Amazon

Ads Area

header ads
header ads

Kolhapur Ambabai Temple: अचानक आला गोव्यातून फोन... मंदिर परिसरात बॉम्ब असल्याचे सूचना. भाविकांचे दर्शन थांबले.

 कोविड-१९ च्या प्रभावामुळे सर्व मंदिरे बंद केली गेली होती. पण आज 7 ऑक्टोंबर घटस्थापनेच्या निमित्ताने सर्व मंदिरे, देवळे दर्शनासाठी भाविकांसाठी खुले केली गेली.


पण आज कोल्हापूर मध्ये लोकप्रिय असलेल्या अंबाबाईच्या मंदिरामध्ये एक वेगळीच घटना घडली.

कित्येक महिन्यांनी  दर्शनासाठी भाविकांनी कोल्हापूर मध्ये असलेल्या अंबाबाईच्या मंदिरामध्ये जमाव केला.

आज घटस्थापने दिवशीच दर्शन सुरू झाल्याने भाविकांमध्ये देखील उत्साहाचे वातावरण होते. मात्र मंदिरात घातपात होण्याची धमकी मिळाल्याने भाविकांच्या आनंदावर पाणी फिरले आहे.

दुपारच्या सुमारास पोलिसांना फोन आल्याने सतर्कता म्हणून अंबाबाई मंदिरातील दर्शन थांबविण्यात आले आहे. त्याचप्रमाणे पोलिसांनी बंदोबस्त करून सर्वांना सावधानतेचे सूचना करू लागले होते.


घातपात करण्याचा फोन आल्याने पोलिसांनी तातडीने दर्शनाची रांग तिथे थांबवली यानंतर मंदिराला वेढा घालत श्वान आणि बॉम्बशोधक पथकांना मंदिर परिसरात सोडण्यात आले.

पुढील सूचना मिळेपर्यंत मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे वरिष्ठ पोलीस देखील मंदिरात दाखल झाले होते.

हा असा प्रकार घडल्याने भाविकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.

हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या