांची चॅटींग कशी झाली लिक | अधिकाऱ्यांनी वापरली ही Ideas |

जीवन मराठी: आज सर्वांनाच  इंटरनेट द्वारे लोकांशी कॉन्टॅक्ट करणे सोपे झाले आहे. सोशल मीडिया हा त्याचा मूळ पाया असून लोक ,मनोरंजन ,बातम्या ,घडामोडी ,विशेष माहिती यांचा अगदी मनापासून आनंद घेत आहेत. आणि तेही अगदी सोप्या पद्धतीने. 

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि जगातील नंबर वन मेसेजिंग ॲप WhatsApp नेहमीच युजर्सना सिक्युरिटी सोबतच प्रायव्हसी देते. पण सध्या एक मोठा प्रश्न WhatsApp संबंधी उभा आहे. चला तर मग जाणून घेऊया नक्की झाले काय?

काही दिवसांपूर्वी ड्रग्स प्रकरणात  बॉलिवूड कलाकारांच्या चॅट्स लीक झाल्याचे समोर आले आहे व याद्वारे त्यांना चौकशीसाठी बोलवले आहे.  रिया चक्रवर्तीशी संबंधित काही चॅट्स लीक झाले होते. अभिनेत्री दीपिका पादुकोणला देखील NCB ने चौकशीसाठी बोलवले होते. त्यावेळी ड्रग डीलरसोबत त्यांची चॅट समोर आली असल्याचे काही रिपोर्ट्समध्ये कळाले होते.


WhatsApp च्या मतानुसार यूजर्सचे चॅट हे End-to-End Encrypted असते व कोणतीही तिसरी व्यक्ती वाचू शकत नाही.फीचरमुळे Sender आणि Receiver व्यतिरिक्त कोणीही तिसरी व्यक्ती चॅट वाचू शकत नाही. स्वतः WhatsApp देखील चॅट वाटू शकत नाही. या फीचरमुळे चॅट्स सुरक्षित राहतात.


आता आर्यन खानच्या ड्रग्स प्रकरणाच चॅट्सद्वारे लोकप्रिय अभिनेत्री अनन्या पांडेला NCB समन्स बजावले होते व चौकशीत देखील WhatsApp चॅट्सची माहिती समोर आली आहे.

 What's app End-to-End Encrypted असतानाही चॅट्स कसे होतात लिक ?

सर्वसाधारणपणे हे चॅट्स लीक होत नाही, तर यांना अ‍ॅक्सेस केले जाते. चॅट्सला अ‍ॅक्सेस करण्यासाठी स्मार्टफोन ला  अनलॉककरून व्हॉट्सअ‍ॅपवरून चॅट्स पाहिले जातात.


जर फोन अधिकाऱ्याच्या हातात असेल तर चॅट्स सहज पाहता येतील.  या चॅट्ससाठी अधिकारी कोर्डर ऑर्डरसह गुगल अथवा अ‍ॅपलला मागणी करू शकतात. परवानगी आणि रिव्ह्यूनंतर व्हॉट्सअ‍ॅप अकाउंटची बेसिक माहिती मिळू शकते.
एंड-टू-एंड इन्क्रिप्शनमुळे यूजर्सचे चॅट्स पूर्णपणे सुरक्षित आहेत. मात्र, सरकारी प्रकरणात चॅट्सला सहज अ‍ॅक्सेस करता येते.





हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads