Amazon

Ads Area

header ads
header ads

तब्बल १४ वर्षांनंतर माचेसबॉक्स चे दर वाढले आहेत. आता दर झाले दुप्पट| Matchbox increment

जीवन मराठी: आज संपूर्ण जग विकासाच्या मार्गावर पळत आहे. त्याचसोबत महागाई सुद्धा वाढत आहे.
सध्या सगळीकडे त्याचे परिणाम दिसून येत आहे. घरातील छोट्याशा वस्तूपासून ते दैनंदिन वापरातील वस्तूंचेही दर अधिक होत आहेत. 
 आता त्यामध्ये काडीपेटी सुद्धा  समावेश झाला आहे. तब्बल १४ वर्षांनंतर माचेसबॉक्स चे दर वाढले आहेत. यापूर्वी १ रुपयाला मिळणाऱ्या माचिसची किंमत आता दुप्पट झाली आहे. काडीपेटी बनवणाऱ्या कंपन्यांनी मिळून हा निर्णय घेतला आहे. याआधी २००७ मध्ये  दरात बदल झाला होता. त्यावेळी त्याची किंमत ५० पैशांनी वाढवून १ रुपये करण्यात आली होती. नवी किंमत १ डिसेंबर पासून लागू होणार आहे.


अलीकडच्या काळात कच्च्या मालाचे दर वाढल्यामुळे माचिसच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे उद्योग क्षेत्रातील लोकांचे म्हणणे आहे.  एक माचिस बनवण्यासाठी १४ वेगवेगळ्या प्रकारच्या कच्च्या मालाची गरज असते. यातील अनेक घटक असे आहेत की त्यांची किंमत दुप्पट झाली आहे. म्हणून ऑल इंडिया चेंबर ऑफ माचिस ने काडीपेटी चा दर वाढवण्याचा निर्णय घेतला.

नॅशनल स्मॉल मॅचबॉक्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे सचिव व्ही.एस. सेथुराथिनम यांनी सांगितले की,प्रत्येक माचिसमध्ये ५० काड्या  असतात. म्हणून ६० टक्क्यांनी किंमत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आता  ४३०-४८० रुपये प्रति बंडल दराने माचिस विकण्यात येणार आहे. यामध्ये १२ टक्के जीएसटी आणि वाहतूक खर्च वेगळा आहे.

हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या