Amazon

Ads Area

header ads
header ads

Google Pixel 6 pro मध्ये आहे जबरदस्त कॅमेरा, डिस्प्लेचा तर नादच नाही

Google Pixel 6 Pro हा गुगल कंपनीचा स्मार्टफोन 19 ऑक्टोबर 2019 रोजी लॉंच करण्यात आला. या स्मार्टफोनचा स्क्रीनसाईज 6.70 इंच आहे. तर या डिस्प्ले चा रीजोल्युशन 1440x3120 pixels असून पिक्सेल डेन्सीटी 512 पिक्सेल पर इंच आहे.(ppi) सर गुगलच्या या स्मार्टफोनचा अस्पेक्ट रेशीओ 19.5:9 आहे.


Google Pixel 6 Pro हा स्मार्टफोन 12 जीबी रॅम सहित येतो. Google Pixel 6 Pro हा स्मार्टफोन अँड्रॉइड 12 या ऑपरेटिंग सिस्टिमवर चालत असून यामध्ये असणारी बॅटरी 5003 एमएएच आहे. Google Pixel 6 Pro हा स्मार्टफोन वायरलेस चार्जिंग ला सपोर्ट करतो तसंच फास्ट चार्जिंगला सुद्धा हा स्मार्टफोन सपोर्ट करत आहे.

Google Pixel 6 Pro Camera

या स्मार्ट फोनचा कमेरा बद्दल बोलायचं तरGoogle Pixel 6 Pro रियर साईडला ट्रिपल कॅमेरा सेटप देण्यात आलेला आहे. यामध्ये 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आलेला आहे ज्याचा अपरेचर f/1.85 आहे तर याचा पिक्सेल साईज 1.2-micron आहे. तर दुसरा कॅमेरा 12 मेगापिक्सल चा असून तो f/2.2 अप्रचर सहित येतो तर पिक्सेल साईज 1.25-micron आहे. तर तिसरा कॅमेरा हा 48 मेगापिक्सल चा असून त्याचा अपरेचर f/3.5 आहे तर पिक्सेल साईज 0.8-micron आहे. या स्मार्टफोन चा रियर कॅमेरा हा ऑटोफोकस सपोर्टेड आहे. तर पुढील कॅमेऱ्या बद्दल बोलायचं तर सेल्फी साठी या मोबाईल मध्ये 11.1 मेगापिक्सलचा सेन्सर देण्यात आलेला आहे ज्याचा अपरेचर f/2.2 असून पिक्सेल साईज 1.22-micron असणार आहे.

Google Pixel 6 Pro Specifications

Google Pixel 6 Pro हा स्मार्टफोन Android 12 ऑपरेटिंग सिस्टीमवर चालतो. या स्मार्टफोनमध्ये इनबिल्ट स्टोरेज पाहिलं तर 128 जीबी स्टोरेज मिळत आहे. Google Pixel 6 Pro हा स्मार्टफोन dual-sim सहित येतो तरी यामध्ये एक नॅनो सिम आणि एक इ सिम बसवता येतं. गुगल पिक्सल 6 प्रो या मोबाईलच्या उंची, रुंदी आणि जाडी बद्दल बोलायला गेले तर 163.90 x 75.90 x 8.90mm इतकं आहे आणि वजन वजन ग्रॅम आहे. हा स्मार्टफोन Cloudy White, Sorta Sunny आणि Stormy Black रंगात उपलब्ध होणार आहे. हा स्मार्टफोन आयपी68 या रेटिग सोबत येतो जो धूळ आणि वॉटर यांच्यापासून प्रोटेक्शन देतो.

कंनेक्टिविटी ऑप्शन्स पाहिल्यास गुगल पिक्सल 6 प्रो मध्ये आपल्याला Wi-Fi 802.11 a/b/g/n/ac/ax, GPS, Bluetooth v5.20, NFC, USB Type-C, 3G, and 4G (with support for Band 40 used by some LTE networks in India) इतके ऑप्शन मिळतात. तर सेन्सर्स बद्दल बोलायचं तर या स्मार्टफोनमध्ये आपल्याला accelerometer, ambient light sensor, barometer, compass/ magnetometer, gyroscope, in-display fingerprint sensor, proximity sensor, and fingerprint sensor इत्यादी सेन्सर्स उपलब्ध होणार आहेत.

Google Pixel 6 Pro Price

गुगल पिक्सेल 6 प्रो $899 (अंदाजे 67,500 रुपये) च्या सुरुवातीच्या किंमतीसह उपलब्ध होणार आहे.

पिक्सेल 6 प्रो हा स्मार्टफोन अमेरिकेमध्ये 28 ऑक्टोबरपासून खरेदी करण्यासाठी उपलब्ध होणार आहे मात्र प्री-ऑर्डर सुरू आहेत. इतर मार्केटमध्ये हा स्मार्टफोन कधी उपलब्ध होईल हे सांगण्यात आलं नाही. पिक्सेल 6 सिरीजची भारतातली किंमत आणि उपलब्धता अजून कळली नाही.

गुगलने 'क्विक टॅप टू स्नॅप' नावाचे फिचर देण्यासाठी स्नॅपचॅट सोबत भागीदारी केली आहे ज्यामुळे  वापरकर्ते स्नॅपचॅटसाठी स्नॅप कॅप्चर करू शकतील. यावेळी फोन अनलॉक न करता 'कॅमेरा ओन्ली' मोडवर स्नॅप कॅपचर करू शकतील. स्नॅपचॅटकडून समर्पित ऑगमेंटेड रिअॅलिटी (एआर) लेन्स देखील देण्यात येणार आहेत. 


हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads