Amazon

Ads Area

header ads
header ads

हे फळ तुम्हाला माहित आहे का? जे immunity वाढवतं आणि BP नियंत्रणात ठेवते.

 आज-काल धावपळीच्या जगात आपल्या पोषक जेवणाकडे लक्ष देता येईनासे झाले आहे. परिणामी अनेक प्रकारचे रोग, रक्तदाब, मधुमेह यासारखे त्रासदायक आजार सोसावे लागत आहे.

 कमी वेळात पोषक आहार घेणे हे फायदेशीर आहे. म्हणूनच आज तुम्हाला एका वेगळ्या फळाबद्दल माहिती देणार आहोत जे तुम्हाला वेगवेगळ्या आजारांवर परीणामकारक उपाय ठरू शकते.



किवी (Kiwi)  हे पोषक घटकांचे जणू  पॉवरहाऊस आहे असे मानले जाते. त्याचे अनेक फायदे वेगवेगळ्या आजारांवर उपाय म्हणून दर्शवले गेले आहे.


आरोग्य तज्ञ प्रत्येकाला हे फळ खाण्याचे शिफारस करतात. किवी (Kiwis fruit) खाल्ल्याने काय फायदे होतात ?

चला तर जाणून घेऊ.

लहान हिरव्या रंगाच्या किवी हे फळ अनेक गुणांनी समृद्ध आहे. त्यामधून आपल्या शरीराला जीवनसत्वे बी,सी, Antioxidants, phosphorus, potassium आणि calcium भरपूर प्रमाणात मिळते. किवी हे पोषक घटकांचे जणू पॉवर हाऊस आहे. भरपूर गुणांनी युक्त अशा किवी खाण्याची आरोग्य तज्ञ आणि डॉक्टर शिफारस करतात.

तणाव, धूम्रपान, कर्करोग, केमोथेरेपी, रेडिएशन, वेगवेगळ्या प्रकारचे अतिरिक्त औषधे, प्रदूषण अशा दुर्लभ घटकांमुळे आपल्या DNA वर परिणाम होतो. परिणामी मुत्रपिंड , यकृत आणि मेंदूशी संबंधित अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात. पण किवी हे फळ त्यास उत्तम उपाय आहे. त्यामुळे आपले DNA चांगले राहण्यास मदत होते. काही संशोधनात असे दिसून आले की किवी च्या नियमित सेवनाने कर्करोगाचा धोका कमी होतो.



रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास किवी भरपूर मदत करते. किवी मध्ये विटामिन सी असते ते रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते आणि शरीराला रोगांपासून दूर ठेवते.

रक्तदाब नियंत्रित करण्यास किवी हा फळ फायदेशीर ठरला आहे. 2014 मध्ये झालेल्या एका संशोधनानुसार एका दिवसात सुमारे दोन-तीन किती खाल्ल्याने रक्तदाब कमी होतो. हे जास्त काळ खाल्ल्याने उच्च रक्तदाब ,स्ट्रोक ,हृदय विकाराचा झटका किंवा हृदयाशी संबंधित आजार दूर करता येते.


किवी हा फळ समृद्ध आहे कारण याची मदत आपण रोगांपासून दूर राहण्यास करू शकतो. तसेच जर आपणास काही दुखापत झाली असेल किंवा शस्त्रक्रिया झाली असेल तर किवी नक्कीच खाल्ले पाहिजे. यामुळे आपली ताकद वाढण्यास मदत होते.

किवी  मध्ये आढळणारे नैसर्गिक संयुगे आणि बॅक्टेरिया च्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ जखमेला लवकर भरून काढतात.

हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या