Amazon

Ads Area

header ads
header ads

WhatsApp Group Chatting मुळे झाला आहात का हैराण? Group मधून बाहेरही पडता येत नाही| तर मग बदल करा या Setting मध्ये.

जीवन मराठी: सोशल मीडिया हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक ठरला आहे. मनोरंजन, बातम्या ,घडामोडी या सर्वांचा समावेश असलेला सोशल मीडिया आपल्यांना एकमेकांशी कनेक्ट राहण्यासाठी सुद्धा मदत करतो. 

आज काल लोकांना चॅटिंगची खूपच सवय लागली आहे. व्हाट्सअप द्वारे लोकांशी कनेक्ट राहणे सोपे आहे. सर्वच क्षेत्रात व्हाट्सअप चा उपयोग करून काही कामे करणे सोपे झाले आहे.
व्हाट्सअप चॅटिंग हा महत्त्वाचा भाग असून आपण जवळ जवळ सर्वच लोक त्याचा उपयोग करत आहे. पर्सनल चॅटिंग ग्रुप चॅटिंग  अशा अनेक सुविधांमुळे मेसेजेस आपल्यांना व्हाट्सअप द्वारे मिळत आहे.
 पण ग्रुप चॅटिंग हा मुद्दा खूप वेगळा आहे. सर्वच लोकांचा समावेश जरी असला तरी काही लोकांच्या चॅटिंग मुळे ग्रुपमधील इतर लोकांना त्याचा त्रास होऊ शकतो.ते ग्रुप महत्त्वाचे असल्यामुळे आपल्याला त्यामधून बाहेरही पडता येत नाही. मग अशा वेळेस आपण वैतागून जातो. भरपूर ग्रुप चॅटिंग मुळे आपल्या मोबाईलवर खूप सारे मेसेजेस येऊ लागतात आणि आपला मोबाईल हँग होतो. पण असा मी तुम्हाला एक अशा सेटिंग बद्दल माहिती देणारा आहे असे अप्लाय करून तुम्ही या डोकेदुखीपासून कायमचे मुक्त होऊ शकतो आता तेही ग्रुप मधून बाहेर न पडता.

फॉलो करा या स्टेप्स..

◾सर्वात प्रथम आपल्या मोबाईल मधील व्हाट्सअप ओपन करा.
आपल्या पेजवर सेटिंग्स चा ऑप्शन येईल तिथे क्लिक करा.
 Account> privacy हा पेज दिसेल. या प्रायव्हसी ऑप्शन वर क्लिक करा जेणेकरून कोणतेही व्यक्ती तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड करू शकणार नाही.
नंतर groups हे ऑप्शन सिलेक्ट करा. तिथे तुम्हाला तीन ऑप्शन मिळेल. Everyone, my contacts ,my contacts except या ऑप्शन मधील तुम्हाला हवा असेल तो ऑप्शन सिलेक्ट करा.


◾ग्रुप notification ऑफ  करा.

आपल्या ग्रुपमधील चॅटींग मेसेजेस मुळे आपल्यांना नोटिफिकेशन्स येऊ लागतात त्यामुळे  डेटा वेस्ट होतो. म्हणूनच ही अडचण दूर करा.
आपल्या  सेटिंग्स मध्ये जाऊन notifications त्यावर जा.
तिथे silent ऑप्शन दिसेल ते सिलेक्ट करा. जेणेकरून सर्व ग्रुप्सचे नोटिफिकेशन सायलेंट मोड मध्ये राहील.


◾ग्रुप चॅटिंग करा Mute.
सेटिंग्स मध्ये जा. इथे तुम्हाला Mute Group‌ असा ऑप्शन दिसेल .
या सुविधेचा उपयोग करून ८ तास, १ आठवडा याप्रमाणे ऑप्शन्स दिसेल. तुम्हाला योग्य वाटेल तो ऑप्शन तुम्ही निवडू शकता. निवडलेल्या ऑप्शन प्रमाने तुमचा ग्रुप त्याप्रमाणे Mute होईल.
 
याप्रमाणे दिलेल्या आयडियाज प्रमाणे तुम्ही तुमचा ग्रुप खूप सोप्या पद्धतीने mute करू शकता.
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या