Amazon

Ads Area

header ads
header ads

तुमचा स्मार्टफोन जुना असल्यामुळे त्याचा आवाज कमी झाला आहे का ? फॉलो करा या टिप्स आणि पाहिजे तेवढा वाढवा वॉल्यूम | Smartphone volume problem

अनेकदा आपल्या स्मार्टफोन मध्ये छोटे-छोटे समस्या आढळून येतात. जर आपला स्मार्टफोन जुना झाला असेल तर आवाज कमी येण्याची समस्या असते. अनेक कारणांमुळे स्मार्ट फोनचा आवाज कमी होतो. स्मार्टफोन जुना असल्याने आपण या समस्येकडे दुर्लक्ष करतो. किंवा स्मार्टफोन दुरुस्त करण्याचे विचार करतो परंतु त्यासाठी सुद्धा खर्च करावा लागतो. पण आता ही अडचण  तुम्हाला चुटकी सरशी सोडवता येईल. तुमच्या स्मार्टफोनचा आवाज पूर्वी सारखाच मोठा आणि स्पष्ट ऐकू येईल. चला तर मग पाहूया यासाठी कोणते टिप्स फॉलो करावे लागतील.

आपण जेव्हा गाणे ऐकतो किंवा  स्मार्ट फोन वर चित्रपट पाहतो तेव्हा आपल्या स्मार्टफोनचा वोल्युम अगदी फुल्ल जरी असला तरी तो पूर्वीसारखा नसतो. अनेकदा आपल्या मोबाईलची रिंग झालेली ही कळत नाही. स्मार्टफोन जुना झाल्यामुळे आवाज कमी होण्याची शक्यता असतेच परंतु अनेक काही कारणांमुळेही स्मार्ट फोनचा आवाज कमी होऊ शकतो. या समस्येवर एक साधा उपाय तुम्हाला करावा लागेल.
यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईल मधील प्ले स्टोअर वर जाऊन एक  ॲप डाउनलोड करावे लागेल.
फोनचा आवाज वाढवण्यासाठी वॉल्यूम बूस्टर ( volume booster) किंवा साऊंड बुस्टर (sound booster) या दोन्हीपैकी एक ॲप तुम्ही डाऊनलोड करू शकता. ॲप डाऊनलोड केल्यानंतर पुढे दिलेल्या टिप्स क्रमाने फॉलो करा..


१. प्लेस्टोर वरून दोन्हीपैकी एक ॲप डाऊनलोड करा.
२. हे ॲप डाउनलोड झाल्यानंतर ॲप ओपन करून सेटिंग्स मध्ये जा.
३. येथे तुम्हाला  वॉल्यूम वाढवण्यासाठी  परवानगी मेसेज येईल.
४. त्यानंतर स्मार्टफोनची सुसंगत बनवण्यासाठी परवानगी द्या.
   यानंतर तुम्हाला पाहिजे तेवढा स्मार्टफोनचा व्हॉल्युम वाढवू शकता.






हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads