Amazon

Ads Area

header ads
header ads

भारतामधील मृदा विषयी स्पर्धा परीक्षेसाठी लागणारी माहिती | Soils in India | MAHA TAIT Notes PDF

शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीचा (TAIT Exam 2023) अभ्यास करत असताना आपल्याला भूगोल विषयांमध्ये भारतातील मृदा आणि वनस्पतीचे प्रकार आणि त्यांची वैशिष्ट्ये कोणती आहेत यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. 
भारतामध्ये काळी मृदा, गाळाची मृदा, तांबडी मृदा, जांभी मृदा, पर्वतीय मृदा, वालुकामय मृदा, क्षारयुक्त मृदा इत्यादी मृदा प्रकार आढळतात.

आपण ह्या नोट्समध्ये स्पर्धा परीक्षेसाठी लागणाऱ्या भारतातील मृदा व त्याची वैशिष्ट्ये पाहूया.(Notes required for competitive examination)

हे पाहत असताना मृदेचा प्रकार कुठला आहे? त्याचे क्षेत्र किती टक्के आहे? ते कोणत्या राज्यात किंवा प्रदेशांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं ? आणि त्याची वैशिष्ट्ये काय आहेत? ही माहिती आपण या नोट्स मधून बघणार आहोत. (TAIT Notes शिक्षक भरती)

1. काळी मृदा(black soil)

पहिला आपण काळी मृदा याच्या विषयी माहिती घेऊयात. काळी मृदा ही महाराष्ट्र गुजरात आंध्र प्रदेश आणि उत्तर कर्नाटक या भागामध्ये म्हणजेच या राज्यांमध्ये आढळते. याचं क्षेत्र 29 टक्के आहे.

काळया मृदेला ते टेटॅनीफेरस मॅग्नेटाइट मुळे काळा रंग प्राप्त झालेला आहे. बेसॉल्ट खडकापासून काळी मृदा तयार झालेली आहे. कापूस पिक घेतले जाणाऱ्या काळया मृदेस रेगूर मृदा असे देखील म्हटले जाते.

2. गाळाची मृदा(alluvial soil)

गाळाची मृदा ही शेतीसाठी खूपच उपयुक्त असते. या मृदेमध्ये सेंद्रिय पदार्थ, चुना आणि पालाश यांचे प्रमाण जास्त असतं. तर या मृदेमध्ये कापूस, तंबाखू, गहू आणि तांदूळ यासारखे पीक घेतली जातात.

ही मृदा त्रिभुज प्रदेश, कावेरी नदी, कृष्णा खोरे, ब्रह्मपुत्रेचे खोऱ्यात, गोदावरी नदी, गंगा नदीच्या खोऱ्यात आढळते. गाळाच्या मृदेचे क्षेत्र 22 टक्के आहे.

3. तांबडी मृदा (Red soil)

तांबडी मृदा ही तामिळनाडू, मध्य प्रदेश, दक्षिण कर्नाटक, उडीसा, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये आढळते. या मृदेचे क्षेत्र 27 टक्के आहे.

तांबडी मृदा लोह संयुगामुळे तांबड्या रंगाची झाली आहे. यामध्ये वाळूचे प्रमाण जास्त असून ही मुर्दा माती कमी सुपीक आहे. तांबड्या मृदेचे प्रमाण बहुतेक राज्यांमध्ये थोड्याफार प्रमाणातच आढळून आलेली आहे.

4. क्षारयुक्त मृदा (Saline soil)

क्षारयुक्त मृदेचे क्षेत्र तीन टक्के असून ही मृदा अति सिंचन क्षेत्रांमध्ये तयार होऊ शकते. म्हणजेच पाण्याचे प्रमाण ज्या भागात जास्त असेल त्या ठिकाणी ही मृदा तयार होते. या मृदामध्ये बीट, शिवरी यासारखी पिके घेतली जाऊ शकतात.

5. वालुकामय मृदा (Sandy soil)

पंजाब, राजस्थान, आरवलीच्या पश्चिमेकडील भाग इत्यादी भागांमध्ये राज्यामध्ये वालुकामय मृदा आढळते. शुष्क व निमशुष्क प्रदेशांमध्ये ही मृदा निर्माण होते. 

अशा मृदेमध्ये आपण जलसिंचनाच्या उपलब्धतेनुसार कापूस, बाजरी आणि ज्वारी यासारखी पिके घेऊ शकतो. वालुकामी मृदा क्षेत्र 6 टक्के आहे.

6. पर्वतीय मृदा (Mountain soil)

पर्वतीय मृदेस अपरिपक्व मृदा असं म्हटलं जातं. या मृदेमध्ये सफरचंद, चहा, बदाम, अक्रोड यासारखे पिके घेता येऊ शकतात. 

पर्वतीय मृदेचे क्षेत्र 8 टक्के आहे. हिमालयीन पर्वतीय प्रदेशांमध्ये ही मृदा आपल्याला पाहायला मिळते.

7. जांभी मृदा (purple soil)

केरळ, कर्नाटक, गोवा राज्याचा डोंगरी भाग, मेघालय, ओडिसा, दक्षिण महाराष्ट्र या भागांमध्ये या प्रदेशांमध्ये जांभी मृदा पाहायला मिळते.

या मृदेचे क्षेत्र तीन टक्के असून लोहा मुळे या मृदेचे रंग लाल झाले आहे. अधिक तापमान जास्त पर्जन्य प्रदेशांमध्ये ही मृदा निर्माण होते. आलटून पालटून सतत ओला आणि कोरडा ऋतू यामुळे देखील ही मृदा तयार होते.

या भागात आपण भारतामधील मृदा आणि तिथे येणारे वनस्पती त्यांचे प्रकार आणि मृदाची वैशिष्ट्ये हे सगळं पाहिलेले आहे. काळी मृदा क्षेत्र किती टक्के आहे? 

Teacher Aptitude and Intelligence Test 2023 Notes

हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads