Amazon

Ads Area

header ads
header ads

अवघ्या 3 मिनिटांत या स्मार्टफोनची 120 कोटी रुपयांची विक्री ! पण कोणता आहे हा स्मार्टफोन ? हे आहे खास फीचर.

Moto Edge X30 details :

Motorola ही स्मार्टफोन तयार करणारी चीनमधील एक नामवंत आणि लोकप्रिय ठरलेली कंपनी आहे. चीनमधील झालेल्या पहिल्या सेलमध्ये Motorola या कंपनीकडून सादर करण्यात आलेले नवीन स्मार्टफोन Moto Edge X30 हे खूप प्रसिद्धीस ठरले आहे. कारण या स्मार्टफोन ला अवघ्या ३ मिनिटांमध्ये १२०  रुपयांची ग्राहकांकडून मागणी आलेली आहे. म्हणजेच या स्मार्टफोनची १० हजार युनिट्स ची विक्री झाली आहे. चला तर मग पाहूया Moto Edge X30  या स्मार्टफोनचे नेमके फीचर्स काय आहेत ?

Moto Edge X30  specifications and features :
 Motorola या कंपनीचा नवीन स्मार्टफोन Moto Edge X30  हा ग्राहकांच्या खूपच आवडीचा ठरला आहे. 
या स्मार्टफोनमध्ये ६.८ इंच फुल एचडी+ डिस्प्ले दिला आहे. याचे रिझॉल्यूशन १०८०x२४०० पिक्सल, आस्पेक्ट रेशियो २०:९ आणि रिफ्रेश रेट १४४ हर्ट्ज असे आहे. या स्मार्टफोनचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हा  स्नॅपड्रॅगन ८ झेन १ प्रोसेसरसह १२ GB RAM आणि २५६ GB स्टोरेज प्रोव्हाइड करतो.
या स्मार्टफोनच्या इतर सुविधांसह फोटोग्राफीसाठी ज्या स्मार्ट फोनच्या बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा सेट अप आहे ज्यामध्ये एलईडी फ्लॅश सह ५० मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा तसेच ५० मेगापिक्सल अल्ट्रा वाइड लेंस आणि २ मेगापिक्सल डेप्थ सेंसर दिला आहे. तसेच, व्हिडीओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी ६० मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.
हा स्मार्ट फोन अँड्रॉइड १२ आधारित MYUI ३.० वर काम करतो. 
या स्मार्टफोनच्या बॅटरी बॅकअप बद्दल बोलायचे तर ५००० mAh सह  ६८ Watt turbo power फास्ट चार्जिंग सपोर्ट  प्रोव्हाइड करण्यात आले आहे.

Moto Edge X30 ची किंमत ( price in India) :

 Moto Edge X30 या स्मार्ट फोनची चीनमध्ये किंमत ३,१९९ युआन आहे. म्हणजेच या स्मार्टफोनची किंमत जवळपास ३८,३००  रुपये आहे.


 
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
header ads

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या