Amazon

Ads Area

header ads
header ads

xiaomi 11 Lite NE 5G चा सेल 3 October पासून, पहा price आणि Specifications

XIAOMI या स्मार्टफोन कंपनीचा नवा मोबाईल Xiaomi 11 Lite NE 5G लॉन्च झाला असून 3 ऑक्टोबर पासून या स्मार्टफोनचा सेल चालू होणार आहे. तर या फोनची जाडी 6.81mm Super Slim असून त्याचे वजन केवळ 158 ग्रॅम आहे. हा स्मार्टफोन truly Global 5G असून हा स्मार्टफोन 12 Band सपोर्ट करतो यासाठी XIAOMI 11 Lite NE 5G  या स्मार्टफोनमध्ये Qualcomm® Snapdragon ™  778G 5G Processor देण्यात आला आहे. याच्या डिस्प्ले बद्दल बोलायचं तर या स्मार्टफोनचा डिस्प्ले 10 bit 90Hz AMOLED Display आहे. कॅमेरा बद्दल बोलायचं तर 64MP ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला असून 50+ डिरेक्टर मोड्स आहेत. 
महत्वाचं म्हणजे सध्या wireless टेक्नॉलॉजीची मागणी सुरू आहे. त्यामुळे XIAOMI 11 Lite NE 5G या स्मार्टफोनमध्ये NFC Support देण्यात आला आहे. बॅटरी बद्दल माहिती द्यायची झाल्यास 4250mAh ची हाय इंटेनसिटी बॅटरी उपलब्ध करून देण्यात आली आहे. Seamless Communication साठी PHONE आणि मेसेज हे गुगलचे अँप देण्यात आले आहेत. 


XIAOMI 11 Lite NE 5G हा 2021 मधील  Slimmest And Lightest 5G स्मार्टफोन आहे. कारण या स्मार्टफोनची जाडी केवळ 6.81mm अल्ट्रा स्लिम आहे. तर वजन 158 ग्रॅम सुपर लाईट आहे. कम्पेअर केल्यास 
Xiaomi 11 Lite हा सुद्धा 158 ग्रॅम वजनाला आहे. तर OPPO F17 Pro हा स्मार्टफोन वजनाला 164 ग्रॅम आहे. Samsung Galaxy S21 5G हा स्मार्टफोन 171 ग्रॅम आहे. तर Vivo X60 हा स्मार्टफोन 176 ग्रॅम आहे.

जाडीच्या बाबतीत Motorola Edge20 हा स्मार्टफोन 7mm जाडीला आहे. Vivo X60 हा स्मार्टफोन 7.4mm जाडीचा आहे. तर ओप्पो रेनो 6 प्रो 5G हा स्मार्टफोन 7.6mm जाडीला आहे. तर XIAOMI 11 Lite NE 5G  हा स्मार्टफोन केवळ 6.81mm जाडीचा असल्याने इतर स्मार्टफोन पेक्षा सरस असल्याचे अमेझॉन वेबसाईटवर मायक्रोसाईट मध्ये सांगितले आहे. कॉलकम स्नॅपड्रॅगन 778G 5G हा प्रोसेसर असून यामुळे CPU परफॉर्मन्स 40 टक्के वाढतो तर 40 टक्के फास्टर ग्राफिक्स लोड होतात. 


XIAOMI 11 Lite NE 5G NFC

या स्मार्टफोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी NFC सेन्सर देण्यात आल्याने याच्या मदतीने आपण पेमेंट करू शकतो, बलुटूथ ऑडिओ डिव्हाईस कनेक्ट करू शकतो. आणि स्पीकरला सुद्धा कनेक्ट करू शकतो.


All Matte Premium Design

Dazzling Halo Ring Design हे मेन कॅमेरा सोबत असल्याने मोबाईलची शान वाढते.

मॅट फिनिश असल्याने आपल्या हाताचे फिंगरप्रिंट मार्क्स दिसून येत नाहीत त्यामुळे मोबाईल नव्याप्रमाणे दिसतो. 

XIAOMI 11 Lite NE 5G  या स्मार्टफोनच्या बॉडीपासून 1.77 mm protrudes कॅमेरा मोडूल आहे. 1.88 mm स्लिम बेजल्स आहेत. म्हणजेच बाजूचे आणि टॉपची बेजल्स केवळ 1.88 mm आहे. 

XIAOMI 11 Lite NE 5G Colours

हा स्मार्टफोन चार रंगात उपलब्ध आहे. 
Vinyl Black
Tuscany Coral

Jazz Blue
Diamond Dazzle

XIAOMI 11 Lite NE 5G Camera Specifications

या स्मार्टफोनमध्ये आपल्याला 3 रियर कॅमेरा मिळतात. यातील पहिला कॅमेरा 64 मेगापिक्सल असून तो wide आहे. तर दुसरा कॅमेरा 5 मेगापिक्सलचा असून तो telemacro लेन्स आहे. तर तिसरा कॅमेरा हा 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाईड मॅक्स कॅमेरा आहे. तर 64 मेगापिक्सल वाईड कॅमेरा 4K 30FPS विडिओ रेकॉर्ड करतो.



हा लेख आवडला असेल तर नक्की कमेंट द्वारे आपली प्रतिक्रिया कळवा आणि जीवन मराठी डॉट कॉम ला फॉलो करा.
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या