श्री गुरुदेव दत्त जयंती माहिती. दत्त जयंती निमित्त शुभेच्छापत्रे, संदेश, WhatsApp quotes, status| information in Mararthi

श्री गुरुदेव दत्त यांच्या जन्माविषयी अनेक कथा प्रचलित आहेत. श्रीदत्त हे अत्रीऋषी व माता अनुसूया यांचा पुत्र आहेत. परंतु ते साक्षात विष्णु भगवानांचे अवतार आहेत, असाच बोध सर्व कथांमध्ये आहे.

अत्रीऋषींनी पुत्रप्राप्‍तीसाठी ऋक्ष कुलपर्वतावर कठोर तपश्चर्या केली. त्यांच्या या तपाने सारे त्रिभुवन पोळून निघाले. अत्रीऋषींच्या या प्रखर तपाने संतुष्ट होऊन ब्रह्मा-विष्णु-महेश हे तिन्ही देव प्रकट झाले. त्यांनी अत्रीऋषींना तपाचे नेमके कारण विचारले असता अत्रीऋषींनी त्यांना सांगितले की, आपण माझ्या उदरी पुत्ररूपाने जन्म घ्यावा. ही मागणी तिन्ही देवांनी मान्य केली. देवांच्या आशीर्वादाने अनुक्रमे ब्रह्मापासून सोम म्हणजे चंद्र, विष्णूपासून दत्त आणि शिवापासून दुर्वास हे तीन पुत्र आणि कन्या शुभत्रेयी अत्रीऋषींना प्राप्त झाली.
अशाप्रकारे श्री विष्णूचा अवतार दत्तात्रेय यांचा जन्म झाला.
 दत्तात्रेय हा शब्द दत्त आणि अत्रेय  या दोन शब्दांपासून तयार झाला आहे. दत्त म्हणजे आपण साक्षात ब्रह्मच आहोत, आपण नेहमी मुक्तच आहोत,आत्माच आहोत ही अनुभूती ज्याला आहे असा. आणि अत्रेय म्हणजे अत्रीऋषी यांचा पुत्र.

श्री गुरुदेव दत्तांवर सर्वच भक्त खूप मनापासून प्रेम करतात. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा शनिवार,१८ डिसेंबर २०२१ रोजी दत्त जयंती जल्लोषात साजरी करण्यात येणार आहे. 

तुम्हाला सर्वांना दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!!

शिकवतो जो जगण्याचा सार 
तोच तू आमचा एकमेव आधार
तू शिकवतो आम्ही कसा करावा 
भवसागर पार....!

   दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा !


                   भीती कशाची जेव्हा 
                           दत्त उभा पाठीशी !टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने