2021 T20 World Cup: India vs Pakistan याचसोबत इतर मॅचेस भारतात कसे पाहाल?

ICC Men's T20 World Cup 2021 या क्रिकेटमधील विश्वचषक मॅचेस लाइव स्ट्रीमिंग ऑनलाइन केली जात आहे. जे आपण टीव्ही किंवा OTT प्लॅटफॉर्मवर पाहू शकणार आहोत. 
चला या लेखातून आम्ही तुम्हाला आईसीसी पुरुष टी20 विश्व कप ऑनलाईन कसा पाहता येईल याबद्दल माहिती देणार आहोत. यामुळे आपला How To Watch live ICC Men's T20 World Cup 2021, Where can I watch T20 World Cup 2021?, Which TV channel will telecast T20 World Cup?, Can we watch T20 World Cup on Jio TV?, Who will broadcast T20 World Cup 2021?,  ICC T20 World Cup 2021 Live Telecast Channels in India या  आणि अश्या सर्व प्रश्नाचं उत्तर आम्ही देण्याचा प्रयत्न करत आहोत. 

या 2021च्या विश्वचषकाची सुरवात 17 ऑक्टोबर पासून झाली आहे आणि हा टूर्नामेंट 14 नोव्हेंबर पर्यंत चालणार आहे. या वर्ल्डकपमध्ये 8 टिम सरळ क्वालिफाय करण्यात आले आहेत यात ओमान, बांग्लादेश, आयरलैंड, नामीबिया, नीदरलैंड, पापुआ न्यू गिनी, स्कॉटलैंड आणि श्रीलंका या देशांचा समावेश आहे.शनिवारी, 23 ऑक्टोबर पासून टी20 वर्ल्डकपच्या दुसऱ्या ग्रुपचे मॅचेस चालू होतील. यामध्ये भारताच्या टीमचा देखील समावेश आहे. भारताशिवाय अफगानिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लैंड, न्यूजीलैंड, पाकिस्तान, दक्षिण अफ्रीका आणि वेस्ट इंडीज़ या देशाचा समावेश आहे.

T20 World Cup 2021 schedule

२०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषकाची सुरवात 17 ऑक्टोबर रोजी झाली आहे. या इंटरनेशन क्रिकेट टूर्नामेंट टी20 वर्ल्ड कप फायनल सामना 14 नोव्हेंबर 2021 ला दुबईत होणार आहे. दरम्यान हा T20 क्रिकेट विश्वचषक 4 ठिकाणी खेळवण्यात येत असून 16 संघात एकूण 45 ट्वेंटी२० मॅचेस खेळवण्यात येणार आहेत. अबू धाबी, मस्कत, शारजाह, दुबई अश्या 4 ठिकाणी या मॅचेस खेळवण्यात येत आहेत. हा वर्ल्डकप ओमान, संयुक्त अरब अमिरात या देशात होणार आहे.

First Round of T20 World Cup 2021

टी20 क्रिकेट वर्ल्डकपच्या पहिल्या फेरीमध्ये 12 सामने खेळवले जाणार असून, यात चार टीम दोन ग्रुपमध्ये एकमेकांशी बरोबर खेळतील.  T20 World Cup 2021 च्या पहिल्या फेरीची सुरुवात रविवार 17 ऑक्टोबर रोजी झाली असून शुक्रवार 22 ऑक्टोबर पर्यंत यांच्या मॅचेस चालतील. तर हे सामने अबु धाबी, मस्कत आणि शारजाह येथे खेळवण्यात येत आहेत.

 


दरम्यान, याच काळात सोमवार 18 ऑक्टोबर पासून बुधवार 20 ऑक्टोबर 2021 पर्यंत सुपर 12 संघात 8 सराव सामने खेळवले जात आहेत.  पण, हे सराव सामने आहेत त्यामुळे टी -20 विश्वचषकाचा भाग मानला जाणार नाही अस सांगितलं जातं आहे.

तर सुपर 12 टीमचे, आपल्याला 30 सामने पाहायला मिळणार आहेत, जे दोन गटांमध्ये विभागले जाणार असून या टी 20 विश्वचषक 2021 मॅचेस रविवार 23 ऑक्टोबरपासून सुरू होतील.  यात सोमवार, 8 नोव्हेंबरला भारत आपल्या प्रतिस्पर्धी संघासोबत मॅच खेळेल. यामधील सर्व सामने हे अबुधाबी, दुबई आणि शारजाह येथे खेळवले जाणार आहेत.

उर्वरित तीन सामने म्हणजे दोन उपांत्य(सेमीफायनल) आणि एक अंतिम सामना(फायनल) असणार आहेत. हे टी 20 विश्वचषक 2021 सेमी फायनल्सचा पहिला सामना गुरुवारी, 10 नोव्हेंबरला होईल आणि दुसरी मॅच 11 नोव्हेंबरला होईल. फायनल मॅच 14 नोव्हेंबर रोजी दुबईत आयोजित करण्यात आले आहे.

How to Watch T20 World Cup 2021 in India?
Answer-
T20 क्रिकेटचे भारतातील चाहते आणि भारतीय प्रेक्षक टी -20 विश्वचषक सामने दुपारी 3.30 किंवा 7.30 वाजता पाहू शकणार आहेत. आणि हीच ती वेळ आहे जी आपण आयपीएल सामने पाहतो.  त्यामुळे आपण वर्ल्डकप 2021चा आस्वाद आणि अनुभव घेऊ शकणार आहोत. तर आपणास डिस्ने+ हॉटस्टार या OTT प्लॅटफॉर्मद्वारे ही मॅच    live पाहू शकणार आहोत.  मात्र या टी -20 वर्ल्डकप सामन्यांचा आनंद घेण्यासाठी आपल्याला डिस्ने प्लस हॉटस्टारचे सदस्यत्व नाममात्र फी देऊन घ्यावे लागेल.

Disney+ Hotstar ने आपल्या सदस्य होऊ इच्छित असणाऱ्यांना तीन प्रकारचे प्लॅन्स सादर केले आहेत. पहिला आहे तो 499 रुपये भरून असणारा वार्षिक प्लॅन ज्याचं नाव mobile आहे. यामध्ये आपल्याला केवळ मोबाईल मध्ये पाहता येईल आणि यात मद्धे आपण HD कोलिटी मधे पाहू शकतो. तर दुसरा प्लॅन 899 रुपये भरून घेता येणार आहे, हा प्लॅन सुद्धा वार्षिकच आहे. याच नाव सुपर प्लॅन आहे. तर तिसरा प्लॅन 1499 रुपयांचा आहे.ह्या प्लॅनच नाव प्रीमियम आहे. ज्या युजर्सकडे डिस्ने+ हॉटस्टारचे सुपर आणि प्रीमियमचे सभासद आहेत त्यांना सर्व प्लॅटफॉर्म वेबसाइट्स, मोबाईल आणि लिव्हिंग रूम डिव्हाइसवर पाहता येत. आणि सुपर या सभासदांना डिस्ने+ हॉटस्टार  आपल्याला एकाच वेळी दोन डिव्हाइसवर हाय-डेफिनेशन (एचडी) व्हिडिओ पाहण्याची सुविधा देते.  तर 4K कोलिटी 'प्रीमियम' सबस्क्राईबर असणाऱ्या उपलब्ध आहे. 

याशिवाय टीव्हीवर टी20 वर्ल्डकप पाहणाऱ्या ग्राहकांसाठी,  स्टार इंडिया स्पोर्ट्स चॅनेलवर दाखवण्यात येत आहे.यामध्ये स्टार स्पोर्ट्स हिंदी, स्टार स्पोर्ट्स तमिळ, स्टार स्पोर्ट्स तेलुगु आणि स्टार स्पोर्ट्स कन्नड या भाषेत उपलब्ध होत आहे.


भारताबाहेर राहण्यासाठी T20 World Cup 2021 कसे पाहता येईल.

जर आपण भारताबाहेर राहत असू तर टी 20 विश्वचषकाच्या अधिकृत वेबसाइटवर दाखवण्यात येत आहे त्यामुळे जगातील कोणत्याही कोपऱ्यात आपण या सामान्यांचा आनंद घेऊ शकू.

बांग्लादेशत हे T20 World Cupचे मॅच पहायचे असतील तर  ऑनलाईन Rabbithole, Bioscope आणि MyGP वर पाहू शकाल. टीव्ही साठी GTV, T-Sportsआणि BTV वर पाहता येईल.

पाकिस्तानमध्ये  T20 World Cup चा आस्वाद घेण्यासाठी लाइव स्ट्रीमिंग Daraz app वर आपण पाहू शकतो. टिव्ही वर पाहायचं असेल तर PTV Sports किंवा Asports वर आपण पाहू शकाल.

दक्षिण आफ्रिकेत टी -20 विश्वचषकाचे सामने सुपरस्पोर्ट अॅप, वेबसाइट आणि सुपरस्पोर्ट क्रिकेट टीव्ही चॅनेलवर दाखवण्यात येणार आहेत.

जर आपल्याला न्यूझीलंडमध्ये पहायचे असेल तर स्काय गो आणि स्काय स्पोर्टवर त्याचे live मॅच पाहू शकाल.  टीव्हीवर स्काय स्पोर्ट 3 वर याचा आस्वाद घेऊ शकाल.


श्रीलंका मध्ये आपल्याला मॅच पाहण्यासाठी लाइवस्ट्रीमिंग वेबसाइट वर असणार आहे तर टीव्हीवर Star Sports चैनल्स वर पाहू शकाल.

ऑस्ट्रेलिया मध्ये या टी20 मॅचेस Foxtel GO, Foxtel NOW आणि Kayo Sports वर दाखवण्यात येणार आहेत तर टीव्ही प्रेक्षक Fox Cricket वर पाहू शकतात.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने