Amazon

Ads Area

header ads
header ads

Tata Punch SUV: टाटाची सर्वात स्वस्त एसयूवी पंच झाली लॉन्च | काय आहे किंमत आणि फीचर्स

आपल्या देशामधली सध्याची आघाडीची वाहन निर्माती कंपनी टाटा मोटर्स (Tata Motors) ने अधिकृतरीतीने बहुप्रतिक्षित 'मायक्रो एसयूव्ही' टाटा पंच (Tata Punch SUV ) भारतामध्ये लॉन्च केली आहे. 
Tata Punch Launch Photos
Tata Motors ही टाटा पंच एसयूव्ही सर्वात स्वस्त असून  सुरक्षित कार देखील आहे. भारतीय मार्केटमध्ये टाटा कंपनीने टाटा पंच एसयूव्हीची प्रारंभिक X-शोरूम किंमत 5.49 लाख रुपये असल्याचे सांगितले आहे. तर या SUV च्या टॉप व्हेरिएंटची X-शोरूम किंमत 8.49 लाख रुपये असल्याची माहिती मिळत आहे. मात्र या किंमती प्रारंभिक आहे. पुढे जाऊन कंपनी किंमत वाढवू शकते.  या Punch SUV ला ग्लोबल एनसीएपी सेफ्टी क्रॅश टेस्ट केल्यावर 5 स्टार रेटिंग मिळालेले आहे. 

टाटा Punch टाटांच्या इतर SUV म्हणजेच सफारी, हॅरियर (Harrier) सारख्याच डिझाइनसह येते.  वास्तविक, कंपनीने या नवीन SUV मध्ये काही खास डिझाईन इलेमेंट दिले आहेत, त्यामुळे ही कार  निश्चित इतर कार मध्ये उठून दिसते.

TATA Punch बुकिंग चालू आहे का?

Tata कंपनीने आतापासून Tata Punch SUV चे बुकिंग सुरू केले असून ही कार खरेदी करू इच्छित असलेले ग्राहक 21,000 रुपयांची टोकन रक्कम दिल्यावर ही SUV बुक करू शकतात.  ही कार आपण टाटा मोटर्स डीलरशिप तसेच डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे बुक करू शकतात.


Tata Punch SUV चे व्हेरियंट्स आणि किंमत

TATA ने लॉन्च केलेल्या SUV चे 4 प्रकार असून, आपल्या ग्राहकांसाठी Pure, Adventure, Accomplished आणि Creative  असे व्हेरियंट लॉन्च करण्यात आले आहेत. यातील एक बेस व्हेरिएंट असणार आहे, तर एक क्रिएटिव्ह टॉप व्हेरिएंट असणार आहे.  Accomplished, Adventure आणि Creative हे वेरीएन्ट मॅन्युअल आणि AMT या दोन्ही गिअरबॉक्स ऑप्शन सहित उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. टाटा पंचच्या बेस व्हेरिएंट ची X-शोरूम किंमत 5.49 लाख रुपये असल्याचे माहिती मिळत आहे. तर Adventure मॉडेलची X-शोरूम किंमत 6.39 लाख रुपये असेल. तर Accomplished या व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 7.29 लाख रुपये असल्याची माहिती सोर्सेस कडून मिळत आहे. यातील चौथ्या वेरीएन्टची म्हणजे  Creative या टॉप व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 8.49 लाख रुपये आहे.  रिदम (Rhythm) आणि डॅझल (Dazzle) कस्टमायझेशन पॅकसह ग्राहक त्यांच्या जीवनशैलीनुसार कस्टमाईज करू शकतील.

सगळ्यात सुरक्षित कार

Tata Punch SUV ही कार ग्लोबल एनसीएपी (Global New Car Assesment Programme) च्या क्रॅश टेस्टमध्ये 5-स्टार रेटिंगसह येते. यात Punch या टाटा च्या कारला अडल्ट संरक्षणामध्ये 5-स्टार मुलांच्या संरक्षणमध्ये 4-स्टार रेटिंग मिळाले आहे. तर पंच भारतीय मार्केटमध्ये टॉप सेफ कारच्या क्लबमध्ये सामील झाली आहे.  

या पंच एसयूव्हीच्या  सुरक्षा फिचर्सबद्दल सांगू इच्छितो, यामध्ये ड्युअल एअरबॅग, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, कॉर्नरिंग फंक्शनसह फ्रंट फॉग लॅम्प, ट्रॅक्शन कंट्रोल मोड, 370 मिमी वॉटर-वेडिंग क्षमता, एबीएस सिस्टीमसह ईबीडी, ब्रेक स्वे कंट्रोल, ऑटो हेडलॅम्प, रेन सेंसिंग वायपर, रियर डिफॉगर, आयसोफिक्स सपोर्ट यासारखी बरेच फीचर्स या कर मध्ये मिळणार आहेत.

टाटा पंच चा टॉप स्पीड किती आहे?What is the top speed of Tata Punch?

Tata Punch SUV ही कार 6.5 सेकंदामध्ये 60 किलो प्रतितासाच वेग घेऊ शकते. तर या कारला 100 किलो प्रतितासाचा वेग मिळवण्यासाठी केवळ 16 सेकंद लागतात.  यात ते टर्बो व्हेरिएंटसह लॉन्च करण्यात येणार आहे.  पुढे सीएनजीचा पर्याय देण्याचा विचार कम्पनी करत आहे.

Tata Punch SUV च्या इंजिन आणि पॉवर बद्दल माहिती ?

ही SUV तयार करणाऱ्या टाटा मोटर्सचे म्हणणे आहे की, टाटा पंच एसयूव्ही ग्राहकांमधील मोठ्या वर्गाला आकर्षित करेल, त्यात शहरांतले दररोजचे प्रवासी किंवा कधीकधी कामानिमित्ताने बाहेर जाणारे प्रवासी असोत.  टाटाने फक्त पेट्रोल इंजिनसह ही SUV लाँच केली आहे. तर या कारमध्ये डिझेल इंजिनचा वेरीएन्ट उपलब्ध करून देण्यात आला नाही.  

टाटा पंच एसयूव्हीला डायनाप्रो टेक्नॉलॉजी असलेला 1.2-लिटर रेवोट्रॉन इंजिन असणार आहे.  हे इंजिन 86 एचपी पॉवर आणि 115 nm टॉर्क जनरेट करते.  हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि 5-स्पीड AMT च्या ऑप्शन सह उपलब्ध आहे.

हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads