Amazon

Ads Area

header ads
header ads

Moto Edge X30 : snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर सह येणारा जगातील पहिला सर्वात पॉवरफुल स्मार्टफोन लॉन्च. पहा price and specifications.

Moto Edge X30 details

सध्या मार्केटमध्ये अनेक स्मार्टफोन्स उपलब्ध होत असतानाही ग्राहकांचे स्मार्टफोन्स बाबतीत वेगवेगळ्या मागण्या असतात. मनासारखा फोन आणि बजेट या दोन गोष्टी नेहमीच नवीन येणाऱ्या स्मार्टफोन्सना सूट होतील असे नाही. परंतु आता चीनमधील Motorola या सुप्रसिद्ध स्मार्टफोन तयार करणाऱ्या कंपनीने त्यांचा  फ्लॅगशिप स्मार्टफोन Moto Edge X30 लॉन्च केला आहे. ज्यामध्ये ग्राहकांच्या मागणीनुसार snapdragon 8  Gen 1 चीप प्रोव्हाइड स्मार्टफोन आहे. जो जगातील पहिला स्मार्टफोन ठरला आहे.  स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी हे एकच कारण पुरेसे आहे परंतु याचे स्पेसिफिकेशन्स पाहता कंपनीने कोणत्याच बाबतीत हात आखडले नाहीत. कारण स्मार्टफोन मधले फीचर्स ग्राहकांच्या पसंतीस आणि उपयोगी ठरणारे असले तरी बजेट नुसार अधिक सुविधा देणारे आहेत. चला तर मग पाहूया बद्दल आणखी काही..


Moto Edge X30  specifications :
 या स्मार्टफोनमध्ये क्वाल कॉम सह येणाऱ्या snapdragon 8  Gen 1  चीप सेट प्रोव्हाइड केला जातो.जो अतिशय वेगवान प्रोसेसर आहे. त्याचप्रमाणे ग्राफिक्स साठी Andreno GPU  दिला आहे. 
या फोन मध्ये अनेक विविध फीचर्स सह १२ GB पर्यंतच्या सर्वात वेगवान LPDDR5 RAM  सह ग्राहकांना मिळणार आहे. मोटोरोला या स्मार्टफोनमध्ये लेटेस्ट UFS 3.1 स्टोरेज दिला जाणार आहे.
या फोनमध्ये ६.७ इंचाचा फुल एचडी + अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे.हा डिस्प्ले 144Hz रिफ्रेश रेट(refresh rate)576Hz टच सॅम्पलिंग रेट(touch sampling rate) आणि 2400×1080 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करतो.
 हा फोन Android 12 OS वर आधारित MyUI 3.0 वर काम करतो.या फोन मध्ये इतर फीचर्स पाहता  बेसिक कनेक्टिव्हिटी प्रोव्हाइड आहे. तसेच सिक्योरिटीसही इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. 

पॉवर बॅकअपसाठी Moto Edge X30 स्मार्टफोन  मध्ये 5000mAh ची बॅटरी आणि 68W फास्ट चार्जिंग देण्यात येणार आहे.

या फीचर्स सोबत फोटोग्राफीसाठी हा अत्यंत जबरदस्त ठरणार आहे कारण बॅक पॅनल वर ५० मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा तसेच ५ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगल लेन्स सोबत २ मेगापिक्सेलचा थर्ड सेंसर दिला आहे. व्हिडीओ कॉलिंग आणि सेल्फी साठी ६० मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा सुद्धा दिला आहे.


Moto Edge X30  price :

Moto Edge X30 हा स्मार्टफोन १२ GB रॅम तसेच २५६ GB स्टोरेज सह ग्राहकांना मिळेल. मोटो रोल च्या या नवीन स्मार्ट फोनची किंमत जवळपास ४७,५०० रुपये आहे.



मित्रांनो! या फोनच्या अधिक डिटेल्स साठी आणि खरेदी करण्यासाठी खाली दिलेल्या माहितीनुसार तुम्ही हा स्मार्टफोन खूप सोप्या पद्धतीने खरेदी करू शकतो.

हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
header ads

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या