Amazon

Ads Area

header ads
header ads

भारताचे हवामान विषयी शिक्षक भरतीसाठी महत्वाची माहिती | TAIT Notes PDF

शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेचा अभ्यास करत असताना भारतीय भूगोल विषयी आपण अभ्यास करत आहोत भारतीय भूगोल विषयी शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी या परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात.
भारताचा भूगोल अभ्यासात असताना आपण या अगोदर भारतातील नद्या, भारताची प्राकृतिक रचना याचा अभ्यास केला.

उष्ण कटिबंधीय मान्सून प्रकारचे भारताचे हवामान आहे. भारताचे हवामान स्थान, हिमालय पर्वतरांगा, पूर्वेकडच्या वाऱ्याचे उत्तरेकडे सरकणे यामुळे बदलते. म्हणजेच भारताच्या हवामानावर यांचा प्रभाव पडतो. 

भारताच्या हवामानाचे चार ऋतूमध्ये वर्गीकरण हे भारतीय हवामानशास्त्र विभागाने केले आहे. 

1. उन्हाळा (मार्च ते मे)

उत्तर गोलार्धात सूर्याच्या भासमान भ्रमणामुळे मार्च महिन्यात तापमान वाढू लागते. 
हवेचे तापमान वाढल्यामुळे हवेचा दाब कमी होतो. या वेळेत भारतामधल्या बऱ्याच भागांमध्ये वादळे आणि वादळी पाऊस पडायला सुरुवात होतो. त्याला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते.

या पावसाला महाराष्ट्र मध्ये वाळवाचा पाऊस म्हटले जाते. हा पाऊस महाराष्ट्राच्या पठारी भागात पडतो.

तर कोकण भागात पडणाऱ्या पावसाला आम्रसरी असं म्हटलं जातं.

कॉपी बहारसरी, काल बैसाखी असं पश्चिम बंगाल उडीसा राज्यामध्ये म्हटलं जातं.

औंधी असं कर्नाटक आणि केरळ राज्यामध्ये म्हटलं जातं. याचा अर्थ वादळी वारे असं होत.

राजस्थान पंजाब हरियाणा या राज्यांमध्ये देखील वादळी वारे असं या पावसाला म्हटलं जातं.

उत्तर भारतातील मैदानी प्रदेशातील लोक या पावसाला लू असं म्हणतात.

2. पावसाळा (जून ते सप्टेंबर)

25 मे पर्यंत मान्सूनचे वारे अंदमान निकोबार बेटाच्या आसपास येतात. 

मान्सून 1 जून ला केरळमध्ये येतो. तर मान्सून 15 जुलै पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोचतो.

नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून भारतातील 80 टक्के पाऊस पडतो.

मौसीमराम (सोहरा) या ठिकाणी जगात सर्वाधिक जास्त पाऊस पडतो. 

भारतामध्ये पडणाऱ्या पर्जन्याचे वितरण असमान आहे. तर भारतात कधी कधी मान्सूनचा खंड ही महत्त्वाची समस्या आहे.

सरासरी 118 सेंटिमीटर भारतात पाऊस पडतो.

मान्सूनचा अंदाज सध्या 10 घटकांवर आधारित वर्तवला जातो. तर पूर्वी 16 घटकांवर मान्सूनचा अंदाज वर्तवला जात असे.

एल निनो चा परिणाम भारताच्या मान्सून वरती झालेला दिसून येतो.

चेरापुंजी या ठिकाणी आतापर्यंत एकाच वर्षी सर्वाधिक पर्जन्याचे नोंद झालेली आहे.

3. मान्सूनच्या परतीचा काळ (आक्टोंबर ते नोव्हेंबर)
मान्सूनचे वारे ऑक्टोंबर महिन्यापासून सर्वसाधारणपणे परतीच्या प्रवासाला लागतात.

पावसाळा आणि हिवाळा यामध्ये असलेल्या काळाला संक्रमण काळ असं म्हटलं जातं.

संक्रमण काळामध्ये ऑक्टोंबर हे किंवा विश्व मित्राचा उन्हाळा जाणवतो. म्हणजेच या काळात तापमान वाढ खूप होते आणि कोरडेपणा असतो.

4. कोरडा आणि थंड हवेचा हिवाळा (डिसेंबर ते फेब्रुवारी)

उन्हाळ्याची स्थिती दक्षिण गोलार्धात तापमान वाढल्यामुळे निर्माण होते.
तर मान्सून वारे या काळामध्ये ईशान्य कडून नैऋत्यकडे म्हणजेच दक्षिण गोलार्धाकडे वाहू लागतात.
या काळात तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश तेलंगणा याच्या भौगोलिक वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे त्या ठिकाणी ईशान्य मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडतो.
जम्मू काश्मीरमध्ये भूमध्य सागरावरून येणारे जेट वारे पाऊस आणि बर्फ वृष्टी करतात. येथे बर्फ वृष्टी झाल्यामुळे भारतीय पठारी प्रदेशापर्यंत थंडीची लाट येते. उत्तर भारताला या थंडीच्या लाटीचे झळ अधिक बसते. 

भारताच्या हवामानाबद्दल इंपॉर्टन्ट पॉईंट्स  (Important point- Climate of India)

संपूर्ण जगामध्ये सर्वसाधारणपणे हवामानाचे दोन ऋतू पाडले आहेत.

मान्सून हा शब्द अरबी भाषेतील आहे.

भारतामध्ये 75% पेक्षा कमी पाऊस पडल्यास आवर्षण वर्ष म्हटले जाते.

भारतात सर्वाधिक तापमान राजस्थान मधील गंगानगर येथे आढळते.

भारतामध्ये सर्वाधिक कमी तापमान द्रास या भागांमध्ये आहे.

भारतातील 80 टक्के पाऊस हा जून ते सप्टेंबर महिन्यामध्ये पडतो.

मुंबईमध्ये 26 जुलै 2005 रोजी 924 मिलिमीटर इतका पाऊस एकाच दिवशी पडला होता.

सात जूनला मान्सून महाराष्ट्र मध्ये येतो.

समुद्रकिनारी दिवसा खारे वारे वाहतात तर रात्री मतलई वारे वाहतात. 

भारतामध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्याच्या दोन शाखा होतात. 

अंदमान निकोबार बेटावर भारतात सर्वप्रथम मान्सून येतो. 

आरवली पर्वत मान्सून वाऱ्यांना समांतर दिशेमध्ये आहे. आरवली पर्वत हे मान्सून वाऱ्यांना समांतर दिशेत असल्यामुळे हा पर्वत वाऱ्यांना प्रतिरोध करू शकत नाही आणि या ठिकाणी प्रजन्यवृष्टी होत नाही.

तामिळनाडू राज्यांमधून नैऋत्य मोसमी वारे एक डिसेंबर पर्यंत परतलेले असतात.

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेचा अभ्यास करत असताना आत्ता आपण भारतीय हवामानाचा अभ्यास केला यामध्ये उन्हाळा, पावसाळा, मान्सून प्रतीचा काळ आणि हिवाळा याबद्दलची माहिती पाहिली. 

उन्हाळा हा मार्च ते मे महिन्यामध्ये असतो. पावसाळा जून ते सप्टेंबर या महिन्यांमध्ये असतो. तर ऑक्टोंबर ते नोव्हेंबर या महिन्यामध्ये मान्सूनच्या परतीचा काळ असतो. डिसेंबर ते फेब्रुवारी या काळात कोरडा व थंड हवेचा हिवाळा असतो. 

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा देत असताना भारतीय भूगोलामध्ये आपल्याला भारतीय हवामानाबद्दल प्रश्न येऊ शकतात त्याबद्दल ही माहिती आपण नक्कीच अभ्यासा.

ही माहिती आम्ही इंटरनेट आणि संदर्भ ग्रंथांच्या अभ्यासातून मिळवलेली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी राहिल्यास आमच्या कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच मांडायला विसरू नका. 

ही माहिती आपल्या शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा देणाऱ्या प्रत्येक उमेदवारासोबत नक्की शेअर करा.

हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या